प्रत्येकाचा भविष्यावर अथवा राशीशास्त्रावर विश्वास असतोच असं नाही. पण इतर अभ्यासाप्रमाणेच ग्रह आणि ताऱ्यांचादेखील एक विशिष्ट अभ्यास असतो. आपल्याकडे आपल्या जन्मराशीच्या आधारावर अनेक लहानसहान गोष्टींबाबत या अभ्यासाद्वारे भविष्याबाबत जाणून घेता येतो. त्याचप्रमाणे अंकशास्त्राचाही अभ्यास असतो. अंक ज्योतिषामध्ये एकूण 9 मुलांक असतात. कोणत्याही व्यक्तीबाबत त्याच्या जन्मतिथीनुसार स्वभाव, त्याचे शिक्षण, विवाहयोग याबाबत सांगण्यात येते. काही व्यक्तींचा जन्म अशा विशिष्ट तारखेला होतो ज्यांच्यावर सूर्याची खास कृपा होते आणि त्या व्यक्तींना मेहनतीसह नशीबही साथ देते. अशा कोणत्या तारखेच्या व्यक्ती नशीबवान आहेत ते आपण आज पाहूया. ज्या व्यक्तींचा जन्म 01, 10, 19, 28 अशा तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक आहे 1. याच व्यक्तींच्या बाबतीत आपण जाणून घेऊया.
सूर्याचा राहातो प्रभाव
अंकशास्त्रानुसार प्रत्येक मुलांकाचा आपला असा एक स्वामी ग्रह असतो. त्याचप्रमाणे ज्यांचा मुलांक 1 आहे त्यांचा संबंध असतो तो सूर्याशी. सूर्यदेव या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह मानला जातो. या व्यक्तींवर सूर्याची खास कृपा असते. ज्याप्रमाणे सूर्याचे तेज असते त्याप्रमाणेच 1 मुलांक असणाऱ्या व्यक्तीदेखील अत्यंत प्रभावशाली आणि तेजस्वी असतात. अत्यंत साहसी आणि नीडर स्वभावाच्या या व्यक्ती असून या व्यक्ती कधीच कोणाचे वाईट व्हावे असे इच्छित नाही.
मात्र आपल्याबरोबर कोणीही वाईट करत असेल तर या व्यक्तींच्या रागापासून वाचणे कठीण आहे. या व्यक्ती अतिशय रागीट असतात. सूर्याप्रमाणेच तापट असतात. बाहेरून अत्यंत कठोर दिसल्या तरीही मनातून मात्र या व्यक्ती अत्यंत प्रेमळ असतात.
अधिक वाचा – राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
नशीब देते साथ
01, 10, 19, 28 या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींना खूपच भाग्यवान समजण्यात येते. सूर्य देवाच्या आशीर्वादाने या व्यक्तींना मान सन्मानाची प्राप्ती होते आणि आयुष्यात येणारी दुःख लवकरात लवकर कमी होऊन ती संकटे पार होतात. शिक्षणामध्येही या व्यक्तींना चांगलीच प्रगती करता येते. तसंच या व्यक्तींमध्ये लीडरशिप गुण असल्यामुळे या व्यक्ती अनेक लोकांमध्ये प्रसिद्ध असतात. राजकारणात या व्यक्ती खूपच नाव कमावतात. जर अशा व्यक्ती नोकरी करत असतील तर उच्च पदावर या व्यक्ती कार्यरत असतात. तसंच स्वतःचा व्यवसाय करत असतील तरीही या व्यक्तींना मेहनतीसह नशीबाची साथ मिळते आणि व्यवसायातदेखील या व्यक्तींची चांगली प्रगती होते.
पैशांची कमतरता भासत नाही
पैशांच्या बाबतीतही या व्यक्तींना नशीबवान म्हटले जाते. या व्यक्तींना पैशांची चणचण जाणवत नाही. त्यांच्या संकटाच्या वेळी कुठूनही नशिबाने पैशांची उणीव भासत नाही. या व्यक्तींमध्ये निर्णय घेण्याची उत्तम क्षमता असते. त्यामुळे विचारपूर्वक या व्यक्ती पैसे कमावतात. तसंच पैशांची उगीच उधळण करणे या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. याशिवाय कोणत्याही गोष्टींचा दिखावा करणाऱ्या या व्यक्ती नाहीत. कोणालाही कधीही गरज भासेल तेव्हा मात्र या व्यक्ती मनापासून मदतीसाठी धाऊन जातात. असे असले तरीही आयुष्यात सुख सुविधांचा भरपूर आनंद या व्यक्ती लुटतात. कंजूषपणाने जगत नाहीत.
अधिक वाचा – या संख्यांना का मानले जाते अशुभ, जाणून घ्या कारण
वैवाहिक जीवन राहते आनंदी
अरेंज मॅरेज असो अथवा लव्ह मॅरेज या मुलांकाच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन हे अत्यंत आनंदी असते. सूर्याच्या कृपेमुळे अथवा सूर्य स्वामी ग्रह असल्यामुळे या व्यक्तींचे वैवाहिक जीवन अधिक सुखी आणि समाधानी असते. आपल्या जोडीदाराशी या व्यक्ती अधिक गुंतलेल्या असतात. तसंच या व्यक्तींची रोमँटिक लाईफही चांगली असते. आपल्या जोडीदारावर अगदी मनापासून या व्यक्ती प्रेम करतात आणि आपल्या जोडीदाराला अजिबातच फसवत नाहीत. नात्यात अत्यंत गुंतलेल्या या व्यक्ती असतात.
अधिक वाचा – Numerology: तुमच्या Mobile No. वरून कळू शकतात या गोष्टी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक