भारतीयांची त्वचा साधारणपणे तेलकट स्वरूपाची असतेच. त्यात वातावरणात होणारे बदल, चुकीचा आहार, जीवनशैलीत झालेले बदल आणखी भर घालतात. ज्यामुळे पिंपल्ससारख्या अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होतात. या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर भरपूर पाणी पिणं, योग्य आणि संतुलित आहार घेणं, सतत चेहरा स्वच्छ करणं आणि चांगल्या नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला त्वचेसाठी उत्तम अशा उत्पादनांवर थोडा खर्च नक्कीच करायला हवा. वास्तविक चांगले ऑईली स्किन प्रॉडक्टही आजकाल बजेटमध्ये असतात. मात्र या प्रॉडक्टमध्ये नैसर्गिक घटक असायला हवेत. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही.
तेलकट त्वचेची निगा राखण्यासाठी बेस्ट नैसर्गिक उत्पादने
आम्ही तुमच्यासोबत असे काही प्रॉडक्ट शेअर करत आहोत, ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा कमी होईलच शिवाय तुमच्या त्वचेचं योग्य पोषणही होईल.
ऑर्गेनिक हारवेस्ट प्युअर ब्राईटनिंग फेस वॉश
तेलकट त्वचेची निगा राखण्याचा सोपा उपाय म्हणजे एखाद्या चांगल्या फेसवॉशचा वापर करणं, कारण वारंवार चेहरा धुतल्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ व्हायला हवी पण कोरडीदेखील पडता कामा नये. या फेसवॉश तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा कमी करतं, त्वचा स्वच्छ करतं, त्वचा उजळ करतं, टवटवीत ठेवतं आणि त्वचेचा मऊपणा कायम राहतो. शिवाय हे उत्पादन नैसर्गिक असून क्रुअल्टी फ्री आणि पेराबेन फ्रीदेखील आहे.
ऑर्गेनिक हारवेस्ट नीम तुलसी टोनर
कडूलिंब आणि तुळस दोन्ही तुमच्या तेलकट त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. त्वचा स्वच्छ करण्यासोबत गरजेचं आहे त्वचेला योग्य पोषण देणं. म्हणूनच तुम्ही ऑर्गेनिक हारवेस्टच्या या नीम – तुलसी टोनरचा वापर करायला हवा. या स्कीन टोनरचा वापर तुम्ही प्रत्येक वेळी चेहरा धुतल्यानंतर करू शकता. कारण यातील नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेचं नुकसान न होता त्वचेला अधिक तजेला देतात. तुमच्या एखाद्या बेस्ट फ्रेंडला तुम्ही हे नैसर्गिक ब्युटी प्रॉडक्ट गिफ्ट देऊ शकता. त्वचेला लावल्यानंतर तुमची त्वचा मऊ होतेच शिवाय सुंदर सुगंधही मिळतो.
लॅक्मे ब्लश अॅंड ग्लो फेस स्क्रब
तेलकट त्वचेमध्ये अतिरिक्त तेलाची निर्मिती होत असल्यामुळे कायम त्वचा तेलकट राहते. अशा वेळी फक्त फेसवॉशने चेहरा स्वच्छ करून काम होत नाही. कारण त्वचा मुळापासून स्वच्छ झाली तरच तुम्हाला फ्रेश वाटतं. यासाठी तुम्ही लॅक्मेचं हे स्क्रब नक्कीच वापरू शकता. स्टॉबेरी, अक्रोड आणि जर्दाळू अशा नैसर्गिक फळांच्या अर्कापासून हे उत्पादन बनवण्यात येतं. ज्यामुळे त्वचेचं नुकसान न होता त्वचा मुळापासून स्वच्छ केली जाते. तेलकटपणामुळे ब्लॉक झालेली त्वचेची छिद्रे यामुळे सहज मोकळी होतात. डेड स्किन निघून जाते आणि त्वचेचा पीएच बॅलन्स टिकून राहतो. शिवाय फळांच्या अर्कामुळे तुमच्या त्वचेला सतत एक फ्रेश आणि सुंदर सुगंध मिळत राहतो.
दी बॉडी शॉप फुजी ग्रीन टी रिप्लेनिशिंग जेल लोशन
त्वचा क्लिन आणि टोन केल्यानंतर त्वचेच्या पोषणासाठी योग्य मॉईस्चराईझर अथवा बॉडी लोशनची गरज असते. आजकाल चिकटपणा कमी जाणवावा यासाठी जेल लोशनही बाजारात मिळतात. तुम्ही यासाठी बॉडी शॉपचं जेल लोशन वापरू शकता. ग्रीन टी तुमच्या त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय ग्रीन टी पासून बनवलेलं हे जेल लोशन लाईटवेट फॉर्म्युला वापरलेलं असल्यामुळे तुमच्या त्वचेला योग्य प्रमाणात हायड्रेट ठेवतं आणि यामुळे चिकटपणा जाणवत नाही. शिवाय याला एक छान सुगंधही आहे.
अॅनाटोमिकल डीप क्लिंझिंग मड मास्क
आजकाल सर्वत्र मड मास्क लावण्याचं क्रेझ दिसून येतं. कारण मड मास्कमुळे तुम्हाला पटकन हवा तसा ग्लो मिळतो आणि त्वचा खोलवर स्वच्छ होते. या मड मास्कमुळे तुमच्या त्वचेला छान चमकही मिळते. जर तुम्हाला त्वचेवर ब्लॅकहेड्स, तेलकटपणा अति प्रमाणात जाणवत असेल तर तुम्ही हा मड मास्क वापरून पाहायलाच हवा. यामुळे तुमच्या त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे तुमच्या त्वचेत निर्माण होणाऱ्या तेलाच्या निर्मितीवर चांगला परिणाम होतो. शिवाय एखाद्या कार्यक्रमासाठी पटकन तयार व्हायचं असेल तर यामुळे छान ग्लोदेखील झटपट त्वचेवर दिसू शकतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक