ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
homemade natural shampoo

असा बनवा घरीच नॅचरल केमिकल फ्री शॅम्पू

केस स्वच्छ धुण्यासाठी व ते मऊ होण्यासाठी आपण सर्वजण शॅम्पू वापरतो. आपल्याला बाजारात अनेक ब्रँड्सचे आणि विविध प्रकारचे शॅम्पू मिळतात. जरी त्याने केस स्वच्छ होत असले तरीही त्यात अनेक प्रकारची रसायने असतात. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. पण त्यामुळे शॅम्पू वापरणे तर आपण सोडू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण नैसर्गिक शॅम्पूचा पर्याय निवडला पाहिजे. त्यामध्ये कोणतेही रसायन नसते, ज्यामुळे तुमच्या केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नगण्य असतो.

बाजारात उपलब्ध असणाऱ्या नॅचरल म्हणवल्या जाणाऱ्या शॅम्पूमध्ये नाही म्हटले तरी काही प्रमाणात रासायनिक घटक असतातच. आणि हे शॅम्पू इतर शॅम्पू पेक्षा महाग देखील असतात. पण तुम्ही तुमचा स्वतःचा नैसर्गिक शॅम्पू घरी सहज बनवू शकता. यामुळे तुमचे केस तर चांगले होतीलच शिवाय तुम्ही सहज पैसेही वाचवू शकता. घरी शॅम्पू बनवणे खूप सोपे आहे आणि एकदा तुम्ही ते बनवले की तुम्हाला ते प्रत्येक वेळी वापरायला आवडेल. तर जाणून घेऊया घरीच नैसर्गिक शॅम्पू घरी बनवण्याची सोपी पद्धत –

घरीच अशा प्रकारे बनवा नॅचरल शॅम्पू 

Homemade Natural Shampoo
Homemade Natural Shampoo

आवश्यक साहित्य – रिकामी शॅम्पूची बाटली, ४ औंस (120 ml) डिस्टिल्ड वॉटर, ४ औंस ((120 ml)  लिक्विड कॅस्टिल साबण (Liquid Castile Soap), इसेन्शियल ऑईलचे काही थेंब

नॅचरल शॅम्पू बनवण्याची पद्धत – नॅचरल शॅम्पू बनण्यासाठी तुम्हाला आधी थोडी तयारी करावी लागेल. उदाहरणार्थ, तुमची शॅम्पूची रिकामी बाटली पूर्णपणे धुवून घ्या आणि ती पूर्णपणे कोरडी होऊ द्या. तुमच्याकडे शॅम्पूची जुनी बाटली नसल्यास, कोणतीही स्वच्छ 8-औंसची (250ml) ची बाटली तुम्ही घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

रिकाम्या शॅम्पूच्या बाटलीमध्ये 4 औंस (120 ml) डिस्टिल्ड वॉटर घाला. तुम्हाला बाजारात डिस्टिल्ड वॉटर सहज मिळेल. नंतर बाटलीमध्ये 4 औंस (120 ml) लिक्विड कॅस्टिल साबण ((Liquid Castile Soap) घाला. लिक्विड कॅस्टिल सोप ऑनलाइन आणि दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. आता या बाटलीमध्ये तुमच्या आवडीच्या इंसेन्शियल ऑईलचे 10 थेंब घाला.  शॅम्पूच्या बाटलीला झाकण लावा आणि सगळे घटक एकत्र मिसळेपर्यंत बाटली हलवा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमचे केस धुवाल तेव्हा बाटली थोडी हलवून मग शॅम्पू वापरा. 

तुमच्या आवडीप्रमाणे वापरा इसेन्शियल ऑइल 

तुम्ही या शॅम्पूमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे व गरजेनुसार कोणतेही इसेन्शियल ऑइल वापरू शकता. पण तुमच्या केसांची समस्या लक्षात घेऊन जर तुम्ही इसेन्शियल ऑईलची निवड केली तर तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळतील. उदाहरणार्थ, जर तुमच्या केसांत कोंडा झाला असेल तर या शॅम्पूमध्ये तुम्ही टी ट्री ऑइल वापरू शकता. त्याचप्रमाणे, तुमचे केस तेलकट असल्यास, तर लॅव्हेंडर इसेन्शियल ऑइल हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला चांगला सुगंध येणारा बेसिक शॅम्पू हवा असेल तर तुम्ही त्यात रोझ इसेन्शियल ऑइल वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पेपरमिंट, लेमन किंवा ऑरेंज इसेन्शियल ऑइल देखील या शॅम्पू मध्ये मिसळू शकता. 

नॅचरल क्लॅरिफायिंग शॅम्पू बनवणेही सोपे  

Homemade Natural Shampoo
Homemade Natural Shampoo

जर तुम्ही हेअरस्प्रे, हेअर मूस (Hair Mousse) आणि इतर हेअर प्रॉडक्ट्सचा वारंवार वापर करत असाल तर तुम्ही क्लॅरिफायिंग शॅम्पू लावला पाहिजे जेणे करून केसांमध्ये बिल्टअप होणार नाही. तुम्ही घरीही नॅचरल क्लॅरीफायिंग शॅम्पू सहज बनवू शकता. या शॅम्पूचा आठवड्यातून एकदा वापर करणे पुरेसे आहे. 

क्लॅरीफायिंग शॅम्पू साठी आवश्यक साहित्य – 3-4 चमचे ऍपल सायडर व्हिनेगर , 2 कप पाणी 

ADVERTISEMENT

कृती – एक मोठी बाटली घ्या. त्यात पाणी आणि ऍपल सायडर व्हिनेगर घाला. बाटलीचे झाकण लावून बाटली हलवा व पाणी व व्हिनेगर मिसळून घ्या. तुमचा क्लॅरिफायिंग शॅम्पू तयार आहे. यासाठी तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर ऐवजी ड्राय रोझमेरी पाण्यात उकळून ते पाणी देखील वापरू शकता. शॅम्पू लावल्यावर केसांना कंडिशनर देखील लावा. 

अशा प्रकारे तुम्ही घरीच नॅचरल शॅम्पू बनवू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

20 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT