ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to get rid of pests on flower plants in Marathi

फुलझाडाला सारखी लागत असेल कीड तर करा हे सोपे उपाय

तुमच्या घरी बाल्कनी, अंगण अथवा टेरेसवर तुम्ही छोटेखानी फुलबाग फुलवली आहे का? गुलाब, मोगरा, जास्वंद, चाफा, जाई, जुई अशी अनेक फुलझाडे घरात असतील तर मन प्रसन्न आणि शरीर निरोगी राहतं. मात्र त्यासाठी फुलझाडांची नीट काळजी घ्यायला हवी. कमी माती आणि अपुऱ्या जागेमुळे कधी कधी फुलझाडांना कीड लागण्याची शक्यता असते. कीड लागली की झाडाचा विकास होत नाही आणि ते कोमेजून मरून जाते. यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घरातील फुलबाग नेहमीच टवटवीत राहिल.

Vaastu Tips : घरात कोणती झाडे लावावी आणि त्यांची लागवड

फुलझाडांची कशी राखावी निगा –

झाडाला कीड लागू नये यासाठी नियमित फुलझाडांची निगा राखणं गरजेचं आहे.

पाणी शिंपडा

तुम्ही झाडांना किती आणि कसं पाणी देता यावर झाडाची वाढ अवलंबून असते. कारण फुलझाडे नाजूक असतात आणि कुंडीत लावलेली असल्यामुळे त्यांना जास्त पाण्याची गरज नसते. बऱ्याचदा अती पाण्यामुळे झाडे सडतात अथवा बुरशीमुळे खराब होतात. यासाठी झाडांना भांड्यातून पाणी देण्याऐवजी स्प्रे बॉटलने पाणी शिंपडा अथवा स्प्रे करा. जर तुम्हाला फुलं अथवा झाडावर बुरशी आलेली दिसत असेल तर त्यावर कडुलिंबाचे अथवा गोमूत्राचे पाणी स्प्रे केल्याने कीड मरते.

ADVERTISEMENT

कडुलिंबाच्या तेलाचा करा वापर

कडुलिंबाच्या तेलानेही फुलझाडावरील कीड मरून जाते. यासाठी एक कप पाण्यात थोड कडुलिंबाचे तेल मिसळा आणि ते पाणी झाडाच्या पानांवर शिंपडा. कीड लागताच असा उपाय केल्यामुळे कीड लगेच मरून जाते. कारण कडुलिंब अॅंटि बॅक्टेरिअल आहे त्यामुळे तुमची फुलं आणि झाड निर्जंतूक होण्यास मदत होते. 

जाणून घ्या पानफुटी वनस्पतीचे फायदे आणि उपयोग (Panfuti Plant Uses In Marathi)

हळदीचा करा वापर 

हळद देखील अॅंटि बॅक्टेरिअल आहे. त्यामुळे फुलझाडांवरील कीड मारण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. बऱ्याचदा मातीत कीड असेल तर ती झाडांवर लागून फुलं खराब होतात. यासाठी कीड मुळापासून नष्ट करायला हवी. जर तुम्ही एक किलो माती झाडात वापरली असेल तर एक चिमूट भर हळद मातीत मिसळा आणि त्यात पुरेसे पाणी टाका. त्यामुळे हळद मातीत मिसळेल आणि कीड नष्ट होईल. 

झाडाच्या कुंडीत कीड येत असेल तर करा सोपे उपाय

ADVERTISEMENT

लसणीच्या पाकळ्यांचा करा उपाय

फुलझाडांवरील कीड मारण्याचा हा आणखी एक सोपा मार्ग आहे. यासाठी पाण्याच्या बॉटलमध्ये एक चमचा लसणाची पेस्ट मिसळा आणि ते पाणी एकत्र करून थोडावेळ तसेच ठेवा. पाण्यात लसणाचा अर्क मिसळला की ते पाणी फुलझाडावर शिंपडा अथवा स्प्रे करा. 

03 Dec 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT