ADVERTISEMENT
home / मनोरंजन
नीतू कपूर यांचे छोट्या पडद्यावर पदार्पण, पार पाडणार जजची भूमिका

नीतू कपूर यांचे छोट्या पडद्यावर पदार्पण, पार पाडणार जजची भूमिका

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूर आगामी डान्स रिऍलिटी शो ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ मधून जज म्हणून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या या कार्यक्रमात जजेसच्या पॅनेलमध्ये सामील होणार आहेत. या पॅनेलमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही आणि नृत्यदिग्दर्शक मार्झी पेस्टोनजी यांचा समावेश आहे. ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये 4 ते 14 या वयोगटातील स्पर्धक असतील आणि ते विजेतेपदासाठी एकमेकांशी स्पर्धा करतील.

सगळीकडे रिऍलिटी शोज लोकप्रिय  

सध्या छोट्या पडद्यावर सगळीकडेच रिऍलिटी शोचीच चलती आहे. मराठी असो की हिंदी, तेलगू असो कि इंग्लिश सध्या रिऍलिटी शो टीव्ही इंडस्ट्रीमध्ये थैमान घालत आहेत आणि त्यात जजची भूमिका पार पडणारे सेलिब्रिटी देखील चर्चेत असतात. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा आणि किरण खेर दीर्घकाळापासून डान्स रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून हजेरी लावत आहेत. त्याचबरोबर आता या यादीत नीतू कपूरचे यांचेही नाव जोडले जाणार आहे. चित्रपटांमध्ये अभिनयाची चमक दाखवल्यानंतर आता नीतू कपूर टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. नीतू कपूर या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. नीतू कपूर यांच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. डान्स दिवाने ज्युनियर्स या रिऍलिटी शोचा हा पहिलाच सीझन आहे, ज्यामध्ये लहान मुले दिसणार आहेत.

नीतू कपूर या शोसाठी उत्सुक 

नीतू कपूर

नीतू कपूर या शोला जज करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला असून त्यांना आधीपासूनच डान्सची खूप आवड असल्याचे त्यांनी सांगितले. नीतू कपूर म्हणतात की त्या स्वत: फार उत्तम प्रकारे डान्स करू शकत नाहीत पण त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. टीव्हीच्या माध्यमातून चाहत्यांच्या घराघरांत पोहोचण्यासाठी त्या खूप उत्सुक आहेत. नीतू कपूर यांचा हा पहिलाच रिऍलिटी शो आहे, ज्यात त्या जज म्हणून काम करणार आहेत पण मार्झी आणि नोरा फतेही यांनी याआधीही रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. मार्झी यांनी यापूर्वी  ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम’ यांसारख्या शोजमध्ये  जजची जबाबदारी पार पाडली आहे तर नोराने मलायका अरोराच्या जागी ‘डान्स दिवाने’मध्ये जज म्हणून काम केले आहे. आता हे तिन्ही स्टार्स ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या रिऍलिटी शोमध्ये एकत्र दिसणार आहेत, त्यामुळे चाहते हा कार्यक्रम कधी सुरु होणार यासाठी उत्सुक आहेत. 

मार्झी पेस्टोनजी यांनीही या कार्यक्रमाविषयो त्यांच्या भावना शेअर केल्या. ते म्हणाले की, “’डान्स दीवाने ज्युनियर्स’ हा नृत्याचा चिरंतन उत्सव असेल. हा शो जीवनाच्या सर्व स्तरातील मुलांना त्यांच्या क्षमतांचा फायदा घेण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरणा देईल. या प्रवासाचा एक भाग होताना मला खूप आनंद झाला आहे आणि मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे” 

ADVERTISEMENT
डान्स दिवाने जुनिअर्स

नीतू कपूर पुढच्या प्रोजेक्टसाठीही सज्ज

नीतू कपूर यांची चित्रपट कारकीर्द खूप मोठी आहे. त्यांनी अगदी लहानपणापासूनच बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करणे सुरु केले. त्यांचा बालकलाकार म्हणून ‘दो कलियां’  हा चित्रपट खूपच गाजला. यात त्यांनी डबल रोल केला आहे हे विशेष! त्यानंतर त्यांनी अमर अकबर ऍंथोनी, यादों की बारात, रफू चक्कर, याराना, दिवार आणि इतर अनेक यशस्वी चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या.मध्यंतरी त्यांनी काही वर्षे चित्रपटांतून संन्यास घेतला होता पण आता त्या त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज आहेत. या कार्यक्रमाव्यतिरिक्त त्या राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ लवकरच कलर्स मालिकेवर प्रसारित होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

15 Mar 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT