फॅशनेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी अनेकींना हाय हिल्स घालणं आवडतं. हाल हिल्स कोणत्याही लुकवर छान दिसतात. वेस्टर्न असो वा एथनिक लुक तुम्ही कोणत्याही लुकवर हाय हिल्स घालू शकता. हिल्स घातल्यामुळे तुमचे पाय आणि उंची जास्त लांब दिसते. ज्याचा तुमच्या संपूर्ण लुक आणि व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम दिसून येतो. पण हाय हिल्स घातल्यामुळे तुमच्या टाचा मात्र खूप दुखू लागतात. दिवसभर उंच टाचेच्या फूटवेअर घातल्यामुळे गुडघे, पायाच्या पोटऱ्या आणि टाचांना दुखापत होऊ शकते. यासाठीच उंच टाचेच्या चपला अथवा हाय हिल्स घालण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात
हाय हिल्स घालताना या गोष्टी ठेवा लक्षात
हाय हिल्स अथवा उंच टाचा घालताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर असे फूटवेअर घालणं त्रासदायक ठरू शकत नाही.
- पायाच्या दुमडणाऱ्या बोटांना टेप लावून जर तुम्ही हाय हिल्स घातले तर तुमचा त्रास कमी होऊ शकतो. कारण डबल टेपमुळे तुमची बोटे आणि तळवे शूजला चिकटून राहतात. ज्यामुळे तुमच्या पायाला शू बाईट अथवा जखमा होत नाहीत. शिवाय पायाच्या बोटांना होणाऱ्या वेदनाही यामुळे जाणवत नाहीत. हिल्समध्ये चालता येत नाही? तुम्ही निवडत आहात चुकीचे हिल्सचे प्रकार
- हाय हिल्सच्या फेटवेअरमध्ये इनसोल्स घातल्यामुळे तुमच्या पायांना जास्त त्रास होत नाही. बऱ्याच शॉपमध्ये सिलिकॉनचे इनसोल्स मिळतात. ज्यामुळे तळव्यांना मऊपण मिळतो आणि पाय दुखत नाहीत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जेलचे थंडगार इनसोल्सही यासाठी वापरू शकता. हाय हिल्स घालून होतं शरीराचं नुकसान, कसं ते जाणून घ्या
- पायात हिल्स घातल्यावर पाय दुखू लागल्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला बाहेर गेल्यावर हिल्स काढून ठेवण्याचा मोह होतो. मात्र अशा वेळी हिल्स काढू नका कारण असं केल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. कारण हिल्स सारखं काढणं आणि घालणं यामुळे पायात सूज येऊ शकते.
- पायात शूज घालण्यापूर्वी तळव्यांना हायड्रेटिंग क्रीमने मसाज करा. ज्यामुळे शूज पायाला घासले जाणार नाहीत आणि वेदना कमी होतील.
- जर तुमच्या पायाला खूप घाम येत असेल आणि त्यामुळे हाय हिल्स घालणं तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर शूज घालण्यापूर्वी पायावर थोडी टाल्कम पावडर लावा.
- नवीन फूटवेअर जर तुम्हाला एखाद्या दिवशी पहिल्यांदाच भरपूर वेळ घालायचे असतील तर घरीच एक आठवडाभर ते घालण्याची सवय लावा.
- जरी तुमच्या पायातून वेदना येत असतील तरी हिल्स घालून एकाच ठिकाणी थांबू नका. अशा वेळी थोडं थोडं चालत राहणं जास्त फायद्याचं ठरू शकतं.ऑनलाईन फूटवेअर खरेदी करताय मग हे वाचा
आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.