ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
low budget home decoration tips

कमी बजेटमध्येही सजवू शकता तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर, या टिप्स करा फॉलो

आपलं घर सुंदर दिसावं आणि सर्वांना आपल्या घरी पुन्हा पुन्हा यावसं वाटावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसं जीवाचं रान करतात. मात्र घर विकत घेणं पुरेसं नाही घर तुम्ही किती छान सजवता यावर तुमच्या घराचं सौंदर्य अवलंबून असतं. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की घर सजवणं म्हणजे खूप खर्चिक काम आहे. इंटेरिअर खूप खर्च करून घर कुणीही सजवू शकतं. पण जर तुमचं बजेट कमी असेल तर कौशल्य वापरून काही छोट्या छोट्या गोष्टींचे बदल करूनही तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर सजवू शकता. यासाठी या टिप्स करा फॉलो 

लिव्हिंग रूमला द्या खास लुक 

तुम्हाला तुमच्या घराला वेगळा आणि हटके लुक द्यायचा असेल तर सर्वात आधी लिव्हिंग रूम सजवा. कारण बाहेरून येणारे पाहुणे सर्वात जास्त वेळ तुमच्या लिव्हिंग रूममध्ये असतात. अशा वेळी जास्त खर्च न करता. फर्निचर आणि पडद्यांची रंगसंगती बदलून, रंगकामाऐवजी वॉलपेपर वापरून, आकर्षक फोटोफ्रेम, इनडोअर झाडे अशा गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमला छान लुक देऊ शकता. लहान घरदेखील वाटेल प्रशस्त आणि मोठं, फॉलो करा या सोप्या टिप्स

घरात लॅंम्प, झुंबरचा करा वापर

घराला रॉयल लुक देण्यासाठी तुमच्या घरांच्या भिंतींच्या रंगानुसार लॅंम्प अथवा झुंबर लावा. कारण हा छोटासा बदल करून तुम्ही तुमच्या संपूर्ण घराचा लुक बदलू शकता. बाजारात आजकाल कमी बजेटमध्येही छान छान लाईट्सचे पर्याय मिळतात. मात्र लक्षात ठेवा लॅंम्प अथवा झुंबर तुमच्या घराच्या आकाराला साजेसं असावं. खूप मोठं अथवा खूप लहान झुंबर चांगलं दिसत नाही. अगदीच कमी बजेट असेल तर तुम्ही DIY लाईट्स तयार करून तुमचे घर सजवू शकता. DIY: ट्रेंडी राहण्यासाठी आणि घर सजावटीसाठी स्वतः तयार करा ‘या’ वस्तू

सोफ्याचा लुक बदला असा

जर तुमचा सोफा खूप जुना झाला असेल तर फक्त सोफ्याचं कव्हर बदलून तुम्ही तुमचे घर सजवू शकता. मात्र लक्षात ठेवा सोफ्याचा रंग तुमच्या घराच्या भितींना सुसंगत असावा. शिवाय जर डार्क रंगाचा सोफा असेल तर हलक्या रंगाच्या कुशन त्यावर ठेवा आणि हलक्या रंगाचा सोफा असेल तर डार्क रंगाच्या कुशन वापरा. 

ADVERTISEMENT

घराची एक खास भिंत

तुम्हाला काहीच खर्च न करता घराचा लुक चेंज करायचा असेल तर फक्त एकाच भिंतीवर छान सजावट करा. क्राफ्ट, वॉलपेपर, फोटोफ्रेम, लाईट्सचा वापर या भिंतीवर करा. ज्यामुळे घरात आलेल्या प्रत्येकाची नजर त्या भिंतीवर जाईल आणि तुमचे घर आकर्षक दिसेल. शक्य असल्यास सोफ्याच्या समोर दिसेल अशी भिंत निवडा. फोटोसेशनसाठीदेखील अशी भिंत तुमच्या उपयोगी पडेल. घराच्या सजावटीत असा करा आरशाचा उपयोग

17 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT