ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Toh Ti Ani Fuji Movie

या देशात पहिल्यांदाच होतंय मराठी चित्रपटाचे शूटिंग 

‘तो, ती आणि फुजी’ या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाचे शूटिंग परदेशात केले जाणार आहे. प्लॅटून वन फिल्म्सने नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेले धडाडीचे दिग्दर्शक मोहित टाकळकर करणार आहेत. ‘तो, ती आणि फुजी’ ही एक विलक्षण प्रेमकहाणी असेल आणि भारतात व जपानमध्ये हे कथानक घडेल. या चित्रपटात ललित प्रभाकर व मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. ललित व मृण्मयीची जोडी ही आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे व प्रेक्षकांना त्यांची जोडी बघायला आवडते. या दोघांनी आधी ‘चि. व चि. सौ. कां.’ या धमाल चित्रपटात एकत्र काम केले होते. एका वेगळ्या विषयावर असणाऱ्या या चित्रपटाने तब्बल शंभर दिवस चित्रपटगृहांत प्रेक्षकांची गर्दी खेचली होती. आता ‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना असेच काहीतरी वेगळे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. 

तो, ती आणि फुजी – प्रेमाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा शोध घेणारा प्रवास

मोहित टाकळकर हे मराठी बरोबरच हिंदी आणि उर्दू रंगभूमीवरील देखील ख्यातनाम दिग्दर्शक आहेत. त्यांनी 2020 मध्ये ‘मिडियम स्पायसी’ या चित्रपटातून मराठी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. त्यांच्या आगामी ‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की हा चित्रपट म्हणजे प्रेमाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा शोध घेणारा प्रवास आहे. या चित्रपटाच्या कथेविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, “सध्याच्या गुंतागुंतीच्या शहरी जीवनात सहज, सुंदर आणि नैसर्गिक प्रेमाची जागा मोजूनमापून केलेल्या कृत्रिम प्रेमाने घेतली आहे. पण खरा प्रश्न तर हा आहे, की नेमकं प्रेम गुंतागुंतीचं आहे की प्रेमात पडणारी माणसं?”

‘तो, ती आणि फुजी’ - Toh, Ti ani Fuji
‘तो, ती आणि फुजी’

अशी असेल कथा 

‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाची कथा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन व्यक्तींभोवती फिरते. या दोघांच्या एकमेकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा, त्यांची वेगवेगळी मूल्ये, स्वभाव आणि आशाआकांक्षा या सर्व गोष्टींमुळे त्यांचे नाते तुटते. पण सात वर्षांनी ते दोघे पुन्हा एकमेकांपुढे अनपेक्षितपणे येतात. इतका काळ निघून गेल्यावर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर त्यांची वेगळ्या वाटेवर गेलेली आयुष्ये आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी असतात. आता या दोघांमध्ये पुन्हा नाते निर्माण होणार का, कथेत कोणता ट्विस्ट येणार हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. 

प्रसिद्ध लेखिका इरावती कर्णिक यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. यापूर्वी इरावती कर्णिक यांनी झिम्मा व आनंदी गोपाळ या चित्रपटांचीही पटकथा लिहिली आहे. त्यापैकी झिम्मा हा चित्रपट 2021 सालचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता आणि आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी इरावती कर्णिक यांना सर्वोत्कृष्ट लेखकाचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आनंदी गोपाळसाठीच ललित प्रभाकरला सर्वोत्तम अभिनेता  (क्रिटिक्स चॉईस) हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाची कथा ही प्रत्येक शहरी तरुणाला स्वतःचीच कथा वाटेल अशी इरावती कर्णिक यांना अपेक्षा आहे. त्या म्हणतात की, “आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातून आपल्याला मनापासून हवं असलेलं प्रेम निसटून गेलेलं असतं. आणि आपण सतत मागे बघून त्या प्रेमाच्या कडू-गोड आठवणींमध्ये रमतो. मला वाटतं की हा चित्रपट बघून प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या अपयशी ठरलेल्या पण उत्कट असलेल्या प्रेमाची आठवण जागी होईल.” 

ADVERTISEMENT

शिलादित्य बोरा आणि राकेश वारे हे या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या वर्षाअखेरीस चित्रपटाच्या शूटिंगला  सुरुवात होईल. हे चित्रिकरण पुणे, कोलाड, टोकियो, क्योटो आणि माउंट फुजी येथे होणार आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

03 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT