संपूर्ण भारतात महिलांसाठी वटपौर्णिमा सणाचा दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो. वटपौर्णिमा माहिती असण्यासोबतच या दिवशी वटपौर्णिमा शुभेच्छा आवर्जून दिल्या जातात. हा दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने महिलांना छान नटता-थटता ही येतं, तेही अगदी छान पारंपारिकरित्या. या दिवशी सोळा श्रृंगार आणि नटण्याचं एक वेगळंच महत्त्व असतं. सोळा शृंगार म्हणजे सौंदर्याचे 16 अलंकार असतात. जे महिलांना परिधान करायचे असतात. वटपौर्णिमेचा सण हा जून महिन्यात येतो. त्यामुळे पावसालाही सुरूवात झालेली असते आणि वातावरणही आल्हाददायक झालेलं असतं. ज्यांचं वटसावित्री पूजेचं पहिलं वर्ष असेल त्यांच्यासाठी तर हा सण जास्त महत्त्वपूर्ण असतो. कारण या सणाच्या निमित्ताने माहेराकडून खास साडी आणि वाण येतं. चला पाहूया या खास सणासाठी तुम्हाला कसं छान तयार होऊन मनमोहक लुक मिळवता येईल.
नऊवारी साडी (Nauvari Saree)
नऊवारी साडी ही आपली पारंपारिक साडी आहे. जी आपल्या मराठी संस्कृतीचं प्रतीक आहे. आजही नऊवारी साडीला सणवार आणि लग्नात पहिली पसंती मिळते. वटसावित्रीच्या पूजेसाठी तुम्हाला एकदम पारंपारिक आणि सुंदर लुक हवा असेल तर नऊवारी साडी नेसणं मस्ट आहे. जर तुम्हाला नऊवारी साडी नेसता येत नसेल तर रेडीमेड नऊवारीचा ऑप्शनही आहेच. छानपैकी नऊवारी नेसून वडाची पूजा करतानाचे तुमचे फोटो नक्कीच छान येतील यात शंका नाही. कारण या साडीमुळे आपल्या एक वेगळाच ग्रेस प्राप्त होत असतो.
खणाची साडी (Khan Saree)
जर तुम्हाला नऊवारी साडी नसणं शक्य नसेल तर सध्या ट्रेंडमध्ये असलेली खणाची साडी तरी नक्की नेसा. खणाची साडी ही वजनाला हलकी आणि वावरायला ही सहज असते. खणाच्या साडीमध्ये सध्या खूप छान व्हरायटी पाहायला मिळत आहे. तसेच खणाच्या साडीने तुम्हाला पारंपारिक लुकही मिळेल. सिल्क किंवा इतर साड्यांपेक्षा पावसाच्या दिवसात सणाची साडी कधीही कंफर्टेबल नाही का? तुम्हाला खणाची साडी नेसायची नसल्यास खणाचा कुर्ता किंवा खणाचा वनपीसही घालता येईल.
नथीचा नखरा (Nath)
आता साडी नेसली म्हटल्यावर नथ घालणं तर आलंच. तुम्ही नऊवारी नेसली असो वा पाचवारी तुमच्या लुकला चारचांद लावण्याचं काम नथ नक्कीच करेल. नेहमीच्या नाकातल्या चमकीपेक्षा नथीमुळे तुमचा लुक लगेच बदलतो. नथीचं वैशिष्ट म्हणजे ही कोणत्याही आऊटफिट अगदी हिट दिसते. जसं नऊवारी असो कुर्ती असो वा ट्रेडीशनल खणाचा वनपीस नथ प्रत्येक आऊटफिटवर सुंदरच दिसते.
मेहंदीऐवजी आलता (Aalta)
लॉकडाऊनमुळे मेंदीचा कोन मिळणं किंवा मेंदी काढणारे मिळणं तर कठीणचं आहे. त्यात तुम्हाला जर मेंदी काढता येत नसेल पण मेंदीची आवड असेल तर काय करायचं. तर यावर उत्तम तोडगा म्हणजे आलता. खरंतर सणाच्या निमित्ताने महिला आवर्जून मेंदी काढतात. पण ते शक्य नसल्यास किंवा काही हटके करायचं असल्यास आलता हे ऑप्शन चांगलं आहे. लाल रंगाच्या आलता हातावर अगदी उठून दिसतो आणि लगेच पुसताही येतो.
रंगीबेरंगी बांगड्या (Bangles)
पारंपारिक नटणं म्हणजे बांगड्या घालणं हे आलंच. तुमच्याकडे हिरव्या बांगड्या नसतील तरी नो प्रोब्लेम तुम्ही साडीला मॅचिंग बांगड्याही घालू शकता. यामुळे तुमचा लुक जास्त छान दिसेल.
दागिने (Jewellery)
Pintrest
आता छान लुकमध्ये चारचांद लावण्यासाठी दागिने तर घालायलाच हवेत. श्रृंगाराच्या संकल्पनेत दागिन्यांचं महत्त्व फार आहे. सुवासिनींची ओळख म्हणजे तिचे दागदागिने होय. दागिन्यांमध्ये कानातले झुमके, बुगडी, गळ्यातील हार पायातले पैंजण आणि कपाळावरची नाजून चंद्रकोर किंवा टिकली ही तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर टाकेल.
मेकअप (Makeup)
वटपौर्णिमेच्या दिवसात पावसाला सुरूवात झालेली असते. त्यामुळे तुम्हाला मेकअपही पावसाचा अंदाज घेऊन करावा लागेल. नॅचरल लुक्स असलेला मेकअप करणंही कधीही उत्तमच असतं. पावसाच्या शक्यतेमुळे वॉटरप्रूफ मेकअपला पसंती द्या. बेसिक मेकअपसोबत तुमची साडी किंवा कुर्ता हा गोल्डन थीमचा असेल तर तुम्ही गोल्डन आयशॅडो लावू शकता. जर तुम्हाला हेवी मेकअप नको असेल तर छान आणि सोपं काजळ, मस्कारा आणि आयलायनर लावा. तुमच्या आऊटफिटला साजेशी टिकली लावायला विसरू नका. तसंच साडीच्या रंगाला कॉम्प्लिमेंट करणारी लिपस्टीक लावा. खरंतर मास्कमुळे लिपस्टीक नाही लावली तरी चालेल. अगदीच काही नाही तर तुम्ही लिपबाम लावू शकता.
मास्क (Festive Mask)
हो…कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर पडताना मास्क तर हवाच. आता सणासुदीचा लुक म्हटल्यावर मास्कही तसाच हवा. आजकाल मास्कमध्येही फेस्टीव्ह सिझनला शोभणारे मास्क आले आहेत. जसं पैठणी फॅब्रिकचा मास्क किंवा सिल्कच्या कापडाचा मास्क. तुमच्या साडीला किंवा कुर्त्याला मॅचिंग असा छानसा मास्क घालायला विसरू नका.
मग या वटपौर्णिमेला सुंदर आणि पारंपरिक लुकसाठी वरील टिप्स नक्की फॉलो करा. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.