ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Monsoon Nail Care Tips

पावसाळ्यात नखांना होऊ शकते इन्फेक्शन, वाचा कशी घ्यावी काळजी

पावसाळा त्वचेला हानी पोहोचवू शकतो खास करून या दिवसांत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता खूप वाढतो. या काळात नखांना संसर्ग होण्याची जास्त भीती असते.पावसाळ्यात  पायांच्या नखांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पायाच्या नखांभोवतीची त्वचा जर लाल, सुजलेली असेल आणि त्वचेला खाज सुटत असेल तर तिथे संसर्ग तर झाला नाही ना याची खात्री करून घ्या. पावसाळ्यात जर जास्त वेळासाठी त्वचा पाण्याच्या संपर्कात आली तर तिथे संसर्ग होऊ शकतो. शरीराच्या इतर भागांप्रमाणेच, नखांचीही वर्षभर नियमित स्वच्छता व निगा राखणे आवश्यक असते. वाचा पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्यायची. 

पावसाळ्यात नखं नियमितपणे कापा 

Monsoon Nail Care Tips
Monsoon Nail Care Tips

तुम्ही तुमची नखे त्यांच्या वाढीनुसार आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कापली पाहिजेत. नखं लांब असतील तर पाण्यात काम केल्याने आणि हवेतील आर्द्रतेमुळे तिथे जीवाणूंना वाढण्याची संधी मिळते. शिवाय, ओलसरपणामुळे तुमची नखे किंचित लवचिक बनतात, ज्यामुळे ती वाकण्याची किंवा तुटण्याची अधिक शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात तरी नखे लहान ठेवा, त्यांना ट्रिम करा आणि त्यांच्या कडा गुळगुळीत करण्यासाठी चांगल्या दर्जाचे filler वापरा. 

नखं ट्रिम केल्यानंतर बेसकोट लावा 

Monsoon Nail Care Tips
Monsoon Nail Care Tips

पावसाळ्यात किंवा केव्हाही नेलपॉलिश लावण्यापूर्वी बेसकोट लावा कारण ते तुमच्या नखांवर एक संरक्षणात्मक थर तयार करेल आणि तुमच्या नखांना कमकुवत होण्यापासून रोखेल. काही नेलपॉलिशमध्ये पॅराबेन, डायथिल फॅथलेट्स आणि डिब्युटाइल फॅथलेट्स यांसारखी अनेक विषारी रसायने असतात, ज्यामुळे नखे ठिसूळ, कोरडी आणि पातळ होतात तसेच त्यांच्या सभोवतालच्या त्वचेवर प्रतिकूल परिणाम होतात. शक्य असल्यास, वॉटर बेस्ड पॉलिश वापरा. वॉटर बेस्ट पॉलिश जास्त काळ टिकत नाही परंतु ते वापरण्यास सर्वात सुरक्षित आहेत. याव्यतिरिक्त, तुमच्या नखांचा आणि क्यूटिकलचा गुळगुळीतपणा राखण्यासाठी तुमचे नेलपॉलिश काढताना चांगल्या दर्जाचे नेलपॉलिश रिमूव्हर वापरा. 

नखे कोरडी ठेवा 

पावसाळ्यात तुमच्या पायाची नखे आणि पाय नेहमी कोरडे ठेवा. पावसाळ्यात बाहेर गेल्यावर अनेकदा आपले पाय साचलेल्या घाण पाण्याच्या संपर्कात येतात, ज्यामुळे पायाच्या नखांचे नुकसान होऊ शकते. दमट वातावरणाचा परिणाम म्हणून मृत त्वचेच्या पेशी आणि संसर्गजन्य जीवाणू त्वचेवर जमा होतात..याव्यतिरिक्त, दिवसभर बंद लेदर शूज घालणे टाळा कारण या वातावरणात बुरशीची वाढ झपाट्याने होते. बाहेर जाताना शक्यतोवर उघडे शूज, फ्लोटर्स किंवा चप्पल घाला. तसेच परत आल्यावर पाय आणि नखे स्वच्छ धुवून पूर्ण कोरडे करा.

ADVERTISEMENT

पाण्यात काम करताना हातमोजे घाला 

Monsoon Nail Care Tips
Monsoon Nail Care Tips

स्वच्छतेची कामे करताना, पाण्यात कामे करताना रबरचे हातमोजे घाला. स्वच्छतेसाठी कठोर रसायने वापरत असाल किंवा बागकाम करत असाल किंवा असे कोणतीही कामे करणे ज्यामुळे तुमचे हात गरम किंवा साबणाच्या पाण्याच्या संपर्कात येत असतील तर त्यामुळे नखे खराब होऊ शकतात. म्हणूनच पाण्यात काम करताना रबर किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे घाला. ग्लव्ज घातल्याने तुमच्या नखांचे तसेच तुमच्या नेलपॉलिशचे संरक्षण होते आणि त्वचा हानिकारक रसायनांच्या संपर्कात येत नाही. 

अँटीफंगल पावडर वापरा 

तुमच्या पावसाळ्यातील स्किनकेअर रुटीनमध्ये अँटीफंगल पावडरचा समावेश करा. संसर्ग टाळण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या पायाच्या नखांभोवती ही पावडर लावा. बुरशीचा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही जेनेरिक टॅल्कम पावडर वापरू शकता किंवा डिओडरंट स्प्रे करू शकता. 

नखं स्वच्छ करताना तीक्ष्ण साधने वापरू नका 

नखांच्या खाली पूर्णपणे स्वच्छता करण्यासाठी लांब टोकदार साधने वापरणे सामान्य आहे. पण यामुळे नखे आणि नेल बेड यांच्यामध्ये अंतर निर्माण होऊ शकते. या जागेत जिवाणूंची वाढ होऊ शकते. तुम्ही नेल ब्रशने नखे हळूवारपणे स्क्रब करू शकता.

अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्यात नखांची काळजी घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

 Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

28 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT