पोटाचा घेर कमी कऱण्याच्या अनेक पद्धती व्यायाम आतापर्यंत तुम्ही करुन पाहिल्या असतील. पण तुम्ही कधी कोणत्या जपानी पद्धतीने पोट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर आजपासूनच पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि सपाट पोट मिळवण्यासाठी या काही जपानी पद्धती म्हणजेच काही सोपे व्यायाम नक्की ट्राय करा. सातत्याने या गोष्टी केल्यामुळे तुमच्या पोटाचा टायर कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मिळेल.
टॉवेल पद्धत
जपानमध्ये फारच प्रचलित असलेली टॉवेलने अॅब्ज मिळवण्याची ही पद्धत फारच सोपी आहे. यासाठी तुम्हाला एक जाड टर्किश टॉवेलची गरज आहे. हा प्रकार केल्यामुळे अगदी 10 दिवसातच तुमचे पोट कमी होण्यास मदत मिळते. एका जपानी डॉक्टरने ही पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीनुसार तुम्ही शरीरात घेतलेल्या कॅलरीहून अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते.
अशी करा कृती :
- यासाठी तु्म्हाला एक टॉवेल लागणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक जाड टॉवेल घ्यायचा आहे. त्याचा रोल करायचा आहे.
- पाठीवर झोपताना तुम्हाला रोल केलेला टॉवेल तुमच्या बेलीबटनच्या खाली हा टॉवेल ठेवायचा आहे.
- आता पाय थोडे फाकवून अंगठ्याला अंगठा लागलायला हवा अशा स्थितीमध्ये येण्यासाठी तुम्हाला पाय आतल्या दिशेने वाकवायचा आहे.
- हातावरच्या दिशेला नेताना तुमची करंगळी करंगळीला चिकटवून तो हात जितका मागे नेता येईल तेवढा न्यायचा आहे. साधारण पाच मिनिटे तुम्हाला या पोझीशनमध्ये दिवसातून तीनवेळा झोपायचे आहे. त्यामुळ तुमचे पोट कमी होण्यास मदत मिळते.
दुपारी भात खाण्यामुळे येत असेल सुस्ती तर करा हे उपाय
टिकटॉक डान्स
सध्या तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला हा जापनीज डान्स दिसेल. एक मुलगी एक गाणं लावून त्यावर पोटाची हालचाल करताना दिसते. हा डान्स आता इतका प्रसिद्ध झाला आहे आणि वजन कमी करण्याची पद्धतही इतकी प्रचलित झाली आहे की, विचारता सोय नाही. या डान्समध्ये कोअर मसलवर सगळा ताण आलेला दिसतो. अगदी काहीच दिवसात तुम्हाला इच्छित असलेला निकाल यामध्ये मिळतो.
अशी करा कृती:
- कोणतेही आवडीचे फास्ट म्युझिक लावा. आता गुडघ्यांना गुडघे टेकवून थोडासा पाय वाकवायचा आहे.
- आत तुम्हाला पोट आत घ्यायचे आहे पुन्हा बाहेर काढायचे आहे. अशी कृती तुम्हाला करायची आहे.
- आधी समोरच्या बाजूने आणि त्यानंतर तिन्ही दिशेला म्हणजे डावा, मध्ये आणि उजव्या बाजूला तुम्हाला पोट आत-बाहेर करायचे आहे.
आया या पद्धतीने तु्ही पोट कमी करण्याचा प्रयत्न करु शकता.