ADVERTISEMENT
home / नातीगोती
How to become your child best friend

मुलांशी अशी करा मैत्री, फॉलो करा या पॅरेंटिंग टिप्स

आईबाबा होणं जितकं सोपं तितकंच एक चांगलं पालक होणं कठीण आहे. कारण पालकत्त्व ही खूप मोठी आणि नाजूक जबाबदारी आहे. बऱ्याचदा पालक आदर्श पालक होण्याच्या प्रयत्नात मुलांवर परफेक्ट होण्याचं विनाकारण ओझं टाकत असतात. वास्तविक आयुष्यात कुणीच परफेक्ट नसतं अगदी पालक सुद्धा. पण तरीदेखील पालकांना नेहमी मुलांनी अभ्यासात, अॅक्टिव्हिटीजमध्ये नेहमी अव्वलच असावं असं वाटत असतं. मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकल्यामुळे नकळत पालक मुलांपासून दूर जातात. यासाठीच आयुष्यभर मुलांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर आधी त्यांचे चांगले मित्र बना. मुलांची सुख-दुःख जाणून घ्या. यासाठीच फॉलो करा या सोप्या पॅरेंटिंग टिप्स

मुलांशी मैत्री करण्यासाठी सोप्या पॅरेंटिंग टिप्स

मुलांशी मैत्री करणं सोपं असतं. मात्र त्यासाठी मुलांसमोर तुम्ही नेहमी खरंच वागायला हवं. कारण मुलं तुमचं ऐकतात कमी  मात्र तुमच्याप्रमाणे वागण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतात. यासाठी या काही सोप्या टिप्स फॉलो करा.

  • मुलांच्या प्रत्येक प्रश्न, शंका, समस्यांकडे लक्ष द्या. जरी तुम्हाला त्या सोडवता नाही आल्या तरी त्यांचे नीट ऐकून घ्या आणि त्यांना समजेल अशा शब्दात त्यांना उत्तर द्या. प्रत्येक पालकासाठी हा एक मोठा टास्क असतो. कारण मुलांचे  प्रश्न कधी संपतच नाहीत. मात्र हा टास्क एकदा जमला की पुढचं सारं अगदी सोपं होतं.
  • तुमच्या घरातील, कामाच्या जबाबदाऱ्या कितीही मोठ्या असल्या तरी पालकत्त्वाच्या जबाबदारीकडे  दुर्लक्ष करू नका. कारण तुमची मुलं चांगली निपजण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासाठी दररोज थोडा वेळ काढणं गरजेचं आहे.लहान मुलांना का करू नयेत गुदगुल्या
  • जेव्हा तुम्ही  मुलांच्या सोबत काहीतरी अॅक्टिव्हिटी करत असता तेव्हा तुमचे दुसरे कोणतेच काम करू नका. पूर्ण वेळ फक्त मुलांना द्या. त्यामुळे जरी तुम्ही त्यांना कमी वेळ दिला तरी तुम्ही पूर्ण वेळ त्यांच्यासाठी दिल्यामुळे त्यांच्यासोबत तुमचे चांगले बॉन्डिग तयार होईल. मुलांना तुमच्या इतर जबाबदाऱ्या माहीत झाल्या तर ती स्वतःहून तुम्हाला सहकार्य करतील. जाणून घ्या सर्वांसमोर का हट्ट करतात लहान मुलं, करा हे उपाय
  • मुलांना आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही मुलांपासून दूर जाऊ शकता. कारण तुम्ही मदत केली नाही तर मुलं तुमच्या घरातील मदतनीस, मित्रमंडळी अशा इतर लोकांच्या मदतीची अपेक्षा करतील. कदाचित या प्रयत्नात त्यांची फसवणूक होऊ शकते.
  • मुलं तुमचं ऐकतात कमी मात्र ते तुमचं आचरण शंभर टक्के फॉलो करतात. कारण प्रत्येक मुलासाठी आधी त्याचे आईबाबा हाच एक उत्तम आदर्श असतात. प्रत्येकाला सुरुवातीला आपल्या आईबाबांप्रमाणेच व्हायचं असतं. यासाठी मुलांसमोर कधीच चुकीचे वागू नका. नाहीतर मुलं तुमचं कधीच ऐकणार नाहीत. उशीरा का बोलू लागतात मुलं, उच्चार शिकवण्यासाठी या टिप्स आहेत फायदेशीर
  • दररोज झोपण्यापूर्वी मुलांना जवळ घ्या. त्यांच्यासोबत प्रार्थना म्हणा. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा. कारण मुलांना तुमच्या महागड्या गिफ्टपेक्षा सर्वात जास्त तुमचं प्रेम, स्पर्श यांची गरज असते. 
  • घरातील छोट्या मोठ्या निर्णयामध्ये त्यांना सामावून घ्या. त्यांना तुम्ही घरातील जबाबदारीत सहभागी करून घेतल्यामुळे त्यांना तुमच्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर वाटतो. जो आयुष्यभर कधीच कमी होत नाही. 
08 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT