ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
how-partner-height-difference-can-affect-their-sex-and-love-life-in-marathi

जोडीदाराच्या उंचीमुळे सेक्स करताना समस्या येतात का, घ्या जाणून

जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात अथवा आपले नाते सुरू करतात, तेव्हा त्यांच्या मनात एकमेकांविषय अनेक इच्छा असतात. केवळ भावनिकरित्या नाही तर शारीरिक रूपातही या व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात. एकमेकांशी नातं असल्यास, शरीराने जवळ येणं हे काही चूक नाही. एकमेकांसह एक चांगला सेक्शुअल वेळ (Sexual Time) घालविण्याची नक्कीच दोघांचीही इच्छा असते. काही वेळा जर जोडीदारांच्या उंचीमध्ये खूप तफावत असेल तर त्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच कधी ना कधीतरी येतो की, सेक्स करताना अथवा आपल्या सेक्स लाईफवर (Sex Life) याचा काही परिणाम तर होणार नाही ना? अथवा सेक्स करताना उंचीमधील तफावत समस्या तर ठरणार नाही ना? काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे उंचीमुळे उभं राहून सेक्स करणे अथवा किस घेण्यासाठीही (kissing) त्रास होतो. तर काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे उंचीतील तफावत सेक्स करण्यासाठी अधिक उत्तेजना मिळवून देते. पण सेक्स करताना उंचीतील फरक हा खरंच महत्त्वाचा आहे का? हे या लेखातून आपण जाणून घेऊया.  

मिशनरी पोझिशनमध्ये होते समस्या (Missionary Position)

तुमच्यामध्ये आणि तुमच्या जोडीदारामध्ये जर अगदीच कमी उंचीचा फरक असेल तर कोणत्याही समस्या होत नाहीत. मात्र एखादी व्यक्ती 6 फूट असेल आणि त्याचा जोडीदार 5 फूट असेल तर सेक्स करताना तुम्ही मिशनरी पोझिशनमध्ये सेक्स करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच समस्या होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात असते तेव्हा सेक्स करताना आपल्या जोडीदाराचा चेहरा बघणं अनेकांना अधिक उत्तेजित करतं. सेक्स करताना अनेकांना आपल्या जोडीदाराचा चेहरा आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघायला आवडतात. पण जर उंची कमी असेल तर मात्र हे नक्कीच आव्हानात्मक ठरतं. कारण जर एक फूटाचं अंतर असेल तर चेहरा नीट दिसू शकत नाही. 

व्हॅनिला सेक्स करणाऱ्यांचीही होते निराशा (Vanilla Sex)

सेक्स करताना (During Sex) अनेक पोझिशन्स ट्राय केल्या जातात. यामध्ये वॅनिला सेक्स हे अत्यंत सॉफ्ट सेक्स (Soft Sex) समजण्यात येते. असे सेक्स करत असताना जोडप्यांना अजिबातच वाईल्ड सेक्स (Wild Sex) करावे असे वाटत नाही. संभोग करताना अशा व्यक्ती वेगवेगळ्या पोझिशन्स अथवा गोष्टी ट्राय करत नाहीत असं नाही. पण असा सेक्स करताना डोळ्यात डोळे घालून बघणं आणि एकमेकांना हळूवार स्पर्श करणं आणि हळूवार सेक्स करणं जोडप्यांना आवडतं. पण तुमच्या उंचीत तफावत असल्यास, असा सेक्स करताना नक्कीच समस्येचे ठरू शकते. पण सोफ्यावर अथवा खुर्चीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने सेक्स केल्यास उंचीची अडचण येणार नाही हेदेखील नक्की. 

रफ सेक्स करणाऱ्यांसाठी कमी उंची म्हणजे बोनस 

ज्या व्यक्तींना रफ सेक्स (Rough Sex) करण्याची आवड आहे अथवा त्यांना सेक्स करताना अधिक वाईल्ड होणे आवडत असेल अशा व्यक्तींना जोडीदाराची कमी उंची म्हणजे बोनस आहे. रफ सेक्स करताना कमी उंचीचा त्रास होत नाही. तसंच हे अशा व्यक्तींना पॉवर प्ले (power play) साठी अधिक फायदेशीर ठरते. तसंच उंची कमी असूनही अशा व्यक्ती एकमेकांना सेक्समध्ये चांगला आनंद देऊ शकतात. 

ADVERTISEMENT

काही सेक्स पोझिशन्समध्ये मिळतो परमानंद 

लहान उंची असणारा जोडीदार जर उंच जोडीदाराच्या वर असेल तर सेक्स पोझिशनमध्ये अधिक आनंद मिळतो. ही एक अत्यंत रोमांचक आणि परमोच्च आनंद देणारी सेक्स पोझिशन आणि स्थिती असते. कारण अशावेळी महिलांना चरमसुख मिळण्याचा अधिक फायदा असतो. याशिवाय सेक्सदरम्यान स्पूनिंग (Spooning Sex) अथवा स्टँडिंग सेक्स (Standing Sex) करतानाही कमी उंची असण्याचा फायदा होतो. पुरूष आणि स्त्री दोघांनाही यादरम्यान सेक्सचा फायदा मिळतो. तसंच यामध्ये अनेकदा तुम्ही वेगवेगळे अनुभवही एकमेकांसह घेऊन एकमेकांना परमोच्च सुखाचा आनंद देण्याचा प्रयत्न करू शकता. 

वास्तविक सेक्स करताना तुमच्या भावना आणि प्रेम महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची उंची काही सेक्स पोझिशनमध्ये समस्या ठरत असली तरीही तुम्ही इतर सेक्स पोझिशनचा नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT