रेटिनॉल हा बर्याचदा त्वचेची काळजी घेणारा मॅजिकल घटक म्हणून ओळखला जातो. पण त्याचे जसे चांगले परिणाम आहेत तसाच काहींना वाईट अनुभव देखील आला आहे. काही लोक म्हणतात की रेटिनॉलने त्यांची त्वचा खराब केली आणि म्हणून अनेकांना ते वापरण्याची भीती वाटते. काहींना त्रास झाला असला तरी तज्ज्ञांच्या मते रेटिनॉल तुमच्या त्वचेवर वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु जर तुम्ही घाई केली आणि ते योग्यरित्या वापरले नाही तर त्याचे काही अवांछित दुष्परिणाम होऊ शकतात.
रेटिनॉल म्हणजे काय
रेटिनॉल हा व्हिटॅमिन ए चा एक प्रकार आहे जो त्वचेसाठी फायदेशीर आहे. ते व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्हजच्या गटाशी संबंधित आहे, ज्याला रेटिनॉइड्स म्हणतात. काही रेटिनॉइड्समध्ये लो स्ट्रेंथ रेटिनॉल असते जे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील खरेदी करता येतात. इतर रेटिनॉइड्स उदाहरणार्थ ट्रेटीनोइन जे अधिक शक्तिशाली आहेत त्यांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. रेटिनॉलचे अनेक उपयोग आहेत. याचा वापर मुरुमांशी लढण्यासाठी आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच ते त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हे आणि सूर्यामुळे होणारे नुकसान देखील कमी करू शकते.जसजसे तुमचे वय वाढत जाते, तुमच्या त्वचेच्या पेशींचे आणि कोलेजनचे उत्पादन कमी होते. अशा वेळी आपण त्वचेवर रेटिनॉलचा वापर करतो तेव्हा तेव्हा रेटिनॉल्स तुमच्या त्वचेच्या पेशी अधिक तरूण स्थितीत आणण्यास मदत करतात.
रेटिनॉल कसे काम करते
रेटिनॉल हे पॉवर बूस्ट सेल्युलर टर्नओव्हरची गती वाढवण्यास मदत करते ज्यामुळे त्वचेचे पोअर्स बंद राहतात आणि त्यामुळे मुरुम कमी होतात. तसेच त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो, त्वचेवरील फाईन लाईन्स कमी होतात आणि त्वचा चमकदार होते. रेटिनॉल त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवते ज्यामुळे अँटी एजिंगचे फायदे मिळतात. कोलेजन हा त्वचेतील हायड्रेशन आणि लवचिकता वाढवण्यासाठी आवश्यक असलेला पदार्थ आहे. परंतु Retin-A आणि Accutane सारख्या शक्तिशाली रेटिनॉइड्सचे काही साई इफेक्टस देखील आहेत. म्हणूनच संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी किंवा ज्यांची त्वचा जास्त नाजूक आहे अशांनी सावधगिरीने रेटिनॉल वापरणे आवश्यक आहे.
आजकाल रेटिनॉलचा वापर स्किन केअर साठी केला जातो. रेटिनॉलचा वापर करून मुरुम आणि मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. रेटिनॉल अँटी-एजिंगसाठी देखील वापरले जाते. आजकाल स्त्रिया स्वतःच स्वतःच्या मनाने रेटिनॉल वापरतात. परंतु अनेकांना रेटिनॉल वापरण्याची योग्य पद्धत माहित नाही, ज्यामुळे अनेक वेळा रेटिनॉल वापरल्यानंतरही चेहऱ्यावर विशेष प्रभाव दिसत नाही किंवा त्रास होऊ शकतो. म्हणूनच रेटिनॉल कसे वापरायचे ते जाणून घेऊया.
रेटिनॉल कोणत्याही उत्पादनात मिसळू नका
इतर कोणत्याही उत्पादनात रेटिनॉल मिसळून चेहेऱ्यावर लावू नका. व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह्ज, बीएचए किंवा स्क्रबमध्ये रेटिनॉल मिसळू नका. यामुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. तुम्ही रेटिनॉल हे मॉइश्चरायझरमध्ये मिसळून वापरू शकता. मॉइश्चरायझरमध्ये रेटिनॉल मिसळल्याने त्वचेची जळजळ कमी होते.
केवळ रात्रीच रेटिनॉल लावा
तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रात्रीच्या वेळी रेटिनॉलचा वापर करा. रात्री रेटिनॉल वापरल्याने त्वचेला खोलवर पोषण मिळते. रात्रीच्या वेळी रेटिनॉल लावल्याने पिगमेंटेशन आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते. म्हणून, रात्रीच्या वेळी स्किन केअर रुटीनमध्ये रेटिनॉल सीरम वापरा.
ओल्या त्वचेवर रेटिनॉल लावू नका
रेटिनॉल ओल्या त्वचेवर कधीही लावू नये. ओल्या त्वचेवर रेटिनॉल लावल्याने सीरम अधिक खोलवर जाऊ शकते, ज्यामुळे त्वचेची जळजळ होते. चेहऱ्यावर रेटिनॉल लावण्यापूर्वी डोळ्याभोवती व्यवस्थितपणे रेटिनॉल लावा.
रेटिनॉल थोड्याच प्रमाणात लावा
रेटिनॉलचा जास्त वापर केल्यास त्वचेवर पुरळ आणि कोरडेपणा येऊ शकतो. चेहऱ्यावर रेटिनॉल वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. चेहऱ्यावर नेहमी थोड्याच प्रमाणात रेटिनॉल लावा.
रेटिनॉलचा योग्य प्रकारे वापर केल्यास त्याचा त्रास होणार नाही.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक