ADVERTISEMENT
home / Family
Anger Management During An Argument

जोडीदाराबरोबर वाद झाल्यावर राग येत असेल तर या उपायांनी करा शांत 

माणूस म्हटला की भावनाप्रधान असणारच! प्राण्यांना काय झाडांना देखील भावना असतात हे ही सिद्ध झाले आहे. मग आपण तर सामान्य माणसे आहोत. त्यामुळे कधी कधी आपला आपल्या भावनांवरचा ताबा सुटतो. तुमच्याबाबतीतही असे कधी ना कधी घडले असेलच की भांडणात किंवा वादात तुम्ही तुमच्या जोडीदाराला जे बोलू नये ते बोलता! जेव्हा आपल्या भावना, विशेषतः राग आपल्याला आवरता येत नाही तेव्हा असे होते.

राग येणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया 

Anger Management During An Argument
Anger Management During An Argument

राग ही एक प्रकारची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, ज्यामध्ये लोक सहसा विचार न करता प्रतिक्रिया देऊ लागतात. पण या परिस्थितीत, कधीकधी राग आलेली व्यक्ती स्वत:ला, इतरांना आणि त्याच्या सभोवतालच्या गोष्टींना देखील हानी पोहोचवते. रागावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण आहे. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणारे बरेच लोक असतात, तर काही लोकांचे रागावर अजिबात नियंत्रण नसते. रागावर नियंत्रण नसणे हे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. तसेच ते आपल्या नात्यांसाठीही चांगले नाही. नात्यात मतभेद होतातच पण त्यासाठी रागावणे योग्य नाही. भांडण झाल्यावर लोकांना अनेकदा अपराधी वाटतं कारण ते रागाच्या भरात नको ते बोलून गेलेले असतात. यामुळे कधी कधी संबंधही बिघडू शकतात. त्यामुळे आपापसातील भांडण निरोगी पद्धतीने हाताळणे आणि रागावर नियंत्रण ठेवणेच शहाणपणाचे आहे. यासाठी रिलेशनशिपमध्ये रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे प्रत्येकानेच शिकायला हवे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारावरचा राग नियंत्रित करणे कठीण जात असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. 

दीर्घ श्वास घ्या आणि राग सोडून द्या

जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपली श्वसनाची गती वाढते, आपला रक्तदाब वाढतो तसेच आपली हृदयगती देखील वाढते हे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणून, रागावर नियंत्रण सुधारण्याचा सर्वोत्तम आणि जलद मार्ग म्हणजे दीर्घ श्वास घेणे. तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून, तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनिक अवस्थेबद्दल जागरूक होऊ शकता. आपले शरीर शांत करण्यासाठी आणि राग कमी करण्यासाठी, काही मिनिटे दीर्घश्वसन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

राग कमी करण्यासाठी दुसरीकडे लक्ष वळवा 

यासाठी तुम्ही 10-सेकंदाचा नियम वापरून पाहू शकता. काहीवेळा रागाच्या भरात बोललेल्या गोष्टी जरी तुमचा हेतू नसला तरीही समोरच्या व्यक्तीला सर्वात जास्त दुखावतात. म्हणूनच जेव्हा खूप राग येतो तेव्हा तो वाढू नये म्हणून एक ग्लास पाणी पिऊन किंवा दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतःचे लक्ष दुसरीकडे वळवा. 

ADVERTISEMENT
Anger Management During An Argument
Anger Management During An Argument

सतत सायलेंट मोडमध्ये जाऊ नका

जेव्हा तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे मतभेद होतात, तेव्हा कधी कधी तुम्हाला एकट्याने कुठेतरी निघून जावेसे वाटते किंवा जोडीदाराला इग्नोर करावेसे वाटते.पण हा रागावरचा उपाय नाही कारण यामुळे तुम्हाला थोडा वेळ शांतता मिळेल परंतु यामुळे तुमचा राग जाणार नाही.  

नातेसंबंधाचे विश्लेषण करा

तुमच्या नात्यात खरी समस्या काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक परिस्थितींचा सकारात्मक पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करा. असे एक तंत्र आहे जे लोकांचा विचार करण्याची पद्धत बदलण्यास मदत करते. त्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराची मदत घेऊ शकता.

प्रत्येकजण परिपूर्ण नसतो हे मान्य करा. तुमच्या चुका मान्य करा आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या चुकाही माफ करू शकता हे मान्य करा. एकमेकांशी शांतपणे बोला व समस्येचे निराकरण करा. राग हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही तर त्यामुळे समस्या आणखी वाढतात. 

Photo Credit- istock

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

06 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT