ADVERTISEMENT
home / Skin Care Products
organic sunscreen

उन्हाळ्यात वापरा नैसर्गिक सनस्क्रिन, मिळवा फायदे

चेहऱ्यावर जेव्हा अकाली वृद्धत्वाच्या खुणा म्हणजे सुरकुत्या व पिगमेंटेशन दिसू लागते किंवा त्वचा टॅन होते तेव्हा सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे हे समजून जावे. त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन वापरणे हा स्किन केअर रुटीनचा एक अविभाज्य भाग आहे. उन्हामुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी चांगले सनस्क्रीन क्रीम वापरले पाहिजे. आपल्या देशात वर्षाचे जवळजवळ सगळेच महिने भरपूर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे वर्षाचे बाराही महिने सनस्क्रीन लावलेच पाहिजे. अगदी पावसाळ्यात सुद्धा जरी ढगाळ वातावरण असेल तरी सूर्याची किरणे आणि  UV किरणे ढगांमधून आरपार जाऊ शकतात आणि त्वचेचे नुकसान करण्यासाठी अतिनील किरणेच जबाबदार असतात. म्हणूनच वर्षाचे सगळे दिवस आपण फक्त चेहेऱ्यालाच नव्हे तर सगळ्या दृश्य भागाला सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. तसेच आपण वापरतो त्या सनस्क्रीनबाबत संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे.

Organic Sunscreen
Organic Sunscreen

सनस्क्रीन वापरल्याने सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण होते, आणि त्वचेच्या कर्करोगासारख्या अनेक त्वचेच्या आजारांपासूनही रक्षण होते. पण बाजारात मिळणाऱ्या अनेक सनस्क्रीनमध्ये घातक रसायने असू शकतात ज्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. एमिनोबेंझोइक ऍसिड किंवा पॅरा-अमीनोबेंझोइक ऍसिड/पीएबीए असलेल्या काही सनस्क्रीन उत्पादनांमुळे कपड्यांवर डाग पडू शकतात आणि त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते. रासायनिक सनस्क्रीनमुळे त्वचेवर लालसरपणा किंवा जळजळ होणे हे त्रास होऊ शकतात. तुम्‍हाला तुमच्‍या स्‍वत:च्‍या आरोग्याची किंवा पर्यावरणाची काळजी असल्‍यास, नैसर्गिक घटकांनी युक्त असे ऑरगॅनिक सनस्क्रीन वापरा जे तुमच्‍या त्वचेसाठी आणि पर्यावरणासाठीही सुरक्षित आहे. कारण ते विशिष्ट रसायनांपासून मुक्त आणि संवेदनशील त्वचेसाठी अनुकूल असण्यासाठी डिझाइन केलेले असल्यामुळे, हा खनिज-आधारित SPF फॉर्म्युला त्वचेचे नुकसान करीत नाही. म्हणूनच अशा ऑरगॅनिक उत्पादनांचा वापर करायला हवा. यातील नैसर्गिक घटक त्वचेसाठी फायदेशीर असतात आणि त्यामुळे त्वचेला त्रासही होत नाही. ऑरगॅनिक हार्वेस्टची पुढील सनस्क्रीन उत्पादने त्वचेसाठी तर फायदेशीर व सुरक्षित आहेतच पण ती पर्यावरणासाठीही सुरक्षित आहेत.

ऑरगॅनिक हार्वेस्टचे सनस्क्रीन – SPF 60 हे स्सनस्क्रीन अजिबात चिकट नाही आणि त्वचेमध्ये जलद शोषले जाते.  हे सनस्क्रीन प्रमाणित सेंद्रिय घटकांनी बनलेले आहे. हे त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास आणि सूर्याच्या अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे सनस्क्रीन 100% सेंद्रिय आहे. तसेच यात PABA आणि Paraben व  मिनरल ऑइल हे रासायनिक घटक नाहीत. हे ऑरगॅनिक सनस्क्रीन पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही त्वचेसाठी योग्य आहे व कोरड्या तसेच तेलकट अशा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चालणारे आहे. बाहेर जाण्यापूर्वी 20 मिनिटे आधी चेहरा, मान आणि त्वचेच्या इतर दृश्य भागात भरपूर प्रमाणात हे सनस्क्रीन लावा. यामध्ये ऑलिव्ह ऑइल, चिंचेच्या बियांचा अर्क असे नैसर्गिक घटक त्वचेला चांगले हायड्रेटेड ठेवतात आणि पोषण देतात तसेच अतिनील किरणांपासून त्वचेचे दीर्घकाळ संरक्षण करतात. 

मुरुमप्रवण व तेलकट त्वचेसाठी ऑरगॅनिक हार्वेस्टचे हे सनस्क्रीन वापरा. यातील ब्लू लाइट तंत्रज्ञानासह SPF 60 तुमच्या त्वचेला सूर्याच्या UVA आणि UVB किरणांपासून तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निळ्या प्रकाशापासून ब्रॉड-स्पेक्ट्रम संरक्षण प्रदान करते. हे सनस्क्रीन देखील अजिबात चिकट व ग्रीसी लूक देत नाही तसेच त्वचेत जलद शोषून घेतले जाते. नैसर्गिक घटकांनी युक्त असे हे सनस्क्रीन अतिनील किरण आणि निळ्या प्रकाशाच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करण्याबरोबरच त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यात आणि पोषण देण्यास मदत करते.

ADVERTISEMENT

ब्लू लाइट तंत्रज्ञानाने युक्त असलेले ऑरगॅनिक हार्वेस्टचे एसपीएफ 60 सनस्क्रीन हे एक प्रमाणित ऑरगॅनिक उत्पादन आहे जे वनस्पतींच्या नैसर्गिक घटकांपासून बनवले आहे. हे त्वचेत जलद शोषले जाते आणि सनबर्न झालेल्या त्वचेला बरे करते. हे सनस्क्रीन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम आहे व सूर्याच्या UVA आणि UVB किरणांपासून त्वचेला ब्रॉड स्पेक्ट्रम संरक्षण प्रदान करते. सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी, सनस्क्रीन लावण्यापूर्वी ऑरगॅनिक हार्वेस्टचे मॉइश्चरायझिंग लोशन लावा.

तर या उन्हाळ्यात रासायनिक सनस्क्रीन लावण्यापेक्षा हे ऑरगॅनिक सनस्क्रीन वापरून बघा.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

14 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT