ADVERTISEMENT
home / फॅशन
mandala-art-mehndi-designs-for-bridal-hand-in-marathi

लग्नात हातावर लावा मंडला मेहंदी डिझाईन्स, म्हणजे नक्की काय जाणून घ्या

ब्रायडल मेहंदी (Bridal Mehndi) म्हटल्यानंतर हातभर भरलेली आणि बारीक कलाकुसरीची मेहंदी असंच चित्र नेहमी डोळ्यासमोर उभं राहातं. पण आलिया – रणबीरच्या लग्नात (Alia Ranbir Marriage) आलियाच्या हातावर काढण्यात आलेली मंडला आर्ट मेहंदी (Mandala Art Mehndi) सध्या चर्चेचा विषय आहे.  आजकाल मंडला आर्ट मेहंदी खूपच ट्रेंडिंगमध्य आहे. अत्यंत नाजूक पण हलके डिझाईन्स असणारी ही मेहंदी हातावर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते. उत्तम बाब म्हणजे ज्या व्यक्ती मेहंदी लावण्यात माहीर नसतात, त्यादेखील मेहंदीचे हे डिझाईन हातावर काढू शकतात. मंडला आर्ट मेहंदीमध्ये तुम्ही कोणते डिझाईन्स हातावर काढून घेऊ शकता याची माहिती. तुम्हालाही एखाद्या कार्यक्रमासाठी मेहंदी हवी असेल आणि तासनतास मेहंदी काढून घेण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या मंडला आर्ट मेहंदी डिझाईन्सची निवड नक्कीच करू शकता. 

मल्टी सर्कल मंडला मेहंदी डिझाईन (Multi Circle Mandala Mehndi Design)

मंडला मेहंदीचे हे वैशिष्ट्य आहे की, तुम्ही हात आणि पायावर दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीचे डिझाईन्स काढू शकता. हातावर तुम्ही पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी हे डिझाईन्स उठावदार दिसतात. हातावर एक गोलाकार करून हे गोलाकार तुम्ही मेहंदी डिझाईन्सने भरावा. मेहंदी काढल्यावर आणि ती रंगल्यावर खूपच सुंदर दिसते. तसंच सध्या अनेक नवरी अशा डिझाईन्स काढून घेण्यास उत्सुक असतात. कारण या डिझाईन्स काढण्यास वेळ लागत नाही. 

बटरफ्लाय मंडला मेहंदी डिझाईन (Butterfly Mandala Mehndi Design)

बटरफ्लाय अर्थात फुलपाखराच्या डिझाईन्सची मंडला मेहंदी डिझाईन तुम्ही हातारव काढू शकता. अशा पद्धतीची मेहंदी तुम्ही काढणार असाल तर हाताच्या बोटावरही ही सुंदर फुलपाखरं लक्ष वेधून घेतात. ब्रायडल मेहंदी असल्यास, तुम्ही तुमच्या हाताच्या बोटावर आपल्या जोडीदाराचे नाव लिहून घेऊ शकता. हे दिसायला खूपच सुंदर दिसते. फुलपाखरांच्या मध्ये आपल्या जोडीदाराचे नाव काढल्यावर याचे फोटोही अप्रतिम येतात. 

लोटस मंडला आर्ट मेहंदी (Lotus Mandala Art Mehndi)

मेहंदीच्या डिझाईनमध्ये कमळाचे डिझाईन असल्यावर त्याचे सौंदर्य आपोआपच वाढते. मंडला मेहंदीमध्ये तुम्ही कमळाचे डिझाईन्स नक्कीच जोडून घेऊ शकता. तुम्हाला बाजारात अनेक मंडला आर्ट मेहंदीची पुस्तकही मिळतात. ज्यातून तुम्ही डिझाईन्स निवडून हातावर मेहंदी काढू शकता. 

ADVERTISEMENT

मंडला आर्ट विथ जाल वर्क मेहंदी (Mandala Art With Jal Work Mehndi)

तुम्हाला मेहंदी काढता येत नसेल अर्थात मेहंदी काढण्यामध्ये तुम्ही एकदम माहीर नसाल तरीही तुम्ही ही मेहंदी डिझाईन पटकन काढू शकता. गोलाकार मेहंदी डिझाईन बनवून त्यामध्ये जालवर्क तुम्ही केलेत तरीही रंगल्यावर ही मेहंदी अत्यंत उत्तम आणि आकर्षक दिसते. तसंच जालवर्क असल्यामुळे ही मेहंदी भरीव वाटते. सुटसुटीत मेहंदी अधिक खुलून दिसते. 

हेव्ही मंडला आर्ट मेहंदी डिझाईन (Heavy Mandala Art Mehndi Design)

नवरी म्हटलं की हातावर भरीव मेहंदी हवी असंही अनेकांकडून म्हटलं जातं. मंडला आर्टमध्येही तुम्ही हेव्ही अर्थात भरीव मेहंदी डिझाईन निवडू शकता. मंडला आर्ट मेहंदीने तुम्ही पूर्ण हातही भरू शकता. अत्यंत सोपे आणि पटकन होणारे असे हे डिझाईन आहे. त्यामुळे नवरीला इतर गोष्टींसाठीही वेळ मिळू शकतो आणि नवरीचा हात भरलेलाही दिसतो. तसंच ही मेहंदी किचकट नसल्याने अधिक सुटसुटीत दिसते आणि रंगल्यावर याचा वेगळा आकर्षक लुक दिसून येतो. 

याशिवाय या मेहंदीमध्ये डॉटवाली मंडला मेहंदी, लाईन्स आणि डॉटची मंडला मेहंदी, नवरा नवरीची अर्थात बन्ना – बन्नी मंडला मेहंदी आर्ट, छींटवाली मंडला मेहंदी डिझाईन्स असे अनेक डिझाईन्स दिसून येतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही डिझाईन्स काढून घ्या आणि दिसा अधिक सुंदर. हातावर आणि पायावर दोन्ही ठिकाणी तुम्हाला असे डिझाईन्स काढून घेता येतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
20 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT