ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
पिठलं भाकरी आणि वांग्याचं भरीत

पिठलं- भाकरी आणि भरीत…पावसाच्या दिवसात एकदा तरी बेत

 पावसाचं वातावरण इतकं आल्हाददायी असतं की, या दिवसात काय खाऊ आणि काय नको असं होतं.  कारण या दिवसात तेलकट, तूपकट असे पदार्थ खाण्याची चांगलीच इच्छा असते. पण अनेक आजार या काळात डोकं वर काढतात त्यामुळे जरा गोष्टी बेतानं आणि दमानचं खाव्या लागतात. अशा दिवसात काहीतरी मस्त खाण्याचा बेत केला असेल तर तुम्ही मस्त पिठलं भाकरी आणि भरीत असा बेत करा. तुम्हाला नक्कीच कुठेतरी छान पिकनिकला आल्यासारखे वाटेल. हल्ली जितकं हलकं- फुलकं खाणं तितकं ते आरोग्याला चांगले असे म्हणतात. बेसनापासून तयार केलेलं पिठलं, वांग्यापासून तयार झालेलं भरीत आणि मिश्र पिठाची भाकरी एकदा कराच. यासाठी नेमकी कोणती रेसिपी फॉलो करायची ते जाणून घ्या.

पातळ पिठलं

पातळ पिठलं आणि भाकरी

पिठलं हे अनेक प्रकारे केले जाते. पण आज आपल्याला जे पिठलं करायचं ते अगदी पातळ असं असायला हवं. कारण पातळ पिठलं हे चवीला एकदम छान लागतं. असं पिठलं पटपट भुरकून खातादेखील येतं. असं पिठलं कसं तयार करायचं चला घेऊया जाणून 

साहित्य:
एक वाटी बेसन, हळद, आलं-लसूण-मिरची पेस्ट, कडिपत्ता, मोहरी,जिरं तेल 

कृती: 

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात बेसन काढून त्यात पाणी घालून एकदम पातळ असे मिश्रण करुन घ्या. त्यातील सगळ्या गुठळ्या मोड्या. त्यामुळेच पिठलं पटकन शिजायला आणि पातळ व्हायला मदत मिळेल. 
  • एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये जिरे, मोहरीची फोडणी द्या. त्यात  आलं- लसूण मिरची पेस्ट घालून चांगले एकजीव करा.
  • आता त्यात आवश्यक असल्यास कांदा घाला. कांदा चांगला मऊ झाला की फोडणीमध्ये साधारण दोन कप पाणी घालून त्याला एक उकळी येऊ द्या.
  • आता आपण कालवलेले बेसन घालून एका चमच्याने सतत ते मिश्रण एकजीव करत राहा. गुठल्या होणार नाही याची काळजी घ्या. आता गॅस मंद करुन बेसन चांगले शिजू द्या. मस्त गरमा गरम पातळ पिठलं सर्व्ह करा. 

वांग्याचे भरीत

वांग्याचे भरीत

वांग्याचे भरीत ही डिश भाकरीसोबत एक नंबर लागते. ते करायला फारसा वेळ आणि फार साहित्याची गरजही नसते. अगदी सहज तुम्हाला ही रेसिपी करता येते. 

साहित्य : भाजलेली मोठी वांगी, 2 कांदे, 1 टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गोडा मसाला, आवडत असल्यास मटार , कडिपत्ता, मीठ 

कृती: 

  • एका कढईत तेल गरम करुन त्यात तेल गरम करा. छान फोडणीसाठी कडिपत्ता, आलं-लसूण पेस्ट घालून चांगले एकजीव करा. त्यात कांदा घालून तो चांगला परतून घ्या 
  • भाजलेली वांगी सोलून त्याचा गर काढून घ्या.फोडणीत टोमॅटो आणि मसाले चांगले एकजीव झाले की, मग त्यामध्ये वांग्याचा गर घाला. सगळ्यात शेवटी मीठ घालून त्याला चांगले शिजवून घ्या. तुमची मस्त वांग्याची चटणी तयार 

पावसाच्या दिवसात असा मस्त बेत करायला अजिबात विसरु नका.  

ADVERTISEMENT
26 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT