ADVERTISEMENT
home / रेसिपी
quick-10-min-veg-kathi-roll-recipe-in-marathi

10 मिनिट्समध्ये बनवा झटपट काठी रोल, घरच्या घरी चविष्ट काठी रोल

भूक लागल्यावर बरेचदा आपल्याला पोळी किंवा भात खायचा कंटाळा आलेला असतो अथवा बाहेर गेल्यानंतर पटकन मिळणारे आणि पोटभरीचे असे तर काही खायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा डोक्यात येते ते म्हणजे वडापाव (Vada Pav) अथवा रोल. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स खायला मिळतात. यामध्ये सर्वाधिक खपतो तो काठी रोल (Kathi Roll). हा खाल्ल्याने पोटातील भूकही शमते आणि खिशातील पैसेदेखील कमी जातात. त्याशिवाय याची चव अप्रतिम लागते. पण घरच्या घरीदेखील तुम्ही 10 मिनिट्समध्ये काठी रोल बनवू शकता. आश्चर्य वाटलं ना? पण हो हे खरं आहे. तुम्ही चविष्ट काठी रोल्स घरी करून अगदी लहान मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आवडीच्या भाज्यांचा तुम्ही यामध्ये उपयोग करून घेऊ शकता. पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा काठी रोल कसा बनवायचा आणि काठी रोलची रेसिपी (Kathi Roll Recipe) खास तुमच्यासाठी.  

काठी रोल बनविण्यासाठी साहित्य 

पाव कप गव्हाचे पीठ 
1 उकडलेला बटाटा 
1 कप मिक्स भाजी (सिमला मिरची, वाटाणे, गाजर, टॉमेटो)
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा मोहरी 
1 बारीक चिरलेला कांदा 
पाऊण चमचा आले – लसूण पेस्ट 
अर्धा चमचा धने पावडर
पाव चमचा काळी मिरी पावडर
अर्धा चमचा गरम मसाला
पाव चमचा हळद पावडर
तुमच्या चवीनुसार मीठ 
तेल

काठी रोल बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिल्यांदा तुम्ही भाजी बारीक चिरून घ्या 
  • त्यानंतर एका परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्या, त्यात एक चमचा तेल घाल, मीठ आणि पाणी घालून व्यवस्थित पीठ भिजवून घ्या आणि मग साधारण अर्धा तास तसंच ठेवा 
  • अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा पीठ मळून घ्या आणि याचे गोळे बनवून त्याच्या जाडसर पोळ्या लाटून घ्या 
  • दुसऱ्या बाजूला तुम्ही एक पॅन घ्या आणि त्यामध्ये तूप वा तेल घाला आणि त्यात जिरे, मोहरी तडतडू द्या
  • त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घालून परतून घ्या आणि मग त्यात आलं – लसूण पेस्ट घालून पुन्हा हलकेच ढळवा आणि परतून घ्या 
  • त्यानंतर वरून सर्व भाजी घाला आणि साधारण 1-2 मिनिट्स वाफ येऊ द्या. असं केल्यानंतर परतून पुन्हा त्यात उकडलेला बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्या 
  • वरून काळी मिरी पावडर, हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला घालून मिक्स करा 
  • आता एक पोळी घ्या आणि त्यावर चटणी वा सॉस लावा आणि वरचे तयार झालेले फिलिंग या पोळीवर पसरवा
  • आता या पोळीवर किसलेला कोबी घाला, चीज घाला तुमच्या आवडीनुसार आणि मग रोल करा
  • काठी रोल तयार आहे. सॉस आणि चटणीसह खायला द्या

काठी रोल घरच्या घरी बनवणे हे अत्यंत सोपे आहे. तुम्हीही अगदी घाईच्या वेळेत काहीही सुचत नसेल तर घरातील भाजी घेऊन पटकन हा स्वादिष्ट पदार्थ तयार करून घेऊ शकता. तसंच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काठी रोलसाठी लागणारी पोळी भाजताना बटर वापरल्यास, याचा अधिक चांगला स्वाद येतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचा वापर करून घ्यावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT