ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
Rasmalai_at_home_fb

बाजारात मिळणाऱ्या रसमलाईपेक्षा चविष्ट रसमलई बनवा घरी

 काही खास गोड पदार्थ खायचे असतील तर ते पदार्थ मिठाईवाल्याकडेच खाणे अनेक जण पसंत करतात. पण काही मिठाई घरी हलवाईंपेक्षाही परफेक्ट बनवता येतात. इतकेच नाही तर घरी बनवता त्याची शुद्धताही आपल्याला माहीत असते. आता खव्याचे  किंवा माव्याचे पदार्थच घ्या ना. हे पदार्थ विकत घेताना ते शुद्ध आणि ताजे आहेत की नाही याचा अंदाज येत नाही. खूप जण जुन्या मिठाया आपल्याला देतात. छेना अर्थात पनीर पासून बनवला जाणाऱ्या मिठाईंच्या प्रकारातील सर्वात आवडता असा प्रकार म्हणजे रसमलाई… दूध आणि पनीरचा वापर करुन हा पदार्थ केला जातो. चविष्ट अशी रसमलाई तुम्हाला घरीच बनवायची असेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी

अधिक वाचा :बिनधास्त खा गोड… यावेळी गोड खाल्ले तर नाही वाढणार वजन

रसमलाईसाठी लागणारे पनीर

रसमलाई

रसमलाईसाठी लागणारे पनीर हे ताजे असायला हवे. जर परनीर ताजे असेल तर ते अधिक लुसलुशीत लागते. इतकेच नाही तर त्याची चवही अधिक चांगली लागते. त्यामुळे रसमलईसाठी पनीर बाहेरुन मागवताना ते ताजे आहे की नाही ते तपासून घ्या. जर शक्य असेल तर तुम्ही पनीर  घरीच बनवा. ताज्या दूधापासूनही तुम्हाला पनीर बनवता येऊ शकते. पनीर ताजे असेल तर त्याची चव रसमलाई अधिक चविष्ट आणि चांगली लागते.

अशी बनवा रसमलाई

रसमलाई बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य एकत्र करावे लागेल. हे साहित्य खूप सोेपे आणि सहज उपलब्ध होईल असे आहे 

ADVERTISEMENT

साहित्य:  2 लीटर फुल क्रिम मिल्क, पनीर, आरआरुट पावडर, साखर, ड्रायफ्रुट्सचे काप, केशर

कृती:  

  •  एका मोठ्या भांड्यात दूध घेऊन त्यामध्ये चवीनुसार साखर घ्यावी आणि दूध उकळायला घ्यावे. दूध चांगले उकळून अर्धे झाले की, त्यामध्ये केशर घालून ते चांगले उकळून घ्यावे. आच बंद करुन दूध थंड होऊ द्यावे. 
  • पनीर पासून रसमलाई बनवणे हे तसे सोपे काम नाही. म्हणजे तुम्हाला पनीर आणल्यानंतर ते चांगले मळून घ्यावे लागते. पनीरला स्वत:ची चव नसते. अशावेळी तुम्ही यात थोडी साखर घालून चांगले मळले तरीदेखील चालू शकते. त्याचा एकसंध गोळा होईस्तोवर ते चांगले मळून घ्या. 
  • रसमलाई बनवण्यासाठी आता हातावर पेढ्याएवढा गोळा घेऊन तुम्ही एका बाजूला गरम पाणी गरम करुन त्यामध्ये हा एक एक पेढा सोडा. तो चांगला फुगून वर आला की, मग तयार दूधाच्या मिश्रणात तुम्ही ते टाका. 
  • रसमलाई ही थंड अधिक चांगली लागते. त्यामुळे तुम्ही ती थंड करा. 
  • टीप: कोणतेही ड्रायफ्रुट यामध्ये घालण्याआधी ते छान गरम पाण्यात वाफवून घ्या. पिस्त्याच्या साली त्यामुळे निघण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर बदामाचे काप देखील चांगले निघतात. 

रसमलाई सर्व्ह रताना तुम्ही त्यावर मस्त ड्रायफ्रुट्सचे काप घाला. थंडगार रसमलाई तुम्हाला नक्कीच आवडेल. आता पाहुणे आल्यानंतर तुम्हाला बाहेरुन गोड आणण्याची काहीच गरज नाही तुम्ही घरीच अशी मस्त रसमलाई बनवू शकता

09 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT