ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
असा काढा कढईचा राप

कढईचा तेलकटपणा घालवण्यासाठी सोप्या ट्रिक्स

 किचनमध्ये तळणीचे पदार्थ केल्यानंतर त्या पदार्थांची चव चाखायला आपण सगळेच उत्सुक असतो. पण पुरी, भजी किंवा तळणीचे पदार्थ खाऊन झाल्यानंतर ती भांडी घासणे डोक्याला ताप होऊ लागतो. सर्वसाधारणपणे सगळ्यातच घरात तळणीचे पदार्थ करण्यासाठी कढईचाच वापर करतात. ही कढई धुवायची असेल तर किचनच्या सिंकमध्ये काहीही असू नये असे वाटते. तुमच्या घरीही वरचेवर तळणीचे पदार्थ होत असतील अशावेळी तुम्ही कढईचा तेलकटपणा घालवण्यासाठी सोप्या काही ट्रिक्स वापरायला हव्यात. या ट्रिक्स वापरल्या तर कढईचा तेलकटपणा जातो. इतकेच नाही तर तुम्हाला भविष्यात कधीही तळणीचे पदार्थ केले तरी देखील  ही ट्रिक कामी येईल.

किचनमध्ये मसाल्याचा डबा असायला हवा असा

असा काढा कढईचा चिकट राप

असा काढा कढईचा राप

तळणीसाठी तुम्ही सतत एकाच कढईचा वापर करत असाल तर ती कढई चिकट होणे अगदी साहजिक आहे. कढई कशी साफ करायची हे जाणून घ्यायचे असेल तर जाणून घ्या या काही ट्रिक्स 

  1. तळणीचे पदार्थ तळून झाल्यानंतर त्यामधील तेल एका बाजूला काढून ठेवा. तेल काढल्यानंतर ही कढई थेट धुवायला टाकू नका. एका भांड्यात कडकडीत तेल गरम करुन घ्या. कढईत भांड्याचा साबण किंवा लिक्विड घालून तुम्ही ते काही तासासांठी ठेवून द्या. काही वेळ तुम्ही जर भांडे तसेच ठेवले तर त्यातून तेलाचा तवंग निघून जायला मदत मिळते. 
  2. कढई धुण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल तर ती कढई थेट सिंकमध्ये टाकू नका. कारण असे केल्यामुळे इतर भांड्याने तेल लागण्याची शक्यता असते. त्यामुळे असे भांडे सिंकमध्ये टाकू नका. त्या भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये लिक्विड सोप टाका.ते पाणी चांगले उकळून घ्या त्यामुळेही कढईचा राप निघून जाण्यास मदत मिळेल. 
  3. तेलकट कढई घेऊन तुम्ही त्यामध्ये लिंबाची फोड किंवा लिंबाचे तुकडे घालून ते पाणी उकळू द्या. लिंबामुळे कढईला लागलेला तेलाचा वास निघून जाण्यास मदत मिळेल. 
  4. एकच कढईत तुम्ही सतत तळणीचे पदार्थ करत असाल तर त्यामध्ये जास्त काळासाठी तेल ठेवू नका. कारण त्यामुळे ते तेल जास्त टिकून राहते. इतकेच नाही तर कढईचे बाहेरील भागही तेलाच्या रापामुळे जाड होते. त्यामुळे तळणीच्या पदार्थांचे काम झाल्यानंतर तुम्ही लगेचच कढई काढून खाली ठेवा. 
  5. कढई स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ती भिजत देखील घालून ठेवू शकता. कढईमध्ये तेल आणि लिक्विड सोप घालून ठेवला आणि काही काळाने ती कढई धुतली तर कढई स्वच्छ निघण्यास मदत मिळेल.

पुन्हा वापरु नका जुने तेल

तळणीचे पदार्थ तेलात तळताना तुम्हाला त्या तेलाचा वापर किती वेळासाठी करायचा आहे हे देखील माहीत हवे. 

ADVERTISEMENT
  1. तळणीचे पदार्थ तळून झाल्यानंतर ते तेल फारतर एकदा किंवा दोनदा वापरा. त्यानंतर तेल फेकून देणेच चांगले असते. 
  2. मासे किंवा तुम्ही काही मसालेदार पदार्थ तळले असतील तर तुम्ही अजिबात ते तेल पुन्हा वापरु नका. 
  3. जुने तेल तळणीसाठी वापरले असेल तर त्यातून फेस येऊ लागतो. ते तेल अधिक वाढत जाते. पदार्थाला ते अधिक चिकटते. जे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे या गोष्टीचीही काळजी घ्या. 

आता कढईतील तेल वापरुन झाल्यानंतर कढई कशी स्वच्छ करायची असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

अधिक वाचा

पाक बनविण्याची सोपी पद्धत, नाही फसणार पदार्थ

24 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT