ADVERTISEMENT
home / रेसिपी
असा बनवा घरीच गार्लिक बटर

गार्लिक ब्रेड आवडतो.. घरीच बनवा गार्लिक बटर


 हल्लीच्या मुलांना आपल्या लहानपणीचा नाश्ता म्हणजे पोहा, उपमा अजिबात आवडत नाही. त्यांना काहीतरी चटपटीत आणि चमचमीत हवं असतं. रोज रोज त्यांना बाहेरच्या गोष्टी तर आपण बनवून देऊ शकत नाही. त्यामुळे होतं असं की,बरेच पदार्थ आपल्याला त्यांना घरीच बनवून द्यावे लागतात. सध्या खूप जणांना गार्लिक ब्रेड करताना तुम्ही नक्की पाहिले असेल. रोजच्या बटरला गार्लिकचा फ्लेवर देऊन जो ट्विस्ट आणला जातो. तो खाण्यासारखा असतो. ज्यांना लसूण असा इतरवेळी आवडत नाही पण गार्लिक ब्रेडच्या रुपाने आवडत असेल तर तुम्ही घरीच बाजारासारखा मस्त असा गार्लिक ब्रेड नक्कीच बनवू शकता. स्टोअर करु शकता आणि पाहुणे आल्यावर त्यांच्यासाठी क्विक असा स्नॅक्स बनवू शकता. त्यासाठीच शेअर करत आहोत गार्लिक बटर (Garlic Butter) ची रेसिपी. या सोबत घरीच पेरीपेरी मसाला कसा बनवायचा हे देखील आम्ही शेअर केले आहे.

 तुम्हाला हे माहीत आहे का?

गार्लिक ब्रेड

गार्लिक बटर (Garlic Butter) हे आता आपल्याकडे फार प्रचलित असले तरी देखील त्याचे मूळ हे पॅरिस आहे. फ्रेंच खाद्यसंस्कृतीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात उल्लेख आहे. हे बटर अनेकदा त्यांच्या डिशचा भाग आहे. या बटरला तयार करुन तो फ्रिज्ड केले जाते आणि मग ते दिले जाते. अमेरिकेत या गार्लिक बटरला उपयोग डिपिंग सॉस म्हणून केला जातो. फिश किंवा माशांच्या काही रेसिपीसांठी हा डिपिंग सॉस खूपच चविष्ट आहे असे मानले जाते. माशांना हवी असलेली एक फ्लेवरची किक या बटरमुळे मिळण्यास मदत मिळते. गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे ही पद्धत आलेली आहे. आपल्याकडे फ्रोजन असे गार्लिक बटर मिळते. पण ताजे बनवणे शक्य असल्यामुळे ते घरीच करणे चांगले. 

असा बनवा गार्लिक बटर

गार्लिक बटर

गार्लिक बटर बनवणे हे फार काही कठीण काम नाही. यासाठी तुम्हाला थोडासा वेळ आणि योग्य प्रमाण माहीत हवे. 

साहित्य: 500 ग्रॅम बटर, दोन ते तीन मोठे लसणीचे कांदे, ऑलिव्ह ऑईल, पार्सले, (मीठ आवश्यक असल्यास ) 

ADVERTISEMENT

कृती: 

  • हे बटरच मुळात गार्लिक असल्यामुळे यामध्ये लसणीचा फ्लेवर सगळ्यात जास्त असणे फारच जास्त गरजेचे आहे. त्यासाठी लसूण थोडी जास्त टाकली तरी चालेल. 
  • एका भांड्यात लसणीच्या पाकळ्या घेऊन त्या ओव्हन किंवा तव्यावर चांगल्या मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. 
  • बटरही थोडे मऊ करुन घ्यावे.आता त्यामध्ये मऊ केलेला लसूण थोडा ठेचून घालावा. त्याला थोडासा फ्लो येण्यासाठी त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल घालावे. त्यामध्ये असल्यास पार्सले किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 
  • जर तुम्हाला थोडे वेगळ्या पद्धतीने खायला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये ओरिगॅनोही घालू शकता. ज्यामुळे याची चव अधिक चांगली लागेल. 
  • तर अशाप्रकारे तुमचा गार्लिक बटर तयार आहे जो तुम्ही मस्त ब्रेडवर लावून तो थोडा गरम करुन खाऊ शकता. 
04 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT