ADVERTISEMENT
home / पालकत्व
सिंगल मदरने आर्थिक नियोजन कसे करावे, सोपे व्यवस्थापन

सिंगल मदरने आर्थिक नियोजन कसे करावे, सोपे व्यवस्थापन

आपण ऐकले आहे की एकट्या आईने जबाबदारी सांभाळणे हे खूपच कठीण आहे. त्यामुळे सिंगल मदर अर्थात एकट्या स्त्री ने आपल्या मुलांसाठी आर्थिक नियोजन सांभाळणे खूप कष्टाचे आणि जबाबदारीचे काम आहे.  सिंगल मदर म्हणजे दुप्पट काम, दुप्पट जबाबदारी आणि तेवढेच दुप्पट ताणतणाव. आर्थिक व्यवस्थापन स्वतः एकट्याने करणे एक खूप मोठे कठीण टास्क आहे आणि एकट्या आईसाठी हे अधिक कठीण होऊन जाते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सिंगल मदरने कशाप्रकारे आपले आर्थिक व्यवस्थापन करावे या संदर्भात टिप्स देत आहोत. यासाठी ‘POPxo मराठी’ने सीए अंजली नायर, सहायक प्राध्यापक, व्यवस्थापन, अर्थशास्त्र आणि वाणिज्य विद्याशाखा आयटीएम व्यावसायिक विद्यापीठ यांच्याशी चर्चा केली. तुम्हीदेखील तुमच्या मुलासाठी आर्थिक नियोजन अशा प्रकारे नक्कीच करू शकता.   

सिंगल मदरची असणारी उद्दिष्टे

Shutterstock

अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांची जर माहिती करून घेतली तर स्पष्टता मिळू शकते. या उद्दिष्टांच्या आधारे गुंतवणुकीचे विभाजन करून सिंगल मदर अर्थात एकट्या आईला हवी असणारी योग्य ती दिशा मिळू शकेल. उदाहरणार्थ आपल्या मुलाच्या खर्चासाठी स्वतंत्र निधी तयार करणे. गुंतवणूक ही अशा प्रकारे केली पाहिजे की यामुळे उत्पन्नाचा प्रवाह हा स्थिर राहिला पाहिजे. उदा. स्थिर असणारी रिटर्न एसआयपीमध्ये गुंतवणूक इत्यादी. गुंतवणूक करताना आपली आवक किती आहे हे पाहायला हवे आणि त्यातली थोडी का असेना पण SIP गुंतवणूक ही करायलाच हवी. कारण त्याने तुमच्या उत्पन्नामध्ये नक्कीच फरक पडतो. कोणत्याही वेळी तुम्हाला ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.  

ADVERTISEMENT

ट्रॅकर्स ठेवणे

Shutterstock

खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च व इन्कम ट्रॅकर्स संबंधित अॅप्सचा उपयोग करणे. जपून खर्च करणे ही आर्थिक व्यवस्थापनासाठी महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. आपण किती खर्च करतो हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पण त्यासाठी बऱ्याचदा आपल्याला आपण किती खर्च करतोय हे कळत नाही. आता अनेक अॅप्स आपल्या मदतीसाठी आहेत. जर तुम्हाला लिहायची सवय असेल तर सहसा एखाद्या डायरीमध्ये जमतील तितके महत्त्वाचे खर्च तुम्ही लिहून ठेवा. जेणेकरून आपण किती कमावत आहोत आणि किती खर्च करतोय याचा एक अंदाज तुम्हाला येईल. 

तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

ADVERTISEMENT

आकस्मित निधी – अचानक आलेला खर्च

Shutterstock

एक आकस्मित निधी तयार करणे ही पहिली पायरी असावी. ज्या सिंगल मदर आहेत त्यांनी अनपेक्षित आणि आकस्मिक होणाऱ्या दुर्घटनेसाठी काही खर्च आधीच काढून ठेवणे पण गरजेचे  आहे. जेणेकरून त्यांना त्या वेळी अशा निधीतून पैसे खर्च करता येतील. त्यामुळे दैनंदिन आर्थिक योजनेवर परिणाम होणार नाही. कोणतीही घटना कधीही घडू शकते. त्यामुळे दर महिना आपल्या पगारातील काही पैसे काढून ठेवावे. ज्याने तुम्हाला अशावेळी पैशांचा उपयोग करता येईल.  

शॉपिंगवर खूप खर्च करत असाल तर या पद्धतीने वाचवा पैसे
   

ADVERTISEMENT

शासकीय सहाय्य

अशा महिलांसाठी सरकारकडून महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना आहेत. महिलांच्या बचत बँक खात्यावर रोख रक्कम, विशेष वैद्यकीय विमा योजना, अनुदानित गृह कर्ज इत्यादी योजनांची माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला यापासून मदत मिळवता येते. पण त्याची माहिती बऱ्याच सिंगल मदर्सना नसते. त्यामुळे प्रत्येक सिंगल मदरने याची माहिती करून घेऊन त्याचा लाभ घेण्याचा नक्की प्रयत्न करावा. 

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

विम्याचा आधार

चांगल्या विमा योजनांमध्ये गुंतवणुकीमुळे आयुष्यभर नक्कीच आधार मिळतो. आजच्या काळातील आजारांच्या काळात योग्य विम्यामध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. विम्याचा आधार नक्कीच तुम्हाला मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही अगदी थोडी थोडी गुंतवणूक केली तरीही चालेल. .  

आई-वडील अशी दोघांची ही भूमिका निभावणे अजिबात सोपे नाही. तर, या ड्युअल रोल प्लेयर्ससाठी थोडासा आर्थिक सल्ला थोडा दिलासा देणारा नक्कीच ठरू शकतो!

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

05 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT