बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आणि दिग्दर्शक नीरज पांडे यांची जोडी पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर परतणार आहे. ‘सिक्रेट्स’ फ्रँचायझीच्या दुसऱ्या अध्यायातून दोघे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. Discovery+ ने सोमवारी या डॉक्यु-सीरीजचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. ‘सिक्रेट्स ऑफ द कोहिनूर’ असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत मनोज वाजपेयी पुन्हा एकदा एक अज्ञात गोष्ट रंजक पद्धतीने लोकांना सांगणार आहेत.
या दिवशी होणार रिलीज
‘सिक्रेट्स ऑफ सिनौली: डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी’च्या प्रचंड यशानंतर प्रेक्षक या सीरिजच्या नव्या अध्यायाची आतुरतेने वाट पाहत होते. दर्शकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या 4 ऑगस्टला ही मालिका सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या डॉक्युमेंट-सीरीजमध्ये सखोल संशोधन आणि उत्कृष्ट कथाकथनाद्वारे प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याची अज्ञात कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.. यावर आपले विचार शेअर करताना दिग्दर्शक नीरज पांडे म्हणाले की, “‘सिक्रेट्स ऑफ सिनौली’च्या जबरदस्त यशानंतर, ‘सिक्रेट्स ऑफ द कोहिनूर’साठी डिस्कव्हरी+ आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत पुन्हा एकत्र काम करायची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मनोजच्या उत्कृष्ट कथाकथनाच्या शैलीने तो कोहिनूरचा प्रवास कथन करण्यासाठी अगदी योग्य आहे.मला खात्री आहे की हा ऐतिहासिक प्रवास जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करेल.”
या मालिकेची निर्मिती नीरज पांडे यांची निर्मिती कंपनी फ्रायडे स्टोरीटेलर्स करत आहे तर तिचे दिग्दर्शन राघव जयरथ यांनी केले आहे. डिस्कव्हरी प्लॅटफॉर्मने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली आहे. नीरज आणि मनोज यांनी यापूर्वी डिस्कव्हरी प्लससाठी सिक्रेट्स ऑफ सिनौली – डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी शो केला आहे. विशेष म्हणजे मनोज वाजपेयी यांनी नीरज पांडे दिग्दर्शित अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. स्पेशल 26 या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर ते अय्यारी या चित्रपटातही होते.
काय आहे कोहिनूरची कथा
कोहिनूर हा जगातील सर्वात मोठा हिरा असल्याचे म्हटले जाते. त्याची लांबी 3.6 सेमी, रुंदी 3.2 सेमी आणि उंची 1.3 सेमी आहे. या शोची माहिती शेअर करताना मनोज वाजपेयी यांनी लिहिले की, “सिनौलीच्या सिक्रेट्समध्ये आम्ही चार हजार वर्षे जुने रहस्य उघड केले. आता आम्ही एक नवीन खुलासा घेऊन परतलो आहे. भारताची अनटोल्ड स्टोरी – कोहिनूरचे रहस्य.”
कोहिनूर हिऱ्याचा स्वतःचा एक प्रवास आहे. मुघल सम्राटांच्या सिंहासनापासून ब्रिटनच्या राणीच्या मुकुटापर्यंतचा प्रवास कोहिनूर हिऱ्याने केला आहे. पण ही कथा एवढीच नाही. कोहिनूर हिरा काकतीय राजवटीच्या काळात आंध्र प्रदेशातील कोलार खाणीत सापडला होता, अशी माहिती अनेक ठिकाणी मिळते. या घराण्याची राजवट १२व्या ते १४व्या शतकापर्यंत चालली. नंतर ते दिल्ली सल्तनतच्या सुलतान अलाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतले. हे मुघल शासकांचे पौराणिक सिंहासन तख्त-तौस येथे उभारण्यात आले होते. विविध राजे आणि राजघराण्यांतून प्रवास करत कोहिनूर अखेरीस ब्रिटनच्या राणीच्या मुकुटापर्यंत पोहोचला. कोहिनूर हिरा इंग्रजांनी लुटून नेला. ब्रिटनला जाण्यापूर्वी कोहिनूर पंजाब संस्थानाकडे होता. शीख आणि ब्रिटीश यांच्यातील लढाईत पंजाब आणि कोहिनूर हे दोन्ही भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आले.
कोहिनूरचे रहस्य 4 ऑगस्ट रोजी डिस्कव्हरी प्लसवर बघायला मिळेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक