त्वचेची काळजी घेणे हे महिलांना खूपच जास्त प्रिय असते. अगदी कोणत्याही वयात त्वचा चांगली दिसावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे प्रत्येक महिला त्वचेसाठी एक रुटीन फॉलो करतात. सकाळी आंघोळीनंतर फेस सीरम आणि सनस्क्रिन, मेकअपपूर्वी मॉईश्चरायझर आणि घरी आल्यानंतर एक नाईट रुटीन फॉलो केले जाते. रात्री झोपताना खूप जण नाईट क्रिम (Night Creams In Marathi) लावतात. झोपताना काही खास कारणासाठी नाईट क्रिम लावले जाते. नाईट क्रिम का लावायचे नाईट क्रिमचे फायदे (Night Cream Benefits In Marathi) जाणून घेत स्किनकेअर रुटीनमध्ये त्याचा समावेश करायाल हवा. जाणून घेऊया नाईट क्रिमबद्दल अत्यंत महत्वाची माहिती.
जाणून घ्या नाईट क्रिमचे फायदे (Night Cream Benefits In Marathi)
तुमचं नाईट रुटीन कसं आहे त्यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. जर तुम्ही नाईट क्रिम लावत नसाल तर तुम्हाला नाईट क्रिमचे फायदे (Night Cream Benefits In Marathi) जाणून घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया नाईट क्रिमचे फायदे.
मॉईश्चराईज ठेवायला करते मदत (Help To Keep Moisture)
दिवसभर त्वचेने बरेच काही सोसलेले असत. सध्या वातावरणातील प्रदूषण पाहता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याचे विपरित परिणाम होतात. चेहऱ्यावरील मॉईश्चराईज कमी होऊ लागते. त्वचेला तजेला कमी झाला की, त्वचा रुक्ष दिसते. ज्यावेळी आपण सगळा दिवस संपवून घरी येतो. त्यावेळी त्वचेला रात्रभर मॉईश्चरायझर करण्याचे काम नाईट क्रिम करते. नाईट क्रिमच्या रोजच्या वापरामुळे त्वचा ही अधिक चांगली आणि फ्रेश दिसू लागते. तुमची त्वचा डल झाली असेल किंवा सकाळी उठल्यानंतरही त्वचेवर तजेला दिसत नसेल तर तुम्ही नाईट क्रिमचा वापर केला तर तुम्हाला त्वचा मॉईश्चरायईज ठेवण्यास मदत होऊ शकेल.
कोलॅजन वाढवण्यास करते मदत (Boost Collagen Production)
त्वचेच्या खाली असणारे कोलॅजन हे त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी मदत करु शकते. जसे वय वाढते तसे कोलॅजन कमी होऊ लागते.त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्धवू लागतात. खूप जणांना पौंगडावस्था गेल्यानंतर पुन्हा एकदा पिंपल्स येऊ लागतात. त्वचा डल दिसू लागते. तुमच्या त्वचेखाली असलेले कोलॅजन वाढवण्याचे काम नाईट क्रिम करते. नाईट क्रिममध्ये असे काही घटक असतात. जे त्वचेच्या आत जाऊन त्वचेखाली असलेले कोलॅजन वाढवतात. त्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसते.
त्वचेचे पोषण (Nourishes Skin)
काही कारणास्तव तुम्हाला दिवसभर त्वचेची काळजी घेता येत नसेल तर किमान तुमचे नाईट रुटीन हे चांगले असायला हवे. तुमचे नाईट रुटीन चांगले असेल तर तुमच्या त्वचेला पोषण मिळते. नाईट क्रिममध्ये नरिश करणारे अनेक घटक असतात. ते त्वचेच्या आत गेल्यानंतर त्वचेवरील थकवा, कोरडेपणा सगळे काही काढून टाकण्यास मदत करते. त्वचेचे पोषण योग्य पद्धतीने झाले तर त्वचा ही सुंदर, आकर्षक आणि तितकीच चांगली दिसते. त्यामुळे त्वचेचे पोषण करण्यासाठी नाईट क्रिम लावावे. रात्री लावलेली क्रिम चेहऱ्यावर किमान 7 तास तरी राहते त्यामुळे त्याचे फायदे मिळतात.
त्वचा ठेवते टाईट (Prevent Skin Sagging)
महिलांना त्वचेसंदर्भात आणखी एक भीती असते ती म्हणजे वयोमानानुसार त्वचा सैल पडण्याची. सैल झालेली त्वचा ही वार्धक्य दर्शवते. हे वार्धक्य कोणालाही तिशीच्या आत यावे असे मुळीच वाटत नाही. नाईट क्रिम लावल्यामुळे त्वचा टाईट ठेवण्यास मदत करते. त्वचेखाली असलेले कोलॅजन वाढल्यामुळे त्वचा अधिक टाईट राहते. तुम्हाला त्वचा अधिक काळासाठी चिरतरुण ठेवायची असेल तर तुम्ही नाईट क्रिमचा वापर करायला हवा.
कोमल आणि सुंदर त्वचा (Soft And Supple Skin)
तुमची त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसत असेल तर तुम्ही नाईट क्रिम लावायला हवी. नाईट क्रिम लावल्यामुळे त्वचा नरिश होते. अर्थातच त्यामुळे त्वचा कोमल आणि सुंदर दिसते. त्वचा तेव्हाच चांगली दिसते ज्यावेळी तिचे योग्य प्रमाणात पोषण होते. नाईट क्रिममध्ये असलेले हे घटक तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे जर त्वचा सुंदर आणि कोमल हवी असेल त्यावर एक तजेला हा असेल तर तुम्ही नाईट क्रिम लावायला हवे.
नाईट क्रिमची निवड कशी करायला हवी (How To Choose A Night Cream)
नाईट क्रिमची निवड करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही नव्याने नाईट क्रिम घेत असाल तर तुम्ही नाईट क्रिम कशी निवडायला हवी ते जाणून घेऊया.
- नाईट क्रिम ही लाईट आणि चेहऱ्याच्या आत जाईल असे हवे. त्यामुळे ते पातळ असायला हवे.
- नाईट क्रिममध्ये त्वचा दुरुस्त असणारे घटक असावेत. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल्स असतील तर त्यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड त्वचा कोरडी असेल हायअलुरोनिक hyaluronic अॅसिड असावे. ज्यामुळे त्वचेला तजेला मिळते.
- तुमची त्वचा कोरडी असेल तर त्वचेवर तैलीय घटक असलेले नाईट क्रिम चालू शकेल.
- तेलकट त्वचा असणाऱ्यांनी खूप हेवी असं नाईट क्रिम मुळीच निवडू नये कारण ते त्वचेवर अजिबात चांगले राहात नाही. त्यामुळे त्वचा अधिक तेलकट आणि काळवंडलेली दिसते.
- कोणतेही नाईट क्रिम घेताना त्यामधील घटक तपासून त्याचा वापर शरीरावर पहिल्यांदा करुन मगच चेहऱ्यावर करावा.
अशी बनवा होममेड नाईट क्रिम मराठी (Homemade Night Creams In Marathi)
हल्ली DIY चा काळ आहे म्हणजेच आपल्यासाठी लागणाऱ्या वस्तू घरीच बनवण्याचा. हल्ली अनेक ब्युटी क्रिम या घरीच बनवता येतात. नैसर्गिक घटकांचा वापर करुन या क्रिम तयार केल्या जातात. असाच काही नाईट क्रिम घरी कशा बनवायच्या ते जाणून घेऊया ज्याने मिळेल चमकदार त्वचा
ॲलो व्हिटॅमिन E नाईट क्रिम
साहित्य : ॲलोवेरा जेल, व्हिटॅमिन E कॅप्सुल
कृती : तुम्ही किती प्रमाणानुसार नाईट क्रिम तयार करणार आहात तर तुम्ही त्या प्रमाणात अॅलोवेरा जेल घ्या. ॲलोवेरा जेलच्या अर्ध्या प्रमाणात व्हिटॅमिन E घाला. त्यानंतर चमच्याच्या मदतीने तुम्ही ॲलोवेरा जेल फेटून घ्या. हे जेल क्रिममध्ये बदलत नाही तो पर्यंत ही जेल मिक्स करत राहायची आहे. हे नाईट क्रिम टिकते. एका बरणीत भरुन तुम्ही रोज रात्री वापरु शकता.
खास थंडीसाठी नाईट क्रिम
साहित्य : ॲलोवेरा जेल, रोझ वॉटर,ग्लिसरीन, नारळाचे तेल, बदामाचे तेल
कृती : एका भांड्यात एक मोठा चमचा ॲलोवेरा जेल, बदामाचे तेल घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा नारळाचे तेल आणि ग्लिसरीन घाला. एक चमचा रोझ वॉटर घालून चांगले एकजीव करा. क्रिम तयार झाल्यावर ते स्टोअर करुन ठेवा.
ॲक्ने मार्क्स रिमुव्हल क्रिम
साहित्य : लिंबाचा रस, रोझ वॉटर, ग्लिसरीन, ॲलोवेरा, व्हिटॅमिन E
कृती: लिंबाचा रस, रोझ वॉटर, ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल असे सगळे साहित्य एकत्र करुन चांगले फेटा. तयार क्रिम दररोज रात्री लावा. तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यात मदत होईल.
नाईट क्रिम कशी लावायला हवी (How to Use/Apply Night Cream In Marathi)
नाईट क्रिम बनवल्यानंतर ती लावण्याचा विचार करत असाल तर काही स्टेप्स नक्की फॉलो करायला हव्यात .
- सगळ्यात आधी मेकअप वाईप्सने तुमचा चेहरा चांगला स्वच्छ करुन घ्या. चेहऱ्यावरील मेकअप काढून डाका. डोळ्यांकडील भागाकडे अधिक लक्ष द्या.
- चेहरा स्वच्छ कोरडा झाल्यानंतर तुमच्या आवडीचे नाईट क्रिम अगदी थोडेसे लावा.
- नाईट क्रिम लावल्यानंतर चेहऱ्यावर अगदी हलक्या हाताने मसाज करा. डोळ्यांखाली, गालावर गोलाकार बोट फिरवून मसाज करा. त्यामुळे तु्म्हाला आराम मिळेल. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.
- रात्री बेडवर पडल्यानंतर नाईट क्रिम लावा.
- नाईट क्रिम लावल्यानंतर लगेचच तुम्ही झोपू नका. ती क्रिम थोडी त्वचेत जाऊ द्या. म्हणजे त्याचा फायदा मिळेल.
आता नक्की सुंदर त्वचेसाठी रोजच्या रोज नाईट क्रिमचा वापर करा