ADVERTISEMENT
home / Combination Skin
या सोप्या स्किन केअर रूटीनमुळे होईल त्वचा अधिक चमकदार

या सोप्या स्किन केअर रूटीनमुळे होईल त्वचा अधिक चमकदार

स्किन केअर (Skin Care) अर्थात त्वचेची काळजी ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक मुलीला काय तर अगदी प्रत्येकाला घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वयात आपल्याला आपल्या त्वचेची काळजी ही घ्यायलाच हवी. निरोगी आणि चमकदार त्वचा असल्याने तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच पण तुम्ही अधिक तजेलदार आणि छान दिसल्याने तुमच्या कामातही फरक पडतो. तसंच स्किन केअर उत्पादनांचा वापर केल्याने आणि त्वचेला व्यवस्थित मसाज दिल्याने त्वचा अधिक चांगली राहाते आणि तुम्हालाही अत्यंत रिलॅक्स वाटते. पण तुमचे आयुष्य धावपळीचे असेल तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनसाठी नियमित काही स्टेप्स फॉलो (Steps to follow for skin care routine) करायला हव्यात. चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी तुम्ही कोणते स्किन केअर रूटिन करायला हवे ते या लेखातून आपण पाहूया. 

क्लिंन्झर

क्लिंन्झर

Shutterstock

क्लिंन्झर (Cleanser) हे प्रत्येक स्किन केअर रूटिनचा बेस अर्थातच मूळ आहे. कारण चेहऱ्यावर जमणारी घाण आणि मेकअपचा एक एक कण काढून टाकण्यासाठी क्लिन्झिंग अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही अशा क्लिंन्झरचा वापर करायला हवा जो तुमच्या स्किन टाईपनुसार असेल. त्वचा कोरडी असल्यास अथवा त्वचा तेलकट असल्यास कसे वापरावे माहीत असायला हवे.  दिवसातून दोन वेळा याचा वापर करावा. आपण आपल्या त्वचेसाठी नक्की कोणता क्लिंन्झर वापरावा असा जर प्रश्न असेल तर क्लिंन्झर लावल्यानंतर तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होऊन तजेलदार दिसायला हवी असा क्लिंन्झर तुम्ही वापरावा. 

ADVERTISEMENT

टोनर

टोनर

Freepik

चुकीचा क्लिंन्झर वापरल्यास तुमच्या त्वचेचे पीएच संतुलन बिघडू शकते आणि त्वचेला नुकसान पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे क्लिंन्झिंग केल्यानंतर तुम्ही अल्कोहोल फ्री टोनरचा वापर करावा. तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये तुम्ही टोनरचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. तुमच्या त्वचेची पीएच लेव्हल संतुलित करण्यासाठी याचा उपयोग होतोच त्याशिवाय टोनर पोर्स टाईट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. टोनर तुमच्या त्वचेवरील वापरण्यात आलेले उत्पादन काढून टाकण्यास उत्तम आहे आणि फायदेशीर ठरते. त्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करायलाच हवा. 

सीरम

तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर सीरमपेक्षा अधिक चांगले काही असूच शकत नाही. विशिष्ट घटकांनी बनविण्यात आलेल्या सीरममध्ये स्किन केअरचे उत्तम उत्पादन असते आणि त्वचेवरील निस्तेजपणा, पुरळ, कोरडेपणा आणि पिगमेंटेशन अशा समस्या घालविण्यासाठी सीरमचा उपयोग होतो. सीरम एक अत्यंत हलके टेक्स्चर असून त्वचेमध्ये अगदी आतपर्यंत पोषण देते आणि यातील घटक तुम्हाला चेहऱ्यावरील त्वचेवर हवा तो योग्य परिणाम मिळवून देते. त्यामुळे तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये तुम्ही याचा वापर करायला हवा. 

ADVERTISEMENT

मॉईस्चराईजर

मॉईस्चराईजर

Shutterstock

आपल्या त्वचेच्या टाईपनुसार मॉईस्चराईजर तुम्ही नियमित लावयला हवे. त्वचेला डिहायड्रेट करण्यासह मॉईस्चराईज त्वचेचे बॅरिअर दुरुस्त करण्यास मदत करते. तसंच टेक्स्चर स्मूद करण्यासाठी आणि इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही एक लाईटवेट जेल बेस्ड मॉईस्चराईजरचा वापर तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये करून घ्या. तर ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी जाडसर आणि पोषण देणारे मॉईस्चराईज वापरा. 

सनस्क्रिन

सनस्क्रिन

ADVERTISEMENT

Shutterstock

तुम्ही सनस्क्रिन लावत नसाल तर तुमचे स्किन केअर रूटिन तुमच्या मनाला हवा तसा परिणाम देणार नाही. सनस्क्रिन केवळ तुमची त्वचा टॅन होण्यापासून वाचवत नाही तर तुमच्या त्वचेवरील पिगमेंटेशन, काळे डाग आणि वयाच्या आधीच येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासही मदत करते. ज्या सनस्क्रिनमध्ये एसपीएफ 30 अथवा त्यापेक्षा जास्त असेल अशा सनस्क्रिनचा तुम्ही वापर करा. दिवसातून दोन वेळा याचा त्वचेवर उपयोग करून घ्या. 

लिप बाम

आपल्या ओठांची त्वचा इतर त्वचेच्या तुलनेत नाजूक असते. तसंच अत्यंत सहजपणाने ओठांच्या त्वचेला नुकसान पोहचू शकते. आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा ओठांची त्वचा एक्सफोलिएट करणे गरजेचे आहे. ज्यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि तुमच्या ओठांची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राहील. याशिवाय ओठ फुटणार नाहीत आणि कोरडे राहणार नाहीत यासाठी तुम्ही लिप बामचा वापर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक 

ADVERTISEMENT

 

22 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT