ADVERTISEMENT
home / मनोरंजन
khatron-ke-khiladi-12-contestants-list-in-marathi

‘खतरों के खिलाडी 12′ मध्ये दिसणार हे सेलिब्रिटी, लवकरच शूटिंगला सुरूवात

‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi 12) हा असा रियालिटी शो आहे जो तीन महिन्यासाठी असतो आणि जितके वेळा ऑन एअर होतो तितके वेळा टीआरपीच्या रेसमध्ये पुढेच असतो. रोहित शेट्टी (Rohit Shetty) गेल्या अनेक सीझनपासून या रियालिटी शो चे सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे या नव्या सीझनमध्ये नक्की कोणकोणते स्पर्धक असणार याची या शो च्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे. फिअर फॅक्टर (Fear Factor) असणारा हा शो स्टंट बेस्ड असून या शो चे अनेक चाहते आहेत. यावर्षीचा हा सीझन अधिकाधिक मनोरंजक करण्याचा निर्मात्यांचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये यावर्षी या शो चे चित्रीकरण होणार आहे. तर यापैकी काही सेलिब्रिटी पुढील चित्रीकरणासाठी रवाना झाल्याचे कळत आहे. 

अनेक प्रसिद्ध चेहरे 

यावेळी खतरों के खिलाडीमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर यावर्षी वेगवेगळे आणि अधिक खतरनाक स्टंटदेखील घेण्यात येणार आहेत. या शो मध्ये अधिकाधिक स्टंट आपले आवडते कलाकार कशा पद्धतीने करतात हे सर्वांनाच पाहायला आवडते. तर यावर्षी अनेक प्रसिद्ध कलाकार असून हा सीझन अधिक स्पर्धात्मक होईल असंही सर्वांना वाटत आहे. श्रिती झा (Sriti Jha), रूबिना दिलैक (Rubina Dilaik), शिवांगी जोशी (Shivangi Joshi), मुनावर फारूकी (Manuawar Faruqui), राजीव अदातिया (Rajiv Adatia), प्रतिक सहजपाल (Pratik Sehjpal), चेतना पांडे (Chetna Pandey), तुषार कालिया (Tushar Kalia) असे अनेक नावाजलेले कलाकार सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे. तर यापैकी राजीव अदातियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंवटर आपला सहभाग असल्याचे जाहीर केले आहे. 

लवकरच येणार नवा सीझन 

दरवर्षी चाहते खतरों के खिलाडीच्या नव्या सीझनची वाट पाहात असतात आणि आपले कोणते आवडते कलाकार सहभागी होणार आणि कशा पद्धतीने स्टंट करणार हेदेखील अगदी आवडीने पाहात असतात. खतरों के खिलाडीचा 11 वा सीझन हा अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) जिंकला. तर यावर्षी श्रिती झा, रूबिना या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धक असतील असं म्हटलं जात आहे.  चाहते अगदी आतुरतेने या सीझनची वाट पाहात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावर्षीही या शो चे सूत्रसंचालन हे रोहित शेट्टीच करणार असून या शो ची प्रिमियर तारीख मात्र अजून घोषित करण्यात आलेली नाही. तर अजूनही याच्या चित्रिकरणाचे फोटोही समोर आलेले नाहीत. त्यामुळे याचं चित्रीकरण नक्की कधी सुरू होणार आणि याची रूपरेषा काय असणार याबाबत चाहत्यांना नक्कीच उत्सुकता आहे. तर रूबीना, प्रतीक, राजीव हे चेहरे बिग बॉसमधून प्रेक्षकांसमोर आले आहेत. पण स्टंटच्या बाबतीत हे सर्व कलाकार नक्की काय करणार याबाबतही आता उत्सुकता लागून राहिली आहे. तर या शो मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचे बीटीएस व्हिडिओ अथवा फोटो कधी समोर येणार आहेत, याचीही उत्सुकता आता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
19 May 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT