ADVERTISEMENT
home / Weight Loss
spring onion is beneficial in weight loss

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कांद्याची पात

हिरवीगार आणि लुसलुसीत कांद्याची पात स्वयंपाकात अनेक प्रकारे वापरता येते. कांद्याच्या पातीची भाजी, झुणका तर छान लागतोच. मात्र चायनिज सूप, फ्राईडराईस, मंचूरिअन सारख्या चमचमीत पदार्थांची शोभा आणि चव कांद्याच्या पातीने आणखी वाढते. कांद्यापेक्षा कांद्याच्या पातीचा वास कमी उग्र असल्याने पदार्थांच्या सजावटीसाठी कांद्याची पात आवर्जून वापरली जाते.अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घराच्या बाल्कनी अथवा खिडकीत कांद्याची पात लावू शकता. ज्यामुळे तुम्हाला घरच्या घरी ऑर्गेनिक पद्धतीने कांद्याची पात उगवता येते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आहारात कांद्याच्या पातीचा अवश्य समावेश करा. कारण कांद्याच्या पातीमुळे तुमचे वजनही कमी होऊ शकते. जाणून घ्या कांद्याच्या पातीची भाजी खाण्याचे फायदे 

कांद्याची पात खा आणि मिळवा अनेक आजारांपासून सुटका

लठ्ठपणा होतो कमी 

वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट ही आजकाल अनेकांची समस्या आहे. आधुनिक जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक गोष्टी यामागे कारणीभूत असू शकतात. मात्र भारतीय आहारात असे काही पदार्थ आहेत. ज्यांचा समावेश तुम्ही आहारात करून तुमचे वजन सहज कमी करू शकता. आपण कांदा स्वयंपाकात भरपूर प्रमाणात वापरतो. भारतीय पदार्थ कांद्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. फक्त या कांद्याचा आणि कांद्याच्या पातीचा वापर आजपासून अशा पद्धतीने करा ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. कारण कांद्याच्या पातीमध्ये भरपूर फायबर्स असतात शिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रीबायोटिक्सही असतात. या दोन्ही घटकांचा तुमच्या पोट आणि पचनशक्तीवर चांगला परिणाम होतो. एका कांद्याच्या पातीमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, लोह, मॅग्नेशिअम, फॉलेट, फॉस्फरस, सल्फर, पोटॅशिअम, अॅंटि ऑक्सिडंट असे अनेक घटक असतात. जे तुमच्या वजन कमी करण्यासाठी आणि शरीराचे योग्य पोषण करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. 

कच्चा कांदा नक्की का खावा, काय आहेत याचे फायदे

ADVERTISEMENT
spring onion is beneficial in weight loss

पातीचा कांदा वाढतो तुमची पचनशक्ती

कांदा आपण निरनिराळ्या पद्धतीने खातो. अन्न शिजवण्यासाठी, कच्चा कांदा खाण्यासाठी, पदार्थाची चव आणि प्रमाण वाढवण्यासाठी, सूप करण्यासाठी कांदा आणि कांद्याच्या पातीचा वापर केला जातो. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असल्यामुळे तुमच्या पोटातील आतड्यांना चांगला आराम मिळतो. पोटात गॅस, अॅसिडिटी निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यामुळे आतड्यांवरील ताण कमी होतो आणि बद्धकोष्ठता, मुळव्याधीसारख्या समस्या कमी होतात. थोडक्यात पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनशक्ती वाढण्यासाठी आहारात कांदा आणि कांद्याची पात असणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. पचनशक्ती सुधारण्यामुळे तुमच्या वजनावरही याचा चांगला परिणाम होतो आणि हळूहळू तुमचे वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. यासाठी आहारात कांदा आणि कांद्याची पात यांचा जरूर समावेश करा. याचप्रमाणे कांदा डोळ्यांच्या आरोग्यासाठी, मधुमेहींसाठी, सर्दीखोकला कमी करण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे कांदा आणि कांद्याची पात खाण्यामुळे तुमचे शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते. 

कांदा आणि बटाट्याला मोड येऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स

29 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT