ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
homemade hair removal soap

साबणाच्या उरलेल्या वडीपासून बनवा घरीच हेअर रिमूव्हल सोप 

शरीरावर असलेले अनावश्यक केस ही महिलांसाठी एक समस्या आहे, ज्यापासून मुक्त होण्यासाठी स्त्रिया अनेक उपाय करतात. वॅक्सिंग, ट्रिमिंग, शेविंग तसेच पर्मनन्ट हेअर रिमूव्हल साठी लेजर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट व इलेक्ट्रोलिसीस असे उपाय अनेक स्त्रिया करतात. पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर अनावश्यक केस काढण्यासाठी सर्वसाधारणपणे महिला हेअर रिमूव्हर क्रीम किंवा बाजारात उपलब्ध असलेले रेझर वापरतात. पण हेअर रिमूव्हल क्रीम किंवा रेझर वापरल्यानंतर वॅक्सिंग करताना होणारी वेदना किंवा जळजळ आणि खाज खूप वेदनादायक असते. त्यामुळेच या समस्येवर उपाय शोधण्यासाठी, आम्ही तुम्हाला घरी एक खास हेअर रिमूव्हल सोप कसा बनवायचा हे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम खूप सोपे होऊ शकते. हा साबण आपण आपला घरातला उरलेला आंघोळीचा साबण वापरून बनवू शकतो. बहुतेकवेळा आपण साबणाची लहानशी वडी उरली असेल तर ती फेकून देतो. पण जर तुम्ही ही पद्धत वापरून पाहिली तर तुम्ही अत्यंत कमी खर्चात आणि वेदनारहित पद्धतीने अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया होममेड हेअर रिमूव्हल सोप कसा बनवायचा. 

होममेड हेअर रिमूव्हल सोप 

साहित्य – उरलेल्या साबणाचे तुकडे, बेरियम सल्फेट पावडर,  हळद 

कृती – सर्वप्रथम उरलेले साबणाचे छोटे तुकडे घ्या आणि ते वॅक्स हीटरमध्ये ठेवा. जेव्हा ते वितळण्यास सुरवात होईल  तेव्हा उष्णता कमी करा जेणेकरून साबण जळणार नाही परंतु गरम होईल. साबण चांगला वितळल्यावर त्यात एक चमचा बेरियम सल्फेट पावडर आणि चिमूटभर हळद घाला. हे सर्व मिश्रण चांगले मिसळा. बेरियम सल्फेट पावडर वितळलेल्या साबणामध्ये व्यवस्थित मिसळले गेले आहे याची खात्री करा. यानंतर हे मिश्रण तुम्हाला हव्या त्या साच्यात भरा आणि सेट होण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे तुमचा घरगुती केस काढण्याचा साबण तयार करता येतो. 

Homemade Hair Removal Soap
Homemade Hair Removal Soap

होममेड हेअर रिमूव्हल साबण बनवण्याची दुसरी पद्धत 

साहित्य – ग्लिसरीन साबण – एक, बेरियम सल्फेट पावडर – एक टेबलस्पून, टी ट्री ऑइल – काही थेंब, पेट्रोलियम जेली

ADVERTISEMENT

कृती – एक ग्लिसरीन साबण बेस किंवा ग्लिसरीन साबण बार घ्या. साबणाचे बारीक तुकडे करा किंवा किसून घ्या. यानंतर साबण डबल बॉयलर पद्धतीने किंवा मायक्रोवेव्हमध्ये वितळून घ्या. त्यात एक चमचा बेरियम सल्फेट पावडर घाला व नंतर टी ट्री ऑइलचे  काही थेंब घालून मिश्रण एकत्र करा. एका साच्याला पेट्रोलियम जेली लावून त्यात हा साबण ओता व सेट होण्यासाठी ठेवा. तुमचा हेअर रिमूव्हल साबण वापरासाठी तयार आहे.

होममेड हेअर रिमूव्हल सोप कसा वापरावा 

Homemade Hair Removal Soap
Homemade Hair Removal Soap

हा साबण तुम्ही नियमितपणे वापरायच्या आधी नेहमी लक्षात ठेवा की कोरड्या त्वचेवर केस काढण्याचा साबण कधीही वापरू नका. प्रथम तुमची त्वचा पाण्याने ओली करा आणि हा साबण लावा.साबण त्वचेवर हलक्या हाताने घासल्यावर केस आपसूकच निघून जातात. या संपूर्ण प्रक्रियेस थोडा जास्त वेळ लागू शकतो, म्हणून हेअर रिमूव्हिंग घाईघाईत करू नका. त्यासाठी व्यवस्थित वेळ घ्या. केस निघून गेल्यावर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. या साबणाच्या मदतीने हात, पाय, पोट, पाठ इत्यादींवरचे केस काढता येतात. आणि लक्षात ठेवा की हा साबण लावण्याआधी त्वचेवर जर कुठले क्रीम किंवा तेल लावले असेल तर ते आधी आंघोळीच्या साबणाने स्वच्छ धुवा. अन्यथा केस व्यवस्थित निघणार नाहीत. 

ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी हा साबण वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. हा साबण फक्त पाय, हात, पोट, पाठ यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी वापरा. या साबणाचा प्रायव्हेट पार्ट्सवर अजिबात वापर करू नका. तसेच त्वचेवर जखमा असल्यास, तिथे हा साबण लावू नका. जखम पूर्णपणे बरी झाल्यावरच हा साबण वापरा. तसेच हा साबण वापरल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरू नका.

Photo Credit – istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

24 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT