ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
How To Reduce Spiciness In Food

पदार्थामध्ये चुकून लाल तिखट जास्त पडलं तर…

स्वयंपाक करणं ही कौशल्याची गोष्ट आहे. मात्र बऱ्याचदा कामाच्या गडबडीत स्वयंपाक करताना काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात. जर पदार्थामध्ये चुकून लाल तिखट जास्त पडलं तर सोपी युक्ती करून तुम्ही पदार्थ पुन्हा नीट करू शकता. कारण एक वेळ लाल तिखट कमी झालं तर चालेल पण ते जास्त पडलं तर पदार्थ फेकून देण्याशिवाय कोणताच पर्याय नाही असं तुम्हाला वाटू शकतं. मात्र असं झालं तर काळजी करू नका थोडंसं जास्त लाल तिखट पदार्थात पडलं तर करा हे झटपट उपाय

पदार्थामध्ये आंबट वस्तू मिसळा

स्वयंपाकातील एखाद्या पदार्थामध्ये लाल तिखट जास्त झालं तर आंबट पदार्थ मिसळून तुम्ही तो तिखटपणा कमी करू शकता. जसं की लिंबू, व्हिनेगर, आंब्याची साल अथवा कोकम अशा पदार्थांमध्ये टाकल्यास आंबटपणा वाढतो आणि तिखटपणा बॅलेन्स होतो. मात्र असं करताना त्या पदार्थामध्ये कोणता आंबट पदार्थ घालणं योग्य आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं. नाहीतर चुकीचा पदार्थ मिसळण्यामुळे तुमच्या पदार्थाची चव कमी होऊ शकते. अगदी काहीच नाही तर तुम्ही अशा वेळी भाजी अथवा करीमध्ये टोमॅटोची प्युरी मिसळून पदार्थाचा तिखटपणा बॅलन्स करू शकता.

गूळ किंवा साखर घाला

गोडामुळे तिखटपण लगेच कमी होतो. त्यामुळे एखाद्या पदार्थामधील तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही वरून साखर किंवा गूळ मिसळू शकता. साखर अथवाा गूळ मिसळण्यामुळे भाजी अथवा आमटीची चव आणखी छान होते. त्यामुळे पदार्थ रूचकर होण्यासाठी  बऱ्याच तिखट पदार्थांमध्ये शेवटी चिमूटभर साखर अथवा गुळाचा लहान खडा  घालण्याची पद्धत आहे. याशिवाय वाचा तिखट पदार्थ खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम

डेअरी प्रॉडक्टने स्वाद करा बॅलन्स

लाल तिखटामध्ये केमिकल कंपाऊड असतात. ज्यामुळे पदार्थ तिखट होतो. हा घटक कमी करण्याची क्षमता दूधाच्या पदार्थांमध्ये असते. तुम्ही एखादा तिखट पदार्थ कमी तिखट करण्यासाठी त्या पदार्थामध्ये दूध, दही, क्रीम, चीज, पनीर असे पदार्थ मिसळू शकता. ज्यामुळे पदार्थांला छान चव येतेच शिवाय तिखटपणाही कमी होतो. जेवणात मीठ जास्त झालंय का, मग करा या सोप्या ट्रिक्स

ADVERTISEMENT

नारळाचा रस टाका

समजा एखादी भाजी अथवा करी तुमच्याकडून जास्त तिखट झाली तर काहीच काळजी  करू नका. तुम्ही या पदार्थामध्ये सर्वात शेवटी नारळाचा रस टाकू शकता. जर भाजी कोरडी असेल तर ओला नारळ किसून टाका पण जर करी असेल तर तुम्ही त्यात सरळ नारळाचा रस मिसळू शकता. ज्यामुळे पदार्थाची चव वाढेल आणि तिखटपणा कमी होईल. दूध आवडत नसेल तर ‘या’ पदार्थांपासून मिळवा शरीरासाठी पुरेसं कॅल्शिअम

09 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT