कॉमेडियन भारती सिंहच्या आयुष्यात सध्या आनंदी आनंद निर्माण झाला आहे. कारण ती सध्या तिच्या आयुष्याचा एक सुंदर टप्पा अनुभवत आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया नुकतेच आईबाबा झाले आहेत. त्यांच्या घरी एका तान्हुल्याचं आगमन झालंय. डिलिव्हरीच्या शेवटच्या काळातही भारती सिंह तिचं काम करत होती. या काळात ती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हुनरबाजचं सूत्रसंचालन करत होते. मात्र आता भारती आई झाल्यामुळे तिने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. भारतीच्या जागी आता एक नवीन अभिनेत्री हर्षसोबत हा शो होस्ट करणार आहे.
हुनरबाजमध्ये ही अभिनेत्री करणार भारती सिंहला रिप्लेस
भारती सिंहच्या जागी आता नागिन फेम सुरभी चंदना हुनरबाज होस्ट करताना दिसणार आहे. सुरभिने नुकतंच तिच्या इन्स्टा पोस्टमधून हे जाहीर केलं आहे. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये सुरभि मिथुन चक्रवतीसोबत दिसत आहे. सुरभिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुरभिने या शूटसाठी पेस्टल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. आता चाहते सुरभि आणि हर्षची जोडी होस्ट करताना पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. हुनरबाज शोमध्ये मिथुन चक्रवर्ती, करण जोहर, परिणिती चोप्रा जजच्या भूमिकेत आहे. भारती आणि सर्व जज यांच्यामध्ये एक छान बॉंड दिसला होता. ज्यामुळे शोमधील वातावरण नेहमीच आनंदाचं आणि उत्साहाचं जाणवत होतं.
सुरभि चंदनाचा नवा अवतार
सुरभि चंदना टेलीव्हिजन माध्यमातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने यापूर्वी तिने इश्कबाज, संजिवनी 2, नागिन 5, कुबूल है अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र ती पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शोची होस्ट होणार आहे. त्यामुळे सुरभिचं अॅकरिंग पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यापूर्वी हा शो भारती आणि हर्षने एकत्र होस्ट केला होता. मात्र आता आई झाल्यामुळे भारतीला हा शो सोडावा लागणार आहे. भारती आणि हर्षने खूप मजेशीर पद्धतीने या शोला एका उंचीवर नेलं होतं. भारती गरोदर असतानाही हा शो होस्ट करत होती. भारती आणि हर्षने 2017 साली लग्न केलं होतं. भारती हर्षपेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. जवळजवळ सात वर्ष एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्न केलं होतं. आता लग्नानंतर चार वर्षांनी त्यांच्या घरी बाळाच्या आगमनाने आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक