ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to clean up broken glass safety tips in marathi

काचेची वस्तू फुटल्यास, स्वच्छता करताना अशी घ्या काळजी

काचेच्या वस्तू अथवा साहित्य अतिशय नाजूक आणि मनमोहक असतं. स्वयंपाक घरात काचेचे कप, ग्लास, डिनर सेट असं अनेक साहित्य असतं. काचेचा आरसा अथवा सजावटीच्या वस्तू नेहमी सांभाळाव्या लागतात. कारण नाजूक असल्यामुळे त्या तुटतात आणि काचेचा चुरा घरभर पसरतो. चुकून अशी एखादी काचेची वस्तू हातातून निसटली आणि फुटली की, नुकसान झाल्याचं वाईट वाटतंच. पण सर्वात जास्त चिंता वाटते ती जमिनी स्वच्छ कशी करावी. काच धारदार असल्यामुळे सावधपणे स्वच्छता न केल्यास हाताला दुखापत होऊ शकते. यासाठी जाणून घ्या काच फुटल्यास स्वच्छता करण्यासाठी सोप्या टिप्स, यासोबतच वाचा क्रॉकरी सेट जास्त काळ टिकावे यासाठी सोप्या टिप्स, स्वयंपाकघरासाठी असे निवडा परफेक्ट स्टोरेज कंटेनर, आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)

काच फुटल्यास स्वच्छतेसाठी सोप्या टिप्स (how to clean up broken glass safely tips in marathi) 

काचेची वस्तू फुटली की घरात एकच धावपळ होते ती म्हणजे फुटलेले काचेचे तुकडे लवकर स्वच्छ करण्यासाठी, याचं कारण काच नाजूक असल्याने फुटताना तिचा चुरा होतो आणि घरभर पसरतो. जर चुकून एखादा तुकडा स्वच्छ करता आला नाही अथवा अडचणीच्या जागी राहिला. तर तो नंतर हातापायाला लागून दुखापत होऊ शकते. यासाठी काच फुटल्यावर ती त्वरित आणि सावधपणे स्वच्छ करावी लागते. यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

हातात मोजे आणि पायात चप्पल घाला

काच तुटली की ती फुटून तिचे तुकडे कुठेही पसरू शकतात. नाजूक आणि धारदार असल्यामुळे ती हातापायात खोलवर घूसून दुखापत होऊ शकते. यासाठीच फुटलेली काच स्वच्छ करताना हातात मोजे आणि पायात चप्पल घालायला विसरू नका. 

सर्वात आधी मोठे तुकडे उचला 

काच फुटली की छोटे मोठे अनेक तुकडे होतात. म्हणूनच काचेचं सामान फुटल्यावर ते स्वच्छ करताना सर्वात आधी मोठे तुकडे उचला. उचलेले तुकडे एखाद्या कागदावर जमा करा आणि मग छोटे तुकडे जमा करा. त्यानंतर उरलेला काचेचा चुरा स्वच्छ करण्यासाठी केरसुणी आणि सुपलीचा वापर करा. मात्र लक्षात ठेवा त्यानंतर केरसुणी झाडून घ्या आणि सुपली स्वच्छ धुवून घ्या.

ADVERTISEMENT

व्हॅक्यूम क्लिनर 

काचेचं तुटलेलं सामान गोळा करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे व्हॅक्यूम क्लिनर वापरणे. कारण व्हॅक्यूम क्लिनर त्याच्या क्षमतेनुसार सर्व छोटे आणि मोठे काचेचे कण आणि तुकडे आत ओढून घेईल. ज्यामुळे तुमच्या हाताला अथवा पायाला दुखापत होण्याचा धोका टळेल. 

उकडलेला बटाटा

काच फुटल्यावर तुकडे  स्वच्छ कसे करावे असा प्रश्न पडला असेल. तर हा एक नवीन आणि हटके उपाय करून पाहा. यासाठी एक उकडलेला बटाटा घ्या त्याचे दोन तुकडे करा आणि त्या बटाट्याने काचेचे तुकडे टिपून घ्या. त्यानंतर तो बटाटा फेकून द्या.

ओल्या फडक्याचा वापर करा

स्वयंपाक घरात काचेची वस्तू तुटली तर ती स्वच्छ करताना मोठे आणि लहान तुकडे वेगळे केल्यावर उरलेला काचेचा भुगा स्वच्छ करण्यासाठी ओलं फडकं वापरा. कारण ओलाव्यामुळे त्या फडक्याला काचेचे बारीक तुकडे चिकटतील. स्वच्छता झाल्यावर ते कापड फेकून द्या नाहीतर ते स्वच्छ करताना तुमच्या हाताला दुखापत होऊ शकते.

सूचना – फुटलेल्या काचेचे तुकडे थेट कचऱ्याच्या डब्यात न टाकता वेगळ्या पिशवीत गोळा करा. सफाई कामगारांकडे कचरा देताना त्यात काचेचे तुकडे आहेत याची कल्पना द्या. नाहीतर तुमचा कचरा स्वच्छ करताना इतरांना दुखापत होण्याची शक्यता आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून या साध्या गोष्टी नीट पाळा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT