ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
Taking Care Of Plants In Monsoon

पावसाळ्यातही झाडांची काळजी घेणे आवश्यक, नाहीतर होतील खराब 

साधारणपणे पावसाळा हा ऋतू झाडांसाठी उत्तम मानला जातो. कारण या ऋतूमध्ये झाडांची झपाट्याने वाढ होते आणि सर्वत्र हिरवळ दिसते. मान्सूनचा पाऊस झाडाझुडपांसाठी वरदान ठरतो. एकीकडे मान्सून  झाडांना आणि पिकांना जीवदान देण्याचे काम करतो पण त्याचबरोबर पावसाळ्याचे अनेक दुष्परिणामही झाडांवर दिसून येतात. या काळात तापमान कमी असल्याने लागवडीसाठी हा काळ चांगला मानला जातो. परंतु या हंगामात झाडे कुजण्याची आणि खराब होण्याची शक्यता देखील खूप जास्त असते. या ऋतूत आकाश बहुतांशी ढगाळ असते आणि झाडांना सूर्यप्रकाश फारच कमी मिळतो. त्यामुळे पाणी देण्यापासून ते खत देण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.अशा परिस्थितीत पावसाळ्यात काही सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या बागेतील रोपांची योग्य काळजी घेऊ शकता. तशी तर पावसाळ्यात वातावरणात वाढलेली आर्द्रता झाडांच्या वाढीसाठी सर्वोत्तम मानली जाते. परंतु पावसाळ्यात अनेक वेळा झाडांवर किड पडलेली दिसू लागते. तसेच जास्त पाणी मिळाल्यामुळे झाडे कोमेजायलाही लागतात. अशा परिस्थितीत झाडांचे संरक्षण करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असते. म्हणूनच पावसाळ्यात झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते जेणे करून त्यांचे पावसामुळे काही नुकसान होऊ नये. पावसाळ्यात अशा प्रकारे झाडांची काळजी घ्या. 

सूर्यप्रकाश आणि खताकडे लक्ष द्या

पावसाळ्यात रोपे योग्य वायुवीजन आणि प्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवा. जिथे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकतो. याशिवाय गरज भासल्यास झाडांना योग्य ते खत घालावे. झाडांना खत घालताना शक्यतोवर ते सकाळच्या वेळेतच घालावे.अतिवृष्टीमुळे कधी कधी झाडांना आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. अशावेळी झाडांना सेंद्रिय खत घाला. सेंद्रिय खतांमधून झाडांना आवश्यक पोषण मिळते.

झाडाला मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा

Taking Care Of Plants In Monsoon
Taking Care Of Plants In Monsoon

पावसाळ्यात झाडांना भरपूर पाणी मिळते. त्यामुळे जास्त भार पडल्याने झाडांची मुळे कमकुवत होऊ लागतात आणि झाडांची वाढही कमी होते. त्यामुळे वेळोवेळी कुंड्या तपासत राहा आणि शक्यतोवर दुपारी तीन नंतर झाडांना पाणी घालू नका.पावसाळ्यात कुंडीत आणि आजूबाजूला जास्त पाणी साचते. जर तुम्हाला कुंडीच्या तळाशी पाणी दिसले तर ते नियमितपणे काढून टाका याने डासांची उत्पत्ती देखील होणार नाही. जर पाणी जमिनीतून सहज झिरपत नसेल, तर तुमच्या भांड्यात मॉस किंवा एकपेशीय वनस्पती तयार होऊ शकतात. त्यामुळे मातीचे व्यवस्थापन करण्यासाठी वरून थोडी माती टाका म्हणजे पाणी शोषले जाण्यास मदत होईल.

कुंड्या ठेवण्यासाठी योग्य जागा निवडा

पावसाळ्यात कुंडीत लावलेली झाडे ठेवण्यासाठी सुरक्षित जागा निवडायला हवी.  पावसाळ्यातही झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्यामुळे झाडे ठेवण्यासाठी अशी जागा निवडा जिथे त्यांना पुरेसे पाणी, सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल. जिथे पावसाचे पाणी जास्त पडेल अशा ठिकाणी कुंड्या ठेवू नका. 

ADVERTISEMENT

झाडांचे कीटकांपासून संरक्षण करा

पावसाळ्यात बाहेर पडणारे काही कीटक वनस्पतींसाठी चांगले असता. मातीत राहणारी गांडुळे मातीचे नायट्रेटिंग करण्याचे काम करतात. पण काही कीटक वनस्पतींचे नुकसान देखील करू शकतात. तसेच मातीत व कुंडीत पाण्याचा निचरा होत नसेल तर झाडावर कीड पडण्याची शक्यता देखील वाढते. पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी योग्य व्यवस्था करा. 

पावसाळ्यात झाडांची काळजी घेणे 

Taking Care Of Plants In Monsoon
Taking Care Of Plants In Monsoon

पावसाळ्यात घरातील झाडे निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांच्यावर हर्बल कीटकनाशकांची फवारणी करावी. त्यामुळे झाडांवर कीड पडणार नाही.तसेच हानिकारक कीटक झाडांपासून लांब राहतील. हर्बल कीटकनाशक वापरले तर आवश्यक ते कीटक झाडाकडे आकर्षित होतील आणि हानिकारक कीटक झाडापासून लांब राहतील. अशाप्रकारे पावसाळ्यात तुमच्या झाडांची काळजी घ्या. 

Photo Credit – istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT