ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
हिलिंग स्टोन

कोणता हीलिंग स्टोन (Healing Stone) आहे तुमच्यासाठी परफेक्ट, असा होतो फायदा

टॅरो रिडिंग किंवा अशा गोष्टींमध्ये तुम्हाला आवड असेल तर आजचा विषय हा तुम्हाला आवडणारा असा आहे. हल्ली बाजारात तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे स्टोन्स नक्कीच पाहिले असतील. काही जणांनी याकडे दुर्लक्षही केले असेल. पण हिलिंग स्टोन ( Healing Stone) नावाने ओळखला जाणारा दगडाचा हा प्रकार सध्या खूप प्रचलित आहे. हे नुसत्या वेगवेगळ्या रंगाचे दगड नसून यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या शंकाचे निरसन करण्याची क्षमता आहे असे मानले जाते. म्हणून हल्ली अनेक ठिकाणी यांचा वापर केलेला जातो. गुलाबी, हिरवा, काळा, पांढरा असे वेगवेगळे स्टोन्स तुम्हाला काय अपेक्षित आहे त्यानुसार सुचवले जातात. या स्टोन्ससंदर्भातील बेसिक माहिती आज आम्ही देणार आहोत. म्हणजे तुम्हाला स्टोन्स घेताना अडचणी येणार नाहीत.

हीलिंग स्टोन्समध्ये 30 हून अधिक प्रकार आहेत. सगळेच स्टोन्स आपल्याकडे अगदी सहज उपलब्ध असतील असे नाही तर जे स्टोन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि सहजन मिळतात असे काही स्टोन्स पाहूया

Healing stones

ॲमेथिस्ट ( Amethyst)

 ॲमेथिस्ट हा थोडासा फिक्क्ट जांभळ्या रंगाचा असा स्टोन आहे. ज्याच्यामध्ये थोडा गडद आणि चमकदार असा शेड असतो. हा स्टोन्स आयुष्यात समतोल राखण्यासाठी दिला जातो. या स्टोन्स घातल्यामुळे जर तुमचे आयुष्य संतुलित होण्यास मदत मिळते. 

रोझ क्वार्टझ ( Rose Quartz) 

फिक्कट गुलाबी रंगाचा चमकदार असा स्टोन प्रेम, हिलिंग आणि तुमच्यातील करुणा वाढवण्यास मदत करते. कोणीही हा स्टोन घातला तरी चालू शकते. याचे कोणतेही नुकसान नाही. तुमच्या जोडीदाराचे प्रेम तुमच्यावर राहण्यासाठी हा स्टोन मदत करतो. 

ADVERTISEMENT

जेड ( Jade) 

जेड स्टोन

 जेड स्टोन हा हल्ली अनेकांनी पाहिला आहे. कारण जेड रोलरमुळे तो चांगलाच प्रचलित झाला आहे. जेड रोलर फिरवल्यामुळे त्वचेला त्याचे फायदे मिळतात. पण या व्यतिरिक्त  हिरव्या रंगाचा हा स्टोन्स तुमचे नशीब फळफळवण्यासाठी आणि पैसा येण्यासाठी मदत करते. 

सेलेनाईट (Selenite) 

सेलेनाईट हा पांढऱ्या रंगाचा असा हिलिंग स्टोन असून हा अगदी बारीक असा सरळ केलेला असतो. आशा, सहानुभूती आणि स्पष्टता आणण्यासाठी हा स्टोन खूपच फायद्याचा असतो. तुमचे आयुष्य थोडे  गोंधळलेले असेल तर तुम्ही हा स्टोन्स घालायला हवा. 

मुनस्टोन (Moonstone) 

Moonstone

पांढरा आणि थोडासा मोती रंगाचा असा हा स्टोन्स देखील तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. हा ही एक महागडा असा स्टोन असून  स्वप्न, उर्जा आणि जिद्द वाढवण्यासाठी फारच फायद्याचा असतो. 

टर्कोईश ( Turquoise)


आकाशी निळ्या रंगाचा हा स्टोन असून याचा उपयोगही अनेक ठिकाणी केला जातो. शुद्धता आणि माफ करण्याची वृत्ती ही प्रत्येकामध्ये असायला हवी. तीच वाढवण्यासाठी हा स्टोन मदत करतो. 

ADVERTISEMENT

टायगर आय ( Tiger Eye) 

वाघाचा डोळा असा अर्थ असलेला हा दगड थोडासा काळा- पिवळ्या अशा शेडमध्ये असतो. चांगले भविष्य आणि समस्या सोडवण्यासाठी हा स्टोन तुम्हाला मदत करतो. 

 या व्यतिरिक्त अनेक हिलिंग स्टोन बाजारात मिळतात. पण कुठेही हिलिंग स्टोन घेऊ नका. कारण खरे हिलिंग स्टोन्सच तुम्हाला फायदा देऊ शकतात. इतकेच नाही तर त्याचा वापर कसा करावा हे देखील माहीत असायला हवे.

अधिक वाचा : जाणून घ्या षडाष्टक योग म्हणजे नक्की काय

28 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT