स्वप्न विज्ञानानुसार, स्वप्नात दिसणार्या प्रत्येक गोष्टीचा वास्तविक जीवनात काही ना काही संबंध असतो. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकताही आपल्या सर्वांना असते. कधीकधी स्वप्नात दिसणार्या गोष्टी भविष्यातील घटनांची सूचना असते. स्वप्नात पाणी दिसणे देखील वेगवेगळ्या चिन्हांचा संकेत असते आणि ते पाण्याचा स्त्रोत काय आहे यावर अवलंबून असते. ज्योतिष शास्त्रानुसार जिथे एकीकडे पाणी शुभ मानले जाते, तर दुसरीकडे हे पाणी तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकते. शास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात पाणी येत असेल तर समजावे की काहीतरी त्रासदायक आहे. किंवा त्याऐवजी, ते तुम्हाला आतून त्रास देत आहे. जेव्हा तुमच्या भावना पूर्वीपेक्षा थोड्या अधिक प्रभावी होतात तेव्हा असे घडते. म्हणजेच, असे म्हटले जाऊ शकते की स्वप्नातील पाणी हे एक अतिशय शक्तिशाली प्रतीक आहे जे नाकारले जाऊ नये.
अशी स्वप्ने तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. स्वप्नात दिसलेले पाणी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही लाभदायक ठरू शकते. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दिसले की तो पाण्याने वेढलेला आहे, तर असे स्वप्न एक संदेश देते की ती व्यक्ती खूप अस्वस्थ होती आणि आता वेळ आली आहे की त्याचा त्रास संपणार आहे. अशी स्वप्ने एखाद्या व्यक्तीला सूचित करतात की त्याने उठून नवीन सुरुवात करावी.
स्वप्नात पावसाचे पाणी दिसणे
ज्याप्रमाणे पाऊस हा निसर्गाचा एक सुंदर भाग आहे, त्याचप्रमाणे स्वप्नात पाऊस दिसणे हे शुभ प्रतीक आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे. तुम्हाला काही कामात यश मिळण्याचीही शक्यता आहे.
स्वप्नात पूर दिसणे
पुराच्या पाण्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होते. त्याचबरोबर स्वप्नात पुराचे पाणी पाहणे देखील अशुभ मानले जाते. आयुष्यात अडचणी वाढण्याचा हा संकेत असू शकतो. कुठूनतरी वाईट बातमी मिळण्याचीही शक्यता आहे.हे स्वप्न पडल्यास भविष्यात काही त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून, या स्वप्नानंतर लगेचच देवाची उपासना केली पाहिजे आणि सर्वकाही चांगले होण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.
स्वप्नात विहिरीचे पाणी दिसणे
स्वप्नात विहिरीचे पाणी दिसणे हे देखील शुभ प्रतीक आहे. तुम्हाला कुठूनही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो.
स्वप्नात नदी किंवा नदीचे पाणी दिसणे
स्वप्नात नदीचे पाणी दिसणे शुभ मानले जाते. तुमची कोणतीही जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला आगामी काळात सुवर्णसंधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळू शकते. जर तुम्हाला तुम्ही स्वप्नात स्वत: नदीच्या पाण्यात पोहताना दिसते तर ते देखील शुभ प्रतीक आहे. तुमच्या आयुष्यात चांगली घटना घडण्याचा हा एक संकेत असू शकतो.
स्वप्नात समुद्र दिसणे
स्वप्नात समुद्राचे पाणी दिसणे हा चांगला संकेत मानला जात नाही. हे जीवनातील चढ-उतार सूचित करते. तुम्हाला स्वप्नात समुद्र दिसला तर नजीकच्या भविष्यात तुमची एखाद्याशी भांडण होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात समुद्राचे पाणी दिसले तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कारण तुमचे कडू शब्द वादाचे कारण बनू शकतात.
स्वप्नात स्वच्छ पाणी पाहणे हे देखील एक शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ तुम्हाला कामात लवकर यश मिळू शकते. हे स्वप्न नोकरी आणि व्यवसायात प्रगती दर्शवते. कदाचित तुम्हाला पदोन्नती मिळेल किंवा व्यवसायात फायदा होईल.जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सतत घाणेरडे पाणी दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती सर्व बाजूंनी नकारात्मक शक्तींनी वेढलेली आहे. अशी स्वप्ने त्या व्यक्तीला सूचित करतात की त्याने आपल्या सभोवतालचे नकारात्मक घटक काढून टाकले पाहिजेत आणि नवीन सुरुवात करावी. यासोबतच हे स्वप्न सर्व काही विसरून पुढे जाण्याचे संकेत देते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक