सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. पुढील काळात अनेकांची लग्न ठरलेली देखील असतील. आता लग्न म्हटले की, लग्नाची केवढी तरी तयारी येते. लग्न ग्रँड करणे असो वा एकदम साधे. प्रत्येक लग्नाच्या प्लॅनिंगचं टेन्शन हे सगळ्यांनाच असतं. कार्यक्रम सुरळीत पाडावा अशी इच्छा प्रत्येकालाच असते.सध्या अनेक लग्नांमध्ये थीम ठरवली जाते. ही थीम तुम्हीही तुमच्या लग्नात ठेवू शकता. थीम ठेवणं म्हणजे नेमकं काय आणि थीम कशी ठरवायची ते आता जाणून घेऊया.
लग्नाची थीम म्हणजे काय?
प्रत्येक नववधू आणि वराचे स्वप्न असते की, त्यांचे लग्न नेमके कसे व्हावे त्यासाठी त्यांनी काही विचार देखील केलेला असतो. कोणाला आपल्या लग्नात चमकधमक काहींना अगदीच क्लासी, काहींना फिल्मी असे लग्न व्हावे असे वाटत असते. आता तुम्हाला जे वाटतंय त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक अरेंजमेंट केली जाते. त्याला थीम असे म्हणतात. आत तरी देखील थीम कळत नसतील आम्ही काही थीम तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
साऊथ इंडियन थीम
सध्या तुम्ही जिथे तिथे पाहाल तिथे तुम्हाला साऊथ इंडियन साडी ड्रेप आणि ज्वेलरी अशा सगळ्या काही गोष्टींची चलती आहे. खूप जणांना साऊथ इंडियन गाणी, कपडे आणि डेकोरेशन असे सगळे काही आवडते. अशांसाठी साऊथ इंडियन थीम ठेवता येईल. ही थीम तुम्ही ठरवली की, तुम्हाला त्यामध्ये गोंड्याची फुले, केळीची पाने, काकडा, मोगरा अशी काही फुले वापरुन डेकोेरेशन करता येते. शिवाय जेवण मस्त केळीच्या पानात वाढता येते. साऊथ इंडियन पदार्थ आणि त्यानुसारच जर तुम्ही कपडे घातले तर त्याला अधिक न्याय मिळतो. ही एक थीम तुम्हाला ठेवता येईल.

मराठमोळी थीम
महाराष्ट्रात मराठी पद्धतीने लग्न करणे अगदी स्वाभाविक आहे. पण आपल्या लग्नाला अस्सल मराठमोळा टच द्यायचा असेल तर तुम्हाला ही थीमही ठेवता येईल. ही थीम ठेवणे सगळ्यात जास्त सोपे आहे. असे वाटत असले तरी असे अजिबात नाही. कारण मराठमोळी थीम करताना त्याचे डेकोरेशन हे खूप बेसिक असावे लागते. यामध्ये जास्तीत जास्त फुलांचा वापर केला तर खूपच जास्त चांगले. जेवणाच्या बाबतीत म्हणाल तर हल्ली लोकांना सोड्याच्या जेवणापेक्षा मस्त घरगुती जेवण आवडते. मोदक, मटण, भाकरी, पालेभाजी, उसळ, मिसळ असे तुम्हाला ठेवता येते. तुम्ही लोकांना मराठमोळे कपडेदेखील घालायला काहीच हरकत नाही.
मॉर्डन वेडिंग
नव्याची कास धरणारे तुम्ही असाल तर तुम्हाला मॉर्डन अशी थीम देखील ठेवता येऊ शकते. यामध्ये तुम्हाला डेकोरेशनही ट्रेंडी करता येते. यामध्ये जेवण इंटरनॅशनल असे ठेवता येते. अशा लग्नातही खूप मजा येते. अशा थीमला बजेट थोडे जास्त जाते. पण ज्यांना संगीत, पुल पार्टी, हळद असे सगळे काही करायचे असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मॉर्डन वेडिंग करा.
कोणतीही थीम ठेवताना तुम्ही त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा आणि मगच थीम ठेवायला हवी.