ADVERTISEMENT
home / Eye Make Up
Siren Eye Look

Siren Eye Look चा ट्रेंड फॉलो करण्यासाठी टिप्स

मेकअपचा ट्रेंड नेहमी बदलत असतो. त्यामुळे मुली अथवा महिलांना नेहमी ट्रेंडमध्ये असलेला मेकअप करायचा असतो. सोशल मीडियावर नवनवीन मेकअप ट्रेंडची माहिती सतत मिळत असते. सहाजिकच असे काही मेकअप ट्रेंड नेही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच व्हायरल होत असलेला एक मेकअप ट्रेंड आहे सायरन आय मेकअप (Siren Eye Look)  ज्यामध्ये तुमच्या डोळ्यांना फॉक्स आइजचा लुक दिला जातो. ग्लॅमलुकसाठी तो अगदी परफेक्ट आहे. म्हणूनच एखाद्या खास पार्टी अथवा इव्हनिंग प्रोग्रॅमसाठी ट्राय करा हा स्पेशल लुक तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी जाणून घ्या सायरन आय मेकअप (Siren Eye Look) कसा करावा… तसंच वाचा डोळ्यांचा मेकअप टिप्स मराठी | Eye Makeup Tips In Marathi आणि वापरा सुंदर डोळ्यांसाठी भारतातील उत्तम आयशॅडो पॅलेट्स | Best Eyeshadow Palette In Marathi, उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner),

सायरन आय लुक (Siren Eye Look)

ग्लॅमसर आणि स्टनिंग लुकसाठी तुम्ही तुमच्या डोळ्यांना हा लुक देऊ शकता. यामध्ये विंग आयलायनरला एक बोल्ड आणि ड्रामेटिक ट्विस्ट दिला जातो. #Sireneyes हा हॅशटॅग वापरून तुम्ही हा लुक सोशल मीडियावर शेअर करू शकता. या बोल्ड लुकमध्ये तुमचे डोळे खूपच आकर्षक दिसतात. सेलिब्रेटीजपासून ब्युटी इनफ्लुएंसरपर्यंत अनेकांनी हा लुक आजवर केलेला आहे.

कसा कराल सायरन आय लुक (Siren Eye Look)

सायरन आय लुक कसा दिसेल हे तुमच्या डोळ्यांच्या शेपवर अवलंबून आहे.ज्यांचे डोळे बदामी शेपचे असतात त्यांच्यावर हा लुक जास्त खुलून दिसतो. पण इतर शेप असलेल्या डोळ्यांवरही हा लुक करण्यास काहीच हरकत नाही.

  • सर्वात आधी एखाद्या पिगमेंटेड काळ्या रंगाच्या आय पेन्सिलने तुमच्या डोळ्यांच्या कोपऱ्यांवर क्रीज लाइन आखा. त्यानंतर विंग्ज शेप देत तुमच्या पापण्यांना ते कनेक्ट करा
  • पापण्यांरून एक ओळ आखत तुमच्या विंग्ज शेपला कनेक्ट करा. बोल्ड इफेक्टसाठी वॉटरलाइनवर काळं आय लायनर लावा.
  • डोळयाच्या आउटर कॉर्नर्संना काजळ पेन्सिलने विंग्जसोबत कनेक्ट करा आणि आय ब्रशने ते ब्लेंड करा.
  • डोळ्यांच्या इनर कॉर्नर्संना ग्लिटरने हायलाइट करा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT