ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
how to treat damp walls in Marathi

पावसामुळे भिंतीवर आली आहे ओल मग, करा हे सोपे उपाय

आजकाल घर सजावट हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. घर घेतल्यावर लाखो रूपये खर्च करून घराचं इंटेरिअर केलं जातं. इंटेरिअरमुळे जुन्या घराला नवं रूप मिळतं. मात्र पावसाळा सुरू होताच घराच्या भिंतींना ओल आल्यामुळे घराच्या या सुंदर सजावटीत बाधा येते. जर दर पावसाळ्यात अशी ओल भिंतींना येत राहिली तर तुमच्या घराचा मेंटेनन्सचा खर्च वाढू शकतो. शिवाय अशा ओल्या भिंतींवर जीवजंतू पोसले गेल्यामुळे आजारपण पसरतं. घरात ओलावा निर्माण झाल्यामुळे सर्दी, खोकला आणि त्वचेचे विकार होण्याचा धोका पावसाळ्यात जास्त वाढतो. म्हणूनच वेळच्या वेळीच ओल्या भिंतीचे रिपेअरचं काम करायला हवं. बऱ्याचदा अशा भिंती पूर्ववत करण्यासाठी तुम्हाला ठेकेदार अथवा पेंटरची मदत घ्यावी लागते. यासाठी जाणून घ्या अशा वेळी तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टी माहीत असाव्या. यासोबतच वाचा घराची सजावट करून द्या घराला नवा लुक, करा स्वस्तात मस्त सजावट (Home Decor Ideas In Marathi)

पावसाळ्यात का येते भिंतीवर ओल

पावसाळ्यात छप्पर अथवा टेरेसवर पाणी जमा होतं. बांधकामात असलेल्या भेगांमधून हे पाणी भिंतींमध्ये मुरतं आणि जेव्हा ऊन पडतं तेव्हा त्याची वाफ निर्माण होते आणि भिंतींवर ओल येते. त्याचप्रमाणे भिंतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विटांमुळेही ही ओल येऊ शकते. कारण बऱ्याचदा विट लवकर पक्की व्हावी यासाठी त्या बनवताना त्यात मीठ वापरतात. पावसाळ्यात मीठ भिंतींमधून बाहेर येऊ लागतं. ज्यामुळे भिंतींवर ओल दिसू लागते.

पावसाळ्यात भिंतीला ओल येऊ नये यासाठी उपाय

भिंत बांधताना अथवा रंगकाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ओल्या भिंतीचा त्रास होणार नाही.

  • भिंत बांधल्यावर प्लास्टर करण्यापूर्वी विटांवर चिंचेचं पाणी टाका, ज्यामुळे नंतर विटांमधून मीठ कमी येईल. 
  • घराचे रंगकाम करताना वॉटरप्रूफ पेंटचा वापर करा.
  • पावसाळ्यात घराचं रंगकाम करू नका
  • हिवाळ्यात घराचं रंगकाम करण्याचा उत्तम काळ असतो.
  • घराचे इंटेरिअर करताना जुने पाईप खराब झाले असतील तर ते बदला कारण पाईप सडल्यामुळे लिकेज निर्माण होते.
  • घराच्या भिंतींमधील भेगा वॉटरप्रूफने भरा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
11 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT