ADVERTISEMENT
home / मनोरंजन
#Ralia लग्न मीम्स

रणबीर- आलियाच्या लग्नावरुन मीम्सचा सुळसुळाट

 सध्या सगळीकडे सुरु आहे ती #Ralia च्या लग्नाची चर्चा. त्यांच्या मागे सगळेच हात धुवून लागले आहेत. त्यांच्या लग्नाच्या तारखांविषयी या आधीही सोशल मीडियावर चर्चा रंगली होती पण आता त्यांच्या लग्नाच्या या चर्चेने सोशल मीडियावर मीम्सची बरसात सुरु झाली आहे. एखाद्या बातमीला मोठे रुप देण्याचे काम खरंतरं मीम करत असते.विचार करुन हे मीम्स तयार होत असतात. आता या दोघांच्या लग्नाच्या घोषणेनंतर अनेकांनी एकापेक्षा एक सरस आणि तुम्हाला लोटपोट हसवतील असे मस्त मीम्स तयार केले आहेत. तुम्ही अजून हे मीम्स पाहिले किंवा वाचले नसतील तर चला आता नेमकं सोशल मीडियावर या लग्नासंदर्भात काय ट्रेंडिग सुरु आहे हे पाहुया.

मीम्सचा पाऊस

आज आलिया- रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत. बुधवारी त्यांच्या लग्नविधीला सुरुवात झाली होती. पूजा, मेंदी असा कार्यक्रम रंगला हे साधारणपणे सेलिब्रिटींच्या फोटोज आणि उपस्थितीवरुन लक्षात आले. म्हणजे लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले हे नक्की! या सगळ्या विधी सुरु झाल्यानंतर अनेक मीम्स वायरल होऊ लागगे. काही मीम्स हे आलियासाठी तर काही रणबीरच्या भूतकाळाला घेऊन आहेत. आता सोशल मीडिया म्हटले की, फॅन आणि हेटर्स आलेच. पण त्यामुळेही या लग्नाला चांगलीच पब्लिसिटी मिळाली आहे. या जोडप्याचा एकतरी फोटो मिळावा यासाठी सगळ्यांनी धडपड सुरु आहे. दरम्यान यांच्या संदर्भात जे मीम वायरल झालेत ते पाहुया. 

या सारखे अनेक ट्विट आणि पोस्टर्स सध्या वायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता या लग्नाची उत्सुकता अधिक वाढली आहे.

आज होणार लग्न

रणबीर- आलिया अर्थात #Ralia लग्न करणार हे माहीत असले तरी त्यांच्या लग्नाची तारीख काय असेल यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. हे लग्न येत्या शनिवार-रविवार होईल किंवा पुढे जाईल अशी चर्चा होत होती. पण आज सकाळी कपूर कुटुंबियांना तयार झालेले पाहिल्यानंतर लगीनघाई सुरु झाली हे कळले. आज मेंदी सेरेमनीसाठी सगळे कुटुंबिय उपस्थित होते. अगदी मोजक्याच पण खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता सगळ्यांना लग्नाच्या फोटोची आणि त्या खास क्षणांची प्रतिक्षा आहे. नीतू सिंग मीडियासमोर आल्यानंतर त्यांनी स्वत:हून लग्नाची आणि ठिकाणाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचेच आज लक्ष या दोघांच्या लग्नाकडे असणार आहे. 

ADVERTISEMENT

आलियाचा लुक पाहण्यासाठी आतूर

आलियाला वेगवेगळ्या रुपात आपण अनेकदा पाहिले आहे. ती सगळ्याच फॅशन उत्तम कॅरी करते.  तिच्या लग्नासाठी तिचा खास लुक कसा असणार आहे. ती कोणत्या डिझायनरचे कपडे घालेल याची सगळे वाट पाहात आहेत. तिच्या घराबाहेर पापाराझींचा गराडा पाहायला मिळत आहे. तिचा पहिला फोटो कधी सगळ्यांसमोर येईल हे पाहण्यासाठी सगळे आतूर आहेत. आता प्रतिक्षा करावी लागेल ती काही तासांची 

दरम्यान, तुम्हाला रणबीर- आलियाच्या लग्नाचे कोणते मीम्स आवडले ते आम्हाला सांगायला विसरु नका.

14 Apr 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT