ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
विशाल भारद्वाजच्या ‘खुफिया’मध्ये तब्बू आणि अली फजलची जोडी

विशाल भारद्वाजच्या ‘खुफिया’मध्ये तब्बू आणि अली फजलची जोडी

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळामुळे प्रेक्षकांचा कल चित्रपटगृहाकडून ओटीटी माध्यमावर वळला आहे. त्यामुळे आता अनेक सेलिब्रेटीजनां डिजिटल डेब्यूचे वेध लागले आहेत. लवकरच दिग्दर्शक विशाल भारद्वाज देखील डिजिलट माध्यमातून पदार्पण करत आहेत. त्यांनी नुकतीच त्यांच्या आगामी चित्रपट खुफिया ( Khufiya) ची घोषणा केली आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री तब्बू आणि अली फजल यांची मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटात या दोघांसोबत वामिका गब्बी, आशिष विद्यार्थी यांच्याही भूमिका असतील. ज्यामुळे ही अनोखी स्टार कास्ट आणि हटके विषय पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.

कियारा आडवाणी ‘स्मिता पाटील मेमोरिअल ग्लोबल पुरस्कार’ ने सन्मानित

तब्बू खुफियासाठी आहे खूपच उत्साहित 

अभिनेत्री तब्बूने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा केली आहे. तिने शेअर केलं आहे की, “तुम्हाला यात फक्त थरार पाहायला मिळेल, मी विशाल भारद्वाजसोबत आगामी चित्रपट खुफियाची घोषणा करण्यासाठी खूप उत्साहित आहे. जो तुम्हाला लवकरच नेटफ्लिकवर पाहायला मिळेल”  तब्बू आणि विशाल भारद्वाज यांनी यापूर्वीही एकत्र काम केलेलं आहे.तब्बूने विशाल भारद्वाज यांच्या हैदरमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आता तब्बू खुफियासोबतच कार्तिक आर्यनसोबत भुलभुलैयाच 2 मधूनही प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तब्बूचे दोन्ही आगामी चित्रपट थ्रिलर, सस्पेन्स आणि थरारक असणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी तब्बूच्या अभिनयाची एक नवी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

वकरच आई होणार आहे काजल अग्रवाल, चित्रपटाचे शूटिंग केले बंद

ADVERTISEMENT

असं होणार खुफियाचं शूटिंग

दिग्दर्शक विशाल भारद्वाजनेही सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.त्यांनी शेअर केलं आहे की, “न्याय वैयक्तिक होत जातो. सत्य घटनेवर आधारित एक थरारक हेरगिरीवर आधारित खुफिया तुमच्यासमोर सादर करायला खूप उत्साही आहे. जो लवकरच येत आहे फक्त नेलफ्लिक्सवर” या दोघांच्या अधिकृत घोषणेमुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांनाही आता खुप उत्सुकता लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  या महिन्याच्या शेवटी शूटिंगला सुरूवात केली जाणार असून याचं शूटिंग दिल्लीमध्ये होणार आहे.विशाल भारद्वाज यांनी एका मुलाखतीत असं शेअर केलं की, खुफिया माझा पहिली वेब प्रोजेक्ट आहे. ज्यामुळे या चित्रपटाबद्दल मला खूप जास्त उत्साह वाटत आहे. मी या चित्रपटाचं काही शूटिंग दिल्ली तर काही शूटिंग अमेरिकेत करणार आहे. 

जेनिलिया देशमुखचा मराठमोळा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

17 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT