ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Natural Things To Add To Your Bath water for soft skin

अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे नैसर्गिक घटक, त्वचा राहिल मऊ आणि मुलायम

अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने थकवा, अशक्तपणा कमी होतो हे तुम्हाला माहीत असेलच. दिवाळीच्या दिवसांमध्ये अभ्यंगस्नान करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात गुलाबपाणी, सुंगधित द्रव्ये मिसळण्याची पद्धत आहे. मात्र जर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि मुलायम हवी असेल तरी तुम्ही अंघोळीचे पाणी खास पद्धतीने तयार करायला हवे. काही नैसर्गिक घटकांचा वापर अंघोळीच्या पाण्यात करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.

अंघोळीच्या पाण्यात कोणते नैसर्गिक घटक मिसळावे –

अंघोळीच्या पाण्यात नैसर्गिक तेल, मीठ असे घटक वापरून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. पूर्वीच्या काळी शाही स्नानासाठी दुधाने अंघोळ केली जात असे. यासाठी दुधात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जात असत. मात्र तुम्हाला आताच्या काळात एवढं करणं शक्य नसलं तर घरातील काही नैसर्गिक घटक तुम्ही नक्कीच अंघोळीच्या पाण्यात मिसळू शकता. यासोबत वाचा यासाठी करायला हवी कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ, जाणून घ्या फायदे

ऑलिव्ह ऑईल

अंघोळ करण्यापूर्वी अंघोळीच्या पाण्यात तुम्ही दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळू शकता. ऑलिव्ह ऑईल पाण्यात एकजीव करा आणि मग हळू हळू ते पाणी अंगावर घेत अंघोळ करा. ज्यामुळे तुमचे शरीर ऑलिव्ह ऑईल शोषून घेईल आणि तुमची त्वचा चांगले पोषण मिळाल्यामुळे मऊ आणि चमकदार दिसेल. काय आहे हॉट टॉवेल स्क्रब, जाणून घ्या फायदे

टी ट्री ऑईल

ट्री ट्री ऑईल तुमचा थकवा, ताणतणाव कमी करण्यास मदत करते. या तेलामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. शरीर रिलॅक्स झाल्यामुळे त्वचा जास्त तजेलदार आणि टवटवीत दिसते. यासाठी काही थेंब टी ट्री ऑईल अंघोळीच्या टबमध्ये टाका आणि मस्त अंघोळीचा आनंद घ्या. या पाण्यने अंघोळ केल्यामुळे तुमच्या त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा मऊ होते. जड पाण्यामुळे होते त्वचेचे नुकसान, यासाठी करा हे सोपे उपाय

ADVERTISEMENT

नारळाचे दूध अथवा तेल

अंघोळीच्या पाण्यात थोडं नारळाचे तेल अथवा नारळाचे दूध मिसळले तरी तुमची त्वचा छान मॉईच्शराईझ होईल. नारळाच्या तेलात तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी करणारे गुणधर्म असतात. नारळाच्या तेलामुळे त्वचेचे पोषण होते आणि त्वचा मऊ होतेच. शिवाय त्वचेचे जीवजंतूंपासून संरक्षण झाल्यामुळे त्वचेच्या समस्या आपोआप कमी होतात.

सैंधव

पाण्यात जाड मीठ घालून आजवर तुम्ही अंघोळ नक्कीच केली असेल. पण अंघोळीच्या पाण्यात कधी सैंधव मिसळलं आहे का ? सैंधव पाण्यात मिसळून अंघोळ केल्यामुळे थकवा आणि ताणतणाव दूर होतो. शिवाय त्वचेतील मांसपेशींना आराम मिळाल्यामुळे त्वचा खुलून दिसते. त्वचेला मऊपणा येण्यासाठी आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात सैंधव नक्की मिसळून पाहा. 

गुलाबपाणी

सर्वात महत्त्वाचा आणि सहज करण्यासारखा उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यात थोडं गुलाबपाणी मिसळणे. कारण गुलाबपाणी तुमच्या त्वचेला डिटॉक्स करण्यासाठी आणि त्वचेचा दाह कमी करण्यासाठी खूप उपयुकक्त आहे. जररोज अंघोळीच्या पाण्यात गुलाबपाणी मिसळण्यामुळे तुमची त्वचा नक्कीच मऊ आणि मुलायम दिसू लागेल.

16 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT