ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
नखांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

नखांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

नखं स्वच्छ आणि चमकदार असावीत असं प्रत्येकीला वाटत असतं. मात्र नखांचा पिवळेपणा तुमच्या संकोचाला कारणीभूत ठरू शकतो. कारण पिवळी नखं तुमच्या हाताचं सौंदर्य कमी करतात. नखं पिवळी पडण्याची अनेक कारणं आहेत. अयोग्य आहार, चुकीच्या सवयी, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींमुळे तुमची नखं पिवळी पडू शकतात. मात्र घरातच काही सोपे उपाय नियमित केले तर नखांचा पिवळेपणा काढून टाळणं सहज शक्य आहे. यासाठी या टिप्स जरूर फॉलो करा.

नखांना टुथपेस्ट लावा

नखं अस्वच्छ राहिल्यामुळे पिवळी दिसत असतील तर तुम्ही ती चक्क तुमच्या दात घासण्याच्या पेस्टने स्वच्छ करू शकता. यासाठी टुथपेस्ट नखांवर चोळा आणि पाच मिनीट नखे तशीच ठेवा. नखं स्वच्छ करण्याच्या ब्रशने हळूवार चोळून तुम्ही कोमट पाण्याने नखं आणि हात स्वच्छ करू शकता. 

टी ट्री ऑईलचा करा वापर

नखांचा पिवळेपणा दूर करण्याचा आणखी एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे नखांना टी ट्री ऑईल लावा. कारण जर तुमच्या नखांना एखाद्या त्वचेच्या विकारामुळे इनफेक्शन झाले असेल तर त्यामुळेही नखं पिवळी पडू शकतात. अशा वेळी टी ट्री ऑईल त्वचेची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. टी ट्री ऑईल लावल्यावर पाच ते दहा मिनीटांनी तुमची नखं कोमट पाण्याने स्वच्छ करा.

नखांवर लिंबू चोळा

घरात हात पाय आणि नखं स्वच्छ करण्याचा हा एक जुना आणि अतिशय सोपा उपाय आहे. कारण लिंबाच्या रसात ब्लिचिंग एजंट असतात. ज्यामुळे तुमच्या नखांवरील डाग आणि काळेपणा सहज दूर करता येतो. कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये काही मिनीटे हात बुडवून ठेवा. ज्यामुळे तुमच्या नखांमध्ये लिंबाचा रस मुरेल आणि त्वचा मुळापासून स्वच्छ होईल.

ADVERTISEMENT

व्हिनेगरचा करा वापर

व्हिनेगरमुळे डाग दूर होण्यास मदत होते. शिवाय व्हिनेगर नैसर्गिक असल्यामुळे त्याचा तुमच्या नखे अथवा त्वचेवर दुष्परिणाम होत नाही. यासाठी कॉटन पॅडवर थोडं व्हिनेगर घ्या आणि त्याने तुमची नखं स्वच्छ करा. मात्र त्यानंतर कोमट पाण्याने हात आणि नखं धुण्यास मुळीच विसरू नका.

बेकिंग सोडा नखांना लावा

हात, पाय आणि नखं स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडादेखील वापरू शकता. कारण सोड्यामध्येही क्लिंझिंग एजंट असतात. यासाठी पाण्यात थोडा बेकिंग सोडा मिसळा आणि त्याची जाडसर पेस्ट तयार करा. या पेस्टने तुमची नखं आणि नखांजवळची त्वचा स्वच्छ करा. त्यानंतर कोमट पाण्याने हात आणि नखं स्वच्छ करा. ज्यामुळे तुमच्या नखांवरील पिवळेपणा सहज कमी होईल. 

या सोप्या आणि घरी करता येण्यासारख्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्यामुळे तुमचा काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
03 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT