ADVERTISEMENT
home / मेकअप
लिक्विड मॅट फिनिशच्या लिपस्टिक आवडत नसतील तर ट्राय करा लिपस्टिकचे हे प्रकार

लिक्विड मॅट फिनिशच्या लिपस्टिक आवडत नसतील तर ट्राय करा लिपस्टिकचे हे प्रकार

मेकअप ही आजकाल गरजेची गोष्ट झाली आहे. सणसमारंभ, कार्यक्रमातच नाही तर कॉलेज अथवा ऑफिसला जातानाही मेकअप करण्याची अनेकींना सवय असते. अनेकजणी तर लिपस्टिकशिवाय घराबाहेर पडतच नाहीत.  मेकअप अॅडिक्ट मुलींकडे तर लिपस्टिकच्या अनेक शेडचं कलेक्शन असतं. फक्त लिपस्टिक जरी लावली तरी चेहऱ्यावर एक छान ग्लो आणि आत्मविश्वास येतो. आजकाल जास्त काळ टिकणाऱ्या लॉंग लास्टिंग आणि लिक्विड मॅट फिनिश लिपस्टिकचा ट्रेंड आहे. पण काही जणींना अशा भरपूर काळ टिकणाऱ्या आणि लिक्विड मॅट फिनिशच्या लिपस्टिक आवडत नाही. कारण त्यामुळे ओठ कोरडे आणि रखरखीत होतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा टेक्स्चर्सच्या लिपस्टिक शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला मॅट फिनिश टेक्स्चर तर मिळेल पण तुमचे ओठ मुळीच कोरडे पडणार नाहीत. तसंच लिपस्टिक लावण्यापूर्वी जाणून घ्या लिपस्टिकचे दुष्परिणाम (Side Effects Of Lipstick In Marathi)

लिक्विड मॅट फिनिश लिपस्टिकला पर्याय

लिक्वीड मॅट फिनिश लिपस्टिकचा कंटाळा येत असेल तर लिपस्टिकचे हे पर्याय तुम्ही ट्राय करू शकता.

पावडर मॅट लिपस्टिक

मॅट फिनिश लिपस्टिकचा हा एक पर्यायदेखील खूप छान आहे. कारण यामुळे तुमच्या ओठांचा फ्लैकीनेस कमी होण्यास मदत होते. हे प्रॉडक्ट व्हर्सटाइल असल्यामुळे ते तुमच्या ओठांवर अगदी स्मूथली काम करतं.  पावडर मॅट लिपस्टिकच्या मदतीने तुम्ही ब्लोटिड लिप्स, स्टेंड लिप्स, ऑम्ब्रे असे मेकअपचे विविध प्रकार ओठांवर करू शकता. यासोबत वाचा इंडिअन स्कीनसाठी केसे निवडावे परफेक्ट लिपस्टिक शेड्स | Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi

क्रीमी मॅट लिपस्टिक

तुम्ही एकदा क्रीमी मॅट लिपस्टिक ट्राय केली तर तुम्ही तिचे चाहतेच व्हाल. हा लिपस्टिकचा प्रकार तुम्हाला एवढा आवडेल की एकतरी क्रीमी मॅट लिपस्टिक तुम्ही तुमच्या बॅगमध्ये कॅरी केल्याशिवाय बाहेर जाणार नाही. क्रीमी मॅट लिपस्टिक हायली पिगमेंटेड असतात आणि मॅट फिनिश लुकसह त्या छान दिसतात. यासाठी ट्राय करा या न्यूड लिपस्टिक | Best Nude Lipstick Shades

ADVERTISEMENT

लिप स्टेन

लिप स्टेन हा लिप टिंटचा एक अधिक पिंगमेंडेट असलेला प्रकार आहे. लिप स्टेन क्रीमी असून ते तुमच्या ओठांवर चिकटून राहतं. ज्यामुळे ग्लॉसी लुकसह तुम्हाला लॉंग लास्टिंग लिपस्टिकचा फिल मिळतो. विशेष म्हणजे लिप स्टेनमध्ये तुम्हाला विविध शेड मिळतात. तुम्ही क्रीमी ब्लशसाठीही याचा वापर करू शकता. 

लिप ऑईल

लिपस्टिक कलेक्शनमध्ये लिप ऑईल नसेल तर काय मज्जा… लिपस्टिकचा हा प्रकार अगदी ग्लॉससारखा नसला तरी लिप बामसारखा नक्कीच असतो. कारण यामुळे तुमच्या ओठांचे पोषण होते. ओठ मऊ आणि चमकदार दिसण्यासाठी लिप ऑईल वापरण्यास काहीच हरकत नाही. डेली वापरासाठी तुम्ही लिप ऑईलचा वापर ओठांवर करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT