काही दिवसांपूर्वी KGF चा दुसरा पार्ट रिलीज झाला. 2018 नंतर हा दुसरा पार्ट कधी येणार? याची वाट अनेक जण पाहात होते. अखेर 2022 च्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट आला. पण आता या दुसऱ्या पार्टने तिसऱ्या पार्टची उत्कंठा वाढवली आहे. त्यामुळे हा चित्रपट अजून चित्रपट गृहात रिलीज होऊन काही काळ जात नाही तोच तिसऱ्या पार्टमध्ये काय होईल याची चर्चा होऊ लागती आहे. KGF च्या या दुसऱ्या पार्टमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहे. काही गोष्टी तिसऱ्या पार्टमध्ये दाखवल्या जातील अशी अपेक्षा आहे. कारण दुसऱ्या पार्टमध्ये झालेला रॉकीचा मृत्यू अनेकांना पटलेला नाही. आता या तिसऱ्या पार्टमध्ये हा सुलतान आणखी नव्या जोशमध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. काय झालं पार्ट दोनमध्ये चला घेऊया जाणून
मृत्यू न पटणारा
KGF म्हणजेच कोलार गोल्ड फिल्ड्स हे आता सगळ्यांनाच माहीत झालेले आहे. त्या भागातील सोनं काढताना तेथील सत्ता हाती घेण्याचे काम रॉकी करतो. आपली ओळख निर्माण करतो. लोकांना त्रास न देता त्यांचा मसिहा बनून त्यांच्यासाठी आणि आपल्या फायद्यासाठी तो सोनं गोळा करतो. लहानपणी खाललेल्या खचता त्याला पुढे कोणालाही होऊ द्यायच्या नसतात. त्यासाठी मुंबई ताब्यात घेणे त्याला गरजेचे असते. गरुडाला मारुन तो सगळ्या गोष्टी मिळवतो. असे करताना त्याच्या वाटेत अनेक अडचणी येतात. पण तरी तो खचून जात नाही. लढत राहतो. दुसऱ्या पार्टमध्ये त्याला जे हवं ते मिळवतो. पण असे करताना त्याला खूप जवळच्यांना गमवावे लागते. त्यानंतर पेटून उठलेला रॉकी सगळे काही देऊन टाकण्याचा विचार करतो. त्याच्यावर हल्ला होतो त्यावेळी तो त्याच्या सोन्याच्या बिस्किटांसह पाण्यात पडतो. त्यावेळी तो मेला असे अनेकांना वाटते. पण असे अजिबात नाही. कारण आता तिसऱ्या पार्टमध्ये तो परत येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
रॉकी येणार परत
सोन्याची आवड असलेल्या रॉकीला आपले सोने कोणालाही द्यायचे नसते. त्याच्या आईच्या शब्दाखातर तो आपले नाव कमावतो. सोने मिळवतो. पण त्याचा फायदा त्याच्या विरोधातील कोणालाही होता कामा नये यासाठीच तो सगळे सोने घेऊन समुद्रातून निघतो. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे पंतप्रधान रमोला ही त्याच्यावर हल्ला करण्याचे आदेश देते. पण त्या हल्ल्यात बोट तुटताना दिसती तरी देखील रॉकी मेला याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे आता तिसऱ्या चाप्टरमध्ये अधिक ताकदीने तो पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
समुद्रातील त्या सोन्याचे काय?
एकही सोन्याचे बिस्किट वाया जाऊ न देणारा रॉकी. समुद्रात इतके सगळे सोन्याचे बिस्किट मुद्दाम फेकून का देतो? असा प्रश्न साहजिक आहे. त्यामुळे आता तिसऱ्या भागात या मायनिंगच्या बाहेर जाऊन काहीतरी नवा प्रयोग करताना रॉकी दिसणाऱ आहे यात काही शंका नाही.
एकही सोन्याचे बिस्किट वाया जाऊ न देणारा रॉकी. समुद्रात इतके सगळे सोन्याचे बिस्किट मुद्दाम फेकून का देतो? असा प्रश्न साहजिक आहे. त्यामुळे आता तिसऱ्या भागात या मायनिंगच्या बाहेर जाऊन काहीतरी नवा प्रयोग करताना रॉकी दिसणाऱ आहे यात काही शंका नाही.
दरम्यान या चित्रपटात रॉकीची भूमिका अभिनेता नवीन कुमार गौडा म्हणजेच यश याने साकारली आहे. त्याला या चित्रपटातून चांगलीच ओळख मिळाली आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केलेली आहे. दुसऱ्या भागाबद्दल मिश्र प्रतिक्रिया असल्या तरी देखील याचा पुढचा पार्ट उत्कंठा वाढवणारा असेल यात काही शंका नाही.