लहान मुलांची निगा राखताना काही गोष्टी सावधपणे पाळाव्या लागतात. कारण अस्वच्छतेमुळे लहान बाळाला लगेच इनफेक्शन होते. बाळाचे अन्नपदार्थ आणि पाण्यासोबतच बाळाला घालायचे कपडे देखील स्वच्छ आणि निर्जंतूक असावे. तुम्ही बाळाचे कपडे नियमित धुवायला हवेच. पण एवढंच नाही तर ते कसे धुवावे, त्यासाठी कोणता साबण वापरावा, ते कसे सुकवावे हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
बाळाचे कपडे धुण्यासाठी साबण वापरावा का?
बाळाचे कपडे धुताना साबण वापरावा की डिर्टजंट असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण मोठ्यांच्या कपड्यांसाठी वापरण्यात येणारा साबणच लहान मुलांचे कपडे धुताना वापरावा का याबाबत अनेक समज आहेत. लहान मुलांची त्वचा नाजूक आणि मऊ असते. साधारण डिर्टंजट अथवा साबणात हानिकारक केमिकल्स वापरण्यात येतात. सहाजिकच कपड्यांच्या माध्यमातून ते केमिकल्स तुमच्या मुलांच्या त्वचेवर जातात. अशाने लहान वयातच मुलांना डिमेंशिया, फूड पॉईजनिंग अथवा मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. यासाठीच मुलांना नेहमी लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी विशेष तयार केलेल्या सौम्य डिर्टंजट ने धुतलेले कपडेच वापरावे. कारण हे साबण अथवा डिर्टंजट खास लहान मुलांच्या त्वचेचा विचार करून बनवलेले असतात.
लहान मुलांचे कपडे धुताना काय काळजी घ्यावी
लहान मुलांचे कपडे धुताना काळजी घेतली तर त्यांचे आरोग्य राखण्यास नक्कीच मदत होते
- लहान मुलांसाठी उग्र वास असलेले डिर्टजंट वापरू नका. कारण कपड्यांना येणाऱ्या वासाने मुलांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
- लहान मुलांचे कपडे धुण्याचा साबण अथवा पावडर फ्लोरोसंट फ्री असावी.
- लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी अशा साबणाचा वापर करा ज्यामध्ये डायचा वापर केलेला नसेल. कारण डायमधील केमिकल्स आणि रंग तुमच्या मुलांच्या त्वचेवर इनफेक्शन करू शकतात.
- लहान मुलांचे कपडे धुण्याच्या साबणात कधीच फॉस्फरस नसेल याची काळजी घ्या. कारण त्यामुळे बाळाच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
- लहान मुलांच्या कपडे धुण्याच्या साबणात ब्लीच नसावे, कारण त्यामुळे मुलांच्या त्वचेवर रॅशेस निर्माण होऊ शकतात.
कसे धुवावे लहान मुलांचे कपडे
लहान मुलांचे कपडे कसे धुवावे हे देखील खूप महत्त्वाचे आहे
- मोठ्यांचे कपडे आणि बाळाचे कपडे एकत्र धुवू नयेत.बाळाचे कपडे वेगळे भिजत ठेवावे आणि शक्य असल्यास हाताने धुवावे.
- लहान बाळाचे कपडे धुण्याआधी स्वतःचे हात स्वच्छ धुवून घ्यावे.
- कपडे धुण्यापूर्वी बाळाचे वापरलेले कपडे कोमट पाण्यात अर्धा तास भिजवावे. ज्यामुळे जीवजंतू नष्ट होतात.
- कोमट पाण्यात बाळाचे कपडे धुण्यासाठी खास विकत मिळणारा सौम्य डिर्टजंट वापरावा.
- बाळाचे कपडे कडक उन्हात सुकवावे.
- सुकल्यानंतर बाळाचे कपडे इस्त्री करावे ज्यामुळे त्यावरील जीवजंतू नष्ट होण्यास मदत होते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक