ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
How to choose the Perfect watermelon in Marathi

असं खरेदी करा परफेक्ट कलिंगड, फॉलो करा या टिप्स

उन्हाळ्यात कलिंगडाचा सीझन असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड विकत मिळतं. कलिंगड पाणीदार असल्यामुळे तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असतं. त्यामुळे कलिंगड खाण्यामुळे शरीराला चांगला आराम आणि थंडावा मिळतो. मात्र यासाठी बाजारातून कलिंगड विकत घेताना तुम्हाला काही खास गोष्टी माहीत असायला हव्या. तसंच तुम्हाला कलिंगडांच्या राशींमधून परफेक्ट कलिंगड निवडता येईल. यासाठी जाणून घ्या या सोप्या टिप्स

कसं निवडावं कलिंगड

कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अॅंटि ऑक्सिडंट्स असतात. मात्र यातील पोषक घटक शरीराला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही लालबुंद, पाणीदार, पिकलेलं आणि गोड कलिंगड खाता. कलिंगड विक्रेत्याकडे कलिंगडांच्या राशी असतात. तुम्ही जे कलिंगड निवडता तेच तुम्हाला कापून दिलं जातं. त्यामुळे एवढ्या कलिंगडांमधून तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये असणारं परफेक्ट कलिंगड स्वतःच निवडावं लागतं. बऱ्याचदा कलिंगड विकत आणल्यावर ते आतून खराब झालेलं, कच्चं अथवा लाल नसतं. असं अर्धवट पिकलेलं कलिंगड आरोग्यासाठी योग्य नसतं कारण त्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे शरीरात इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. यासाठी कलिंगड निवडाताना या गोष्टी ठेवा लक्षात यासोबतच वाचा कलिंगड खाण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Watermelon Benefits In Marathi)

कलिंगडाचा आकार

कलिंगड विविध आकारामध्ये उपलब्ध असतात. काही गोल असतात तर काही अंडाकृती आकाराची असतात. म्हणूनच जास्त मोठं अथवा जास्त लहान आकाराचं कलिंगड निवडू नये. नेहमी मध्यम आकाराचं कलिंगड निवडावं. शिवाय कलिंगडाला कुठे चिर पडली आहे अखवा ओरखडा आला आहे असं कलिंगड निवडू नका. काही वेळा कलिंगडावर टेंगूळासारखा उंचवटा दिसतो असं कलिंगड योग्य पद्धतीने न पिकवल्यामुळे ते खराब झालेलं असतं. असं कलिंगड विकत न घेणंच तुमच्या फायद्याचं ठरेल.

कलिंगडावर असलेले पिवळे डाग

जर कलिंगड पिवळं पडलं असेल तर ते खाण्यासाठी योग्य नाही असं समजा. कारण आजकाल कलिंगड पिकवण्यासाठी नायट्रोजन खतात मिसळं दातं. ज्या कलिंगडामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त झालं असेल तर त्यावर पिवळे डाग पडतात. असं कलिंगड खाणं आरोग्यासाठी योग्य नाही. पण एका बाजूला असलेला छोटा पिवळसर डाग मात्र असणं चुकीचं नाही कारण जमीनीवर कलिंगड पिकत असल्यामुळे जमिनीकडचा भाग कालांतराने पिवळसर पडतो. पण पूर्ण कलिंगड पिवळं पडलं असेल तर ते मुळीच खरेदी करू नका.  

ADVERTISEMENT

कलिंगडाला छिद्रं पडणं 

तुम्ही विकत घेत असलेल्या कलिंगडावर छिद्र असेल तर ते मुळीच विकत घेऊ नका. कारण कीड लागण्यामुळे अथवा लवकर पिकण्यासाठी हॉर्मोनल इंजेक्शन देण्यामुळे कलिंगडाला छिद्रं पडू शकतात. अशा प्रकारची कलिंगड आकाराने मोठी दिसतात. मात्र ती लवकर पिकल्यामुळे शरीरासाठी पोषक नसतात.

वजन पाहून विकत घ्या

कलिंगड विकत घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याचं वजन हाताने तोलून पाहणं. आकाराच्या मानाने जर तुम्हाला कलिंगड हलकं वाटलं तर खरेदी करू नका. कारण पिकलेलं कलिंगड वजनाला जास्त असतं. त्यामुळे ते नेहमी हाताने तोलून मापून अंदाज घेऊन मग विकत घ्यावं. इंजेक्शनने हॉर्मोन्स देऊन पिकवलेली कलिंगडं मध्यभागी पोकळ असतात, त्यामुळे वजनाला हलकी लागतात. 

11 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT