ADVERTISEMENT
home / Planning
most common honeymoon mistakes couples can avoid in Marathi

हनिमूनला जाताना करू नका या चुका, नंतर होईल पश्चाताप

लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी प्रत्येक जोडपं उत्सुक असतं. त्यामुळे लग्नापेक्षा जास्त प्लॅनिंग ते हनिमूनसाठी करतात. हनिमूनला जाताना फक्त कुठे, कधी, किती दिवस जायचं हे महत्त्वाचं नाही. कारण त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी तुम्हाला हनिमूनचं प्लॅनिंग करताना माहीत असाव्या लागतात. पण बऱ्याचदा कपल अती उत्साहात अशा काही चुका करतात ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. यासाठीच हनिमून प्लॅनिंग करण्यापूर्वी ही माहिती अवश्य वाचा.

केरळला जाण्याचा प्लॅन करताय… मग येथे नक्की जा – Kerala Tourism Places In Marathi

हनिमूनला जाताना करू नका या चुका

हनिमून ही नवीन लग्न झालेल्या प्रत्येक कपलसाठी एक खास गोष्ट असते. पण एक छोटीशी चूक तुमच्या हनिमूनचा मूड खराब करू शकते. यासाठी हनिमूनचं प्लॅनिंग सावधपणे करा आणि या चुका मुळीच करू नका.

लग्नानंतर लगेच हनिमूनला जाणे 

लग्नानंतर हनिमूनला जाणं गरजेचं असलं तरी यासाठी लगेच दुसऱ्या अखवा तिसऱ्या तिवशी प्लॅनिंग करू नका. कारण लग्नाची तयारी आणि लग्न समारंभ यामुळे तुम्ही आधीच थकलेले असता. अशा वेळी लग्नसोहळ्यानंतर एक ते दोन दिवस तुम्हाला आरामाची नक्कीच गरज असते. त्यामुळे जर लग्नानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हनिमूनसाठी गेला तर तुमचे एक ते दोन दिवस कंटाळवाणे जाऊ शकतात.

ADVERTISEMENT

डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट (Destination Wedding Places In Maharashtra In Marathi)

हनिमूनचं प्लॅनिंग न करणे 

काही लोकांना फिरताना कोणतेही प्लॅनिंग न करता प्रवास करण्याची सवय असते. मात्र लग्नानंतर हनिमूनला जाताना तुम्हाला प्लॅनिंग करून जाणं गरजेचं आहे. कारण आता तुमच्यासोबत तुमचा जोडीदार आहे आणि त्याच्यासोबत हे खास क्षण अनुभवण्यासाठी हनिमूनचा प्रत्येक क्षण व्यवस्थित प्लॅन केलेला असायलाच हवा. नाहीतर प्रवासात येणाऱ्या अडी अडचणी सोडवण्यात, बुकींग करण्यातच तुमचा हनिमूनचा वेळ निघून जाईल.

दुसऱ्या कपल्सशी तुलना करणे

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खास गोष्ट असते. त्यामुळे तुमचं लग्न अथवा हनिमूनची तुलना इतरांशी करू नका. तुमच्या समवयस्क अथवा मित्रमैत्रिणींशी तुलना करण्यासाठी तुमचा हनिमून खराब करू नका. कारण तु्म्ही कुठे, कसे जाता यापेक्षा तुम्ही हनिमून कसा सेलिब्रेट करता हे जास्त महत्त्वाचे आहे.  

जास्त सामान घेऊन हनिमूनला जाणे 

बऱ्याच जणींना प्रवासात भरपूर सामान कॅरी करण्याची सवय असते. मात्र जेव्हा तुम्ही हनिमूनला जाता तेव्हा तुम्हाला कमीत कमी सामान व्यवस्थित पॅक करून जाण्याची ट्रिक माहीत असायला हवी. कारण जेवढं जास्त सामान तेवढा तुमचा फिरण्याचा आनंद कमी होत जाईल.

ADVERTISEMENT

अॅक्टिव्हिटीज मध्ये व्यस्त राहणे

हनिमूनला जाताना तुम्ही जे डेस्टिनेशन निवडणार आहात तिथे जास्त अॅक्टिव्हिटीज नसतील याची काळजी घ्या. कारण या अॅक्टिव्हिटीज तुम्ही आयुष्यात नंतरदेखील करू शकता. त्या करत बसाल तर तुम्ही एकमेकांना जास्त वेळ देऊ शकणार नाही. हनिमूनमधील प्रत्येक क्षण खूप खास आहे. त्यामुळे एखाद्या शांत, रोमॅंटिक ठिकाणी हनिमूनला जा. ज्यामुळे तुमचा हनिमून अविस्मरणीय असेल.

नाशिक पर्यटन स्थळे (Nashik Tourist Places In Marathi)

पीक सीझन मध्ये हनिमूनला जाणे 

लग्नानंतर हनिमूनला जाताना तुम्ही जर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आणि पीक सीझनला जाण्याचे ठरवले. तर तुम्हाला एकांत मिळणार नाही. यासाठी हनिमून नेहमी ऑफ सीझनमध्ये ठरवा. ज्यामुळे तुम्हाला जास्त पर्यटक आणि गर्दी कमी मिळेल. एखाद्या हिल स्टेशन अथवा निसर्गरम्य ठिकाणी ऑफ सीझनला तुमच्या जोडीदारासोबत जाणं जास्त रोमॅंटिक ठरू शकेल. 

15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT