ADVERTISEMENT
home / नातीगोती
एकत्र कुटुंबातील चुका

एकत्र कुटुंबात राहताना टाळा या चुका

 आता पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धत दिसत नाही. फार फार तर कुटुंबात 5 जण असतात. त्यातही अनेकदा मनभेद आणि मतभेदाच्या गोष्टी होतात. पण अजूनही काही ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धत सर्रास दिसून येते. आताच्या या 2022 साली कुटुंब एकत्र राहात असेल तर ते कौतुकास्पद आहे. कारण सगळ्या गोष्टींना झुगारुन ज्यावेळी आपण एकत्र राहतो त्यावेळी कुटुंब म्हणून आपण अधिक सक्षम असतो. पण अनेकदा या कुटुंबाचा भाग होताना खूप जण अशा काही चुका करतात की. त्यामुळे घर तुटण्याच्या मार्गावर येऊन थांबते. सून म्हणून तुम्ही एकत्र कुटुंबाचा भाग होत असाल आणि सगळ्यांचे प्रेम तुमच्या वाट्याला यावे असे वाटत असेल तर तुम्ही काही चुका या टाळायला हव्यात. तर तुम्हाला त्या कुटुंबाच्या सगळ्यांचे प्रेम मिळू शकेल. 

आतताईपणा करणे

ज्यावेळी आपण छोट्या कुटुंबातून मोठ्या कुटुंबात येत असतो. त्यावेळी अनेक गोष्टी बदललेल्या असतात. अनेक गोष्टींची ॲडजस्टमेंट करणं हे आपल्यासाठी खूप जास्त गरजेचे असते. आपल्या घरात आपण आपल्या काही गोष्टींसाठी आतताईपणा करतो त्यावेळी आपल्या पालकांना आपला मूळ स्वभाव आणि आपल्या काही गोष्टी माहीत असतात. पण मोठ्या कुटुंबात सगळ्यांचेच तुमच्याबद्दल असे विचार असतील असे अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे घरातील कोणाबद्दलही कोणताही विचार करताना आतताईपणा करु नका. त्या आतताईपणाचा परिणाम तुमच्या घरातल्यांच्या इतर नातेसंबंधाशी होत असतो. एकत्र कुटुंबात राहताना हा गूण एक सून म्हणून तुम्हाला ठेवता येत नाही. या गोष्टीची काळजी घ्यावी. 

एकमेकांबद्दल बोलणे टाळा

फोटो प्रातिनिधिक आहे

एकत्र कुटुंबात कितीही हेवेदावे असले तरी देखील त्यामध्येही त्यांच्यात असलेले प्रेम असते. त्यांचे कितीही भांडण झाले तरी पुन्हा एक होणे हे एकत्र कुटुंबाचे लक्षण असते. नव्याने तुम्ही त्या घरात जाता त्यावेळी एखाद्या घरातल्या व्यक्तीबद्दल दुसऱ्याकडे सांगणे हे कधीही चांगले नाही. कारण तुम्ही एखाद्याबद्दल जर वाईट बोलत असाल तर कधी ना कधी ती गोष्ट ही त्या व्यक्तीला कळतात. त्यामुळे गैरसमज होतात. असे गैरसमज हे तुमच्याबद्दल एकदा निर्माण झाले की, त्यामुळे कुटुंबात  नको असलेली कुजबूज सुरु होेते. कुजबूज  करणे हे चांगल्या गोष्टीसाठी चांगले असले तरी प्रत्येक गोष्टीत असे चांगले नाही. त्यामुळे तुम्ही अशा चुका करत असाल तर असे अजिबात करु नका. 

कुरघोडी करु नका

खूप जणांना सतत कुरघोडी करायची सवय असते. ही सवय एकत्र कुटुंबात राहताना खूप महागात पडू शकते. त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करु नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी असाल त्याचा आनंद सगळ्यांनाच होतो. पण जर तुम्ही तुमच्या गोष्टीमुळे थोडे घमेंडी असाल किंवा तुमच्यात सतत मी पणा आलेला असेल तर तुमचा हा स्वभाव इतरांना नकोसा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्याच्या जवळ जायचे सोडून तुम्ही एकमेकांपासून दूर होऊ शकता. 

ADVERTISEMENT

दुसऱ्याला सतत तोलणे

एकत्र कुटुंबात सगळ्यांचा स्वभाव सारखा असेल असे सांगितले जात नाही. कोणाला तुमचे पटेल कोणाला नाही पटणार, कोणी तुम्हाला तुमच्या गोष्टीवर बोलेल, तो तुम्हाला कदाचित अपमान वाटेल. पण असे अजिबात समजू नका. याचे कारण असे की, काही परिस्थितीनुसार किंवा तुमच्याप्रमाणे इतरांचाही स्वभाव असू शकतो. त्यामुळे तुम्ही लगेच तुम्हाला विरोध केला म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका किंवा लगेचच दुसऱ्याला तोलू नका. माणसं समजायला थोडा वेळ घ्या. 

कुटुंबात माणसं समजून घेणे हे फार महत्वाचे असते. माणसं समजून घेणे एका दिवसाचे काम नाही. एकमेकांना थोडा वेळ द्या. तुम्हीही थोडा वेळ घ्या. म्हणजे तुम्हाला समजून घेताना कोणताही अडथळा येणार नाही. 

15 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT