ADVERTISEMENT
home / मनोरंजन
kkk12-choreoghrapher-nishat-bhatt-grabing-all-attention-from-director-host-rohit-shetty-in-marathi

KKK12: धुमधड्याकात खिलाडींची सुरूवात, मराठमोळा निशांत भट जिंकतोय मनं

खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) या रियालिटी शो चा 12 वा सीझन सुरू झाला असून रोहित शेट्टी (Rohit Shetty) चा हा शो पहिल्या दिवसापासून नेहमीच गाजतो. यामध्ये येणारे सेलिब्रिटी आणि त्यांनी केलेले स्टंट हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. तर प्रत्येक सीझनमध्ये असा एक तरी खेळाडू असतो जो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आणि त्याने सीझन जिंको वा न जिंको पण प्रेक्षकांचे मन नक्कीच जिंकतो. या सीझनमध्येही अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली आहे ती मराठमोळ्या कोरिओग्राफर निशांत भटने (Nishant Bhatt). बिग बॉस OTT (Bigg Boss OTT) आणि बिग बॉसचा 15 (Big Boss 15) वा सीझन गाजवून झाल्यानंतर आता निशांत पुन्हा एकदा खतरों के खिलाडीच्या सीझनमध्ये आपली छाप सोडण्यासाठी तयार आहे. इतकंच नाही तर एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दस्तुरखुद्द रोहित शेट्टीने निशांत भट आणि राजीव अदातिया (Rajiv Adatia) या जोडगोळीची भरभरून प्रशंसा केली आहे. 

निशांत बनला रोहित शेट्टीचा खबरी 

निशांत हा उत्तम कोरिओग्राफर असून आतापर्यंत त्याने अनेक रियालिटी शो मध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. मात्र त्याला खरी ओळख दिली ती म्हणजे बिग बॉस OTT (Bigg Boss OTT) आणि बिग बॉसचा 15 (Big Boss 15) वा सीझनने. या सीझनमध्ये पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये निशांतने क्रमांक पटकावला आणि त्याशिवाय शो सोडण्यासाठी देण्यात आलेली रक्कमही पटकावली होती. आपल्या विनोदी स्वभावाने आणि स्पष्टवक्तेपणाने निशांतने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तर आता निशांत भटने दिग्दर्शक आणि स्टंट मास्टर असणाऱ्या रोहित शेट्टींचेही मन जिंकून घेतले आहे. टीममधील सर्व स्पर्धकांबाबत कोणत्याही गोष्टी असतील तर त्यांची इत्यंभूत माहिती देण्याचे काम निशांतने आपल्या खांद्यावर घेतले आहे. तर पहिल्याच भागात निशांतने स्टंट पूर्ण करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. याआधी आलेल्या सर्व कोरिओग्राफर्सने नेहमीच उत्तम स्टंट केल्याचेही रोहित शेट्टीने आवर्जून सांगितले आहे आणि त्यावर निशांतने आपणही हा सीझन गाजवूनच जाणार असेही म्हटलं. 

निशांत, प्रतीकची मैत्री

निशांतला या शो मध्ये असणारे अनेक जण ओळखतात आणि त्याचे आधीपासून मित्रमैत्रिणीही आहेत. मात्र त्याचा खास मित्र प्रतीक सहजपाल (Pratik Sehjpal) देखील या शो मध्ये त्याच्याबरोबर असून त्याचा प्रतिस्पर्धी आहे. याशिवाय तुषार कालिया (Tushar Kalia) हादेखील निशांतचा सर्वात चांगला मित्र प्रतिस्पर्धी म्हणून दिसून येत आहे. मात्र सर्वात जास्त मस्ती निशांत करत आहे ती राजीव अदातियासह. राजीवचे हिंदी आणि निशांतचे त्याला असणारे टोमणे हा या सीझनचा सर्वात जास्त मजेशीर एलिमेंट पहिल्याच भागात दिसून आल्यामुळे संपूर्ण सीझन नक्कीच निशांत आणि राजीव गाजवणार असं दिसून येत आहे. पण केवळ मजामस्करीच नाही तर निशांतने आपण स्टंटवरही चांगलेच लक्ष केंद्रित करत असल्याचे सोशल मीडियावर लाईव्ह येऊन सांगितले आहे. दरम्यान हे स्टंट करताना निशांतच्या ढोपरालाही दुखापत झाल्याचे त्याने लाईव्ह येऊन दाखवले होते. त्यामुळे निशांतच्या चाहत्यांनी त्याला त्याची काळजी घेण्यासही यादरम्यान सांगितले आहे. यावर्षी हा शो कोण जिंकणार याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र तोपर्यंत हा शो लवकरच टीआरपीच्या रेसमध्ये पुढे येईल हे काही वेगळं सांगायला नको!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
03 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT