ADVERTISEMENT
home / मनोरंजन
dayaben_to_return

दयाबेन येतेय लवकरच , निर्मात्यांनी दिला इशारा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर…. आता मालिकेतून गायब झालेली दयाबेन अका दिशा वकानी ही पु्न्हा एकदा मालिकेत परत येणार असल्याचे कळत आहे. या मालिकेने गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेत गेल्या कित्येक वर्षांत अनेक बदल झाले आहेत. अनेक कलाकार या कालावधीत बदलेले आहेत. 2017 पासून या मालिकेतून काढता पाय घेतलेल्या दिशा वकानीमुळे मालिकेला बरेच नुकसान झाले होते. पण आता या मालिकेतील मुख्य चेहरा फायनली परतत असल्याची माहिती निर्मात्यांकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान,या आधीही तिच्या कमबॅकच्या चर्चा होत होत्या पण आता परत एकदा या चर्चांना उधाण आले आहे. 

मुलाखतीत केला खुलासा 

मालिकेत दयाबेन पुन्हा पाहायला मिळणार आहे हे जरी खरे असले तरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी परत येणार आहे की या मालिकेत अन्य कोणती अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारणार यावर शिक्कामोर्तब झालेेले नाही. पण दयाबेन या मालिकेत पुन्हा परतणार आहे हे मात्र नक्की! गेल्या काही महिन्यांपासून नव्या दयाबेनच्या शोधाची चर्चा होत होती. ही नवी दयाबेन मिळाली की काय? असा प्रश्न देखील पडला आहे. आता दिशा वकानी की कोणता अन्य चेहरा या मालिकेतून आपल्या भेटीला येणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

मालिकेत कोण येणार परत?

दिशा, भूमिका आणि कोर्ट

दिशा वकानी म्हणजेच या मालिकेतील प्रसिद्ध अशी दयाबेन या मालिकेतून तिच्या प्रेग्नंसी दरम्यानच गायब झाली. बाळाचे संगोपन करण्यासाठी तिने मालिकेत काही काळासाठीचा ब्रेक घेतला असे सांगितले जात होते. काही वर्ष उलटून गेल्यानंतर मालिकेत तिला पुन्हा एकदा बोलावण्यात आले. पण त्यावेळी तिने काही अजून कालावधी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार तिला अजून मुभा देखील देण्यात आली. पण तरी देखील मालिकेत दिशा काही परतली नाही. अखेर मालिकाकर्त्यांना तिला नोटीस पाठवावी लागली अशा बातम्या होत्या. पण तरीही दिशा काही परत आली नाही. 

ADVERTISEMENT

आता मालिकाकर्त्यांनी आनंदाची बातमी दिल्यामुळे नक्की दिशा वकानी की अन्य कोणी अभिनेत्री दयाबेन म्हणून परतणार असा प्रश्न आहे. 

25 May 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT